LIVE Marathi News : समृद्धी महामार्गावरील अपघात ते राजकीय घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

LIVE Marathi News
LIVE Marathi News
Updated on

भाजप कोअर कमिटीची उद्या बैठक

मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने उद्या भाजप कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आलेली आहे.

कुर्ला पश्चिम भागात भीषण आग

कुर्ला पश्चिम भागात भीषण आग लागली आहे. महाराष्ट्र काटा या ठिकाणी स्क्रॅप गोडाऊन ला आग भीषण आग लागली असून आगीत आजू बाजूच्या 7 हून अधिक गोदामे जळून खाक झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल, अग्निशमन दलाच्या सहा अधिक गाड्या आग विझवण्यासाठी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश येत आहे. या घटनेत कोणीही जखमी किंवा अडकलेले नाही.

आदित्य ठाकरेंचा मोर्चा मुंबई पालिकेवर धडकला

आदित्य ठाकरेंच्या मोर्चात उद्धव ठाकरे नसणार- अनिल देसाई

आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला थोड्या वेळात सुरुवात होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा असेल. सर्व तरुण नेतृत्वात हा मोर्चा आहे. शिवसेना नेते अनिल देसाई म्हणाले की, गेले ४-५ टर्म महापलिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे आणि पुढेही फडकत राहणार. प्रशासकांच्या माध्यमातून किवा प्रशासकावर दबाव टाकून हे सरकार काम करत आहे. मुंबई पालिकेला लुटण्याचा प्रयत्न सुरु आहे पण शिवसेना हे मुळीच होऊ देणार नाही. वर्ष झाले लोकप्रतिनिधी नाही आणि प्रशासकाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून षड्यंत्र जे झाले आहे ते सर्व आज आदित्य ठाकरे मुंबई समोर ठेवणार आहेत.

आदित्य ठाकरे संजय राऊत खासदार आमदार नेते पधाधिकारी इथे असणार आहेत तर उद्धव ठाकरे नसतील, असं अनिल देसाई म्हणाले.

मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई नाशिक महामार्गावली शहापूर तालुक्यातील वाशिम परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

वाशिंद येथे उड्डाण पुलाचं काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

  शिंदे-फडणवीस बुलढाण्यातील अपघातस्थळी दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलढाण्यातील अपघातस्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून अपघात स्थाळाची पाहाणी करण्यात येत आहे. यानंतर ते रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस देखील करतील. यावेळी बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित आहेत.

बुलढाणा अपघातानंतर भाजपचं मुंबईतील आंदोलन मागे!

बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस अपघातानंतर ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी काढण्यात येणारं भाजपचं मुंबईतील आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार असल्याचे अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपघातस्थळी रवाना झाले आहेत

बस अपघाताची चौकशी होणार, फडणवीसांनी दिले आदेश

बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे खाजगी बसच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून वाहनचालकाची सुद्धा चौकशी करण्यात येत आहे. मी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आम्ही अपघातस्थळी भेट देण्यासाठी निघालो आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

वणी-सापुतारा रस्त्यावर भीषण अपघात, अपघातात चार जणांचा मृत्यू, 10 जण जखमी

वणी सापुतारा मार्गावरील खोरीफाट्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक मार्गांवर अपघाताचे प्रमाण वाढलं आहे.

गरज भासल्यास डीएनए चाचणी करून मृतदेहांची ओळख पटवली जाईल - फडणवीस

बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यादरम्यान गरज भासल्यास डीएनए चाचणी करून मृतदेहांची ओळख पटवली जाईल, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अपघातस्थळाला देणार भेट

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.

आठवड्यापूर्वीच चिंता व्यक्त केली होती;  बुलढाण्यातील बस अपघातावर शरद पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार - बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना. या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात.

एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते.

25 जणांच्या मृत्यूची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी ः फडणवीस

देवेंद्र फडणवीस : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे.

जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली.

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पोलिसांचे मदतीचे आवाहन

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा होपपळून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर पोलिसांनी नागरिकांना मदतीचं आवाहन केलं आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात मदतीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच जखमी आणि मृत प्रवाशांच्या नातेवाईकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाईल क्रमांक - ७०२०४ ३५९५४, ७२६२२ ४२६८३

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.