Belgaum Police : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळकेंना कर्नाटक पोलिसांकडून अटक; हिंडलगा कारागृहात रवानगी

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकी प्रशासनाने कन्नडसक्तीचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
Maharashtra Ekikaran Samiti leader Shubham Shelke
Maharashtra Ekikaran Samiti leader Shubham Shelke esakal
Updated on
Summary

पोलिसांनी (Belgaum Police) दोन दिवसांपासून शुभम शेळके यांना पोलिस स्थानकात हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार शेळके माळमारुती पोलिस स्थानकात दाखल झाले.

बेळगाव : भाषिकवाद निर्माण केल्याचा आरोप करीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे (Maharashtra Ekikaran Samiti) नेते शुभम शेळके (Shubham Shelke) यांना मंगळवारी पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहामध्ये (Hindalga Jail) केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकी प्रशासनाने कन्नडसक्तीचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबत समितीचे कार्यकर्ते उघडपणे आवाज उठवित आहेत.

याचबरोबर आनंदवाडी येथील आखाड्यात ‘जय महाराष्ट्र’ बोलणाऱ्या नेपाळ येथील पैलवान देवा थापा याला विरोध करणाऱ्या एका उद्योजकाच्या विरोधात देखील समितीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध नोंदविण्यास सुरुवात केली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी समितीच्या कार्यकर्त्यांनी शिनोळी येथे आंदोलन केले होते.

Maharashtra Ekikaran Samiti leader Shubham Shelke
Loksabha Election : कोल्हापूरचा ग्राउंड रिपोर्ट थेट दिल्लीतून; प्रशांत किशोर-चाणक्य संस्थेकडून सर्व्हे, कोण मारणार बाजी?

त्यानंतर माळमारुती पोलिसांनी (Belgaum Police) दोन दिवसांपासून शुभम शेळके यांना पोलिस स्थानकात हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार शेळके माळमारुती पोलिस स्थानकात दाखल झाले. मात्र, बराच वेळ तुमच्यावरील गुन्ह्यांचे वर्गीकरण करायचे आहे, असे सांगत त्यांना थांबवून ठेवण्यात आले. मात्र काही वेळातच त्यांच्यावर सीआरपी ११० अंतर्गत गुन्हा दाखल केला व पोलिसांच्या वाहनात बसून जिल्हा रुग्णालयात जायचे आहे, असे सांगण्यात आले.

Maharashtra Ekikaran Samiti leader Shubham Shelke
'हुकूमशाही वृत्तीतून राज्यघटना बदलण्याचे षड्‍यंत्र, हेगडेंची भाजपमधून हकालपट्टी करा'; मुख्यमंत्री आक्रमक

मात्र, शेळके यांनी पोलिस वाहनात बसणार नाही, स्वतःच्या वाहनाने येतो, असे सांगत आग्रह धरला आणि ते पोलिसांसमवेत जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना पोलिस आयुक्त कार्यालयात नेण्यात आले. या ठिकाणी शेळके यांच्या जामिनासाठी ॲड. महेश बिर्जे यांनी अर्ज दाखल केला. तसेच कार्यकर्ते देखील जामीन मिळेल, अशा विश्वासात होते. मात्र भाषिक तेढ निर्माण होत आहे, असे सांगत उपअधीक्षकांनी शेळके यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्यांची रवानगी कारागृहात केली.

Maharashtra Ekikaran Samiti leader Shubham Shelke
Ajit Pawar : शरद पवार गटाचे खासदार-आमदार अजितदादांसोबत एकत्र; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

शुभम शेळके याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, महेश बिर्जे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, भागोजी पाटील, किरण मोदगेकर, मारुती मरगानाचे, सूरज कणबरकर, राजू पाटील, मनोहर हुंदरे आदीं कार्यकर्ते दाखल झाले. तसेच कन्नड संघटना सातत्याने शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असताना देखील फक्त मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्याबाबत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत याबाबत लवकरच आवाज उठविला जाईल, असा इशारा दिला आहे.

शुभम शेळके यांना जामीन मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, जामिनासाठी सरकारी कर्मचाऱ्यांने अर्ज करावा, असे सांगत अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी पुन्हा जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहे.

-ॲड. महेश बिर्जे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.