मुंबई-गोवा मार्गावर पेण जवळ भोगावती नदीवरील पुलाच्या खाली संशयास्पद वस्तू आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी बॉम्ब शोधक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पुलाखाली स्फोटक सापडल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
संजय राऊतांना PMLA कोर्टाकडून मिळालेल्या जामिनाविरोधात ईडीने याचिका दाखल केली आहे. दरम्यान वेळेआभावी या याचिकेवर आज सुनावणी होऊ शकली नाही. या याचिकेवरील सुनावणी आता उद्या होणार आहे.
आज भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात चौथा दिवस आहे. दरम्यान आज राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते खासदार सुप्रिया सुळे, जितेंदर आव्हाड आणि जयंत पाटील हे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी हे सर्व नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. आज नांदेडमध्ये राहुल गांधी यांची सभा होणार आहे, यामध्ये हे सर्व नेते सहभागी होणार आहेत.
साई बाबांच्या समाधीला स्पर्श करता येणार आहे. याआधी फक्त व्हीआयपी लोकांना समाधीला
अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पाहिलं राज्य असणार आहे. बच्चू कडू यांनी यासाठी लढा दिला होता. या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी मंत्रालयाबाहेर लाडू वाटले आहेत.
देशात लोकशाही आणि संविधान संपवून टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे
अन्यायाविरुद्ध लढणाराचा आवाज दाबला जाईल
हुकूमशाही संपूर्ण देशात
प्रत्येकवेळी कोर्टात जावून न्याय मिळाला आहे
उद्या दुपारी नांदेडमध्ये भारत जोडोमध्ये सहभागी होणार
कोठडीत घालवलेल्या या दिवसांमध्ये मी 2 पुस्तक लिहली आहेत. ती लवकरच येतील. मी या दिवसांमध्ये वचन केलं. काही क्षण लिहले. जे मी जगलो ते मी लिहली आहे. ते लवकरच तुम्हाला भेटले असंही ते म्हणालेत.
संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, माझ्यावर अन्याय झाला हे कोर्टालाही मान्य आहे. देशाची घटना गोठवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. ते घरी पोहचताच आदित्य ठाकरेंनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, मला माहीत होतं ठाकरे कुटुंबीय माझ्या घराची काळजी घेतील. पक्षासाठी मी आणखी दहा वेळा तुरुंगात जाण्यासाठी तयार आहे. मी एकटा नाही तर माझे कार्यकर्ते पक्ष माझ्यासोबत आहेत. ठाकरेंच्या तीन पिढ्यांसोबत नातं कायम असेल. तुरुंगातील प्रश्न मांडण्यासाठी फडणवीस यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची घटना गोठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही ते यावेळी म्हणालेत.
खासदार संजय राऊत उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. ते घरी पोहचताच आदित्य ठाकरेंनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, संजय राऊत यांचं कौतुक वाटतं. ते लढले. पुन्हा त्यांना एखाद्या केसमध्ये त्यांना गोवण्यात येऊ शकत. सत्ताधाऱ्यांकडून न्यायव्यवस्था अंकित करण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.
खासदार संजय राऊत उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. ते घरी पोहचताच आदित्य ठाकरेंनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली.
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. शरद पवारांची देखील भेट घेतल्यानंतर आता संजय राऊत मातोश्रीवर निघाले आहेत. यानंतर ते सामनाच्या कार्यालयाला देखील भेट देणार आहेत.
खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला जाताना साधला माध्यमांशी साधला संवाद बोलताना ते म्हणाले की मी आज शरद पवार उद्धव ठाकरे, फडणवीस सर्वांना भेटणार आहे. ते म्हणाले मी कोणावर टीका करणार नाही. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत. कालच्या निर्णयामुळे माझा न्यायदेवतेवर विश्वास आणखी वाढला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल जामीन मिळाला आहे. काल संध्याकाळी ते कोठडीतून बाहेर आले. आज संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांची भेट घेणार आहेत. जामिनावर सुटका झाल्यानंतर संजय राऊत यांच्या गाठीभेटींना वेग आला आहे.
गुजरात निवडणुकीआधी काँग्रेसला दोन दिवसात तिसरा धक्का बसला आहे. आणखी एका आमदाराने पक्षाला रामराम केला आहे. काँग्रेस आमदार भावेश कटारा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.
अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्यात सुरुवात करण्यात आलं आहे. प्रतापगडाच्या पायथ्याजवळ अफजल खानाची कबर आहे. गुरुवारी सकाळीच स्थानिक प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्यानं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात करण्यात आली. अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण कोणत्याही क्षणी काढली जाणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. कबरीजवळ पोकलेन मशीन तैनात केली असून अनेक ठिकाणी बॅरिगेट्स लावली जात आहे. १९९० पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता.
राज्यात आज भारत जोडो यात्रेच्या चौथा दिवस आहे. आजच्या दिवशी राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार असल्याचे समजते. आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार सहभागी होऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.