जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला यांना समन्स बजावले आहे.
आंध्र प्रदेश येथील डॉ बीआर आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील गुरुकुलममध्ये 52 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून ते निरीक्षणाखाली आहेत.
13 फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या निषेध मोर्चापूर्वी दिल्लीतील टिकरी बॉर्डरवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
Mumbai Metro News: मेट्रो ट्रेनने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांना आणि गर्भवती महिलांना खूशखबर आहे. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या तीन लाखापर्यंत पोहोचल्याने प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करावा लागतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह गर्भवती महिलांची प्रवास दरम्यान मोठी गैरसोय होते. त्यापार्श्वभूमीवर सध्या ज्येष्ठांसाठी असलेली राखीव सीटची संख्या वाढवण्याबरोबरच गर्भवती महिलांसाठी राखीव सीट ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
उल्हासनगर मधील पप्पू कलानी त्यांच्या राहत्या घरी शरद पवार यांनी कलानिंची भेट घेतली
प्रदुषणमुक्त, पर्यावरणपुरक, वातानुकूलित तरीही किफायतशीर दरामध्ये धावणाऱ्या ई-बसेसचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी दुपारी ३ वाजता ठाणे येथील खोपट बसस्थानकावरून होणार आहे.
कोयता गॅंगची दहशत मोडीत काढण्यासाठी पुणे पोलिसांनी अनेक जालीम उपाय केले असतानाच अशी गॅंग आता ठाणे शहरातही डोके वर काढू लागली आहे. ठाण्यातील कोलशेत परिसरात भर दिवसा लोकांना हे दृश्य पाहायला मिळाले. हातात कोयता घेऊन ही मुले परिसरात खंडणी उकळत असल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी रोजी दोहा येथे कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय बैठकी घेणार आहेत
अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यावर काँग्रेस नेते काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्वीट केले आहे. ''हे पक्षासाठी निश्चितच महत्त्वाचे होते. कोणी ईडीला जबाबदार धरत आहेत, ही उतावीळ प्रतिक्रिया आहे. मुळात महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर ते खूप नाराज होते. याची माहिती त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाला दिली होती. त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती. अशोक चव्हाण हे कुशल संघटक, जमिनीवर पक्की पकड असलेले आणि गंभीर नेते आहेत. गेल्या वर्षी जेव्हा भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये पाच दिवसांची होती, तेव्हा संपूर्ण नेतृत्वाने त्यांची क्षमता प्रत्यक्ष पाहिली होती. त्यांचे काँग्रेस सोडणे हे आमचे मोठे नुकसान आहे. त्याची भरपाई कोणीही करू शकणार नाही. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी फक्त आमचीच होती.''
अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस आमदारांचा मोठा गट बाहेर पडणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अशोक चव्हाणांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही
काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, अशोक चव्हाण जे काही आहेत ते काँग्रेसमुळे आहेत.
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलीय. यातचं राष्ट्रवादीचे तरूण नेते रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं आहे. ''विचारधारेसाठी लढण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असताना संपूर्ण आयुष्यभर ज्या विचारधारेसाठी लढलो त्याच विचारधारेचा त्याग करून भाजपशी सलगी करण्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी आहे. भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असंच सुरु राहणार असल्याने अस्मिता आणि विचारधारेसाठीचा पुढील लढा हा सर्वसामान्यांनाच लढावा लागेल आणि जनताही त्यासाठी सज्ज आहे!''
काँग्रेसने माझ्यासाठी भरपूर काही केलं हे खरं आहे. मात्र, मीदेखील पक्षासाठी खूप काही केलं आहे. पक्षाने मला मोठं केलं असलं, तरी मीही पक्षाला मोठं केलं आहे. मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे राहिलो आहे. आता मी दुसरा विचार करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
महाविकासआघाडीमधील जागावाटपाबाबत विचारलं असता, याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. अर्थात, मला याबाबत बोलायचा आता अधिकार नाही, ते ज्यांचं काम आहे ते बघून घेतील, असंही ते पुढे म्हणाले.
मी राजीनामा देण्यापूर्वी काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराशी चर्चा केलेली नाही. पक्षात माझी कोणाबाबत कोणतीही तक्रार नाही. मी अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केलं. मात्र आता दुसरे पर्याय पाहणार आहे. अर्थात, कुठल्या पक्षात जायचं याबाबत कसलीही चर्चा केलेली नाही, असं ते म्हणाले.
काँग्रेसचा राजीनामा का दिला असं विचारलं असता, प्रत्येक गोष्टीला कारण असावंच असं नाही, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, मी अनेक वर्षे काँग्रेससोबत काम केलं आहे. मात्र आता दुसरा विचार करण्याची वेळ आली आहे, म्हणून मी राजीनामा दिला. पक्षांतर्गत गोष्टी आणि उणीदुणी मला बाहेर काढायची नाहीत, तो माझा स्वभाव नाही असंही ते म्हणाले.
मी काँग्रेस पक्षाचा, कार्यकारिणीचा, आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यापुढची राजकीय दिशा मी एक-दोन दिवसांमध्ये सांगेल. मी अद्याप याबाबत विचार केलेला नाही. मी माझी भूमिका लवकरच जाहीर करेल, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असंही ते म्हणाले.
काँग्रेस पक्षानं नेत्यांना खूप काही दिलं आहे. मात्र, आज हेच नेते काँग्रेस पक्षाला, काँग्रेसच्या विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्दैवी असल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.
आपल्याकडे आत्मविश्वास नसल्यामुळे भाजप आता फोडाफोडी करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी आज बोलताना केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी भाजपवर टीका केली. भाजप आता काँग्रेसव्याप्त झाली आहे, असंही ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी आमदारांसोबत संपर्क सुरु केला आहे.
मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार नाही, असं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा स्विकारल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. यानंतर काही वेळातच अशोक चव्हाण माध्यमांशी बोलतील असंही सांगितलं जात आहे.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चव्हाण यांनी कुठल्या कारणासाठी राजीनामा दिला याची अद्याप आम्हाला माहिती नाही. पण काँग्रेसमध्ये प्रचंड धुसफूस आहे, अस्वस्थता आहे, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
अशोक चव्हाणांसह चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान हे देखील भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पण अद्याप अशोक चव्हाणांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली अन् राजीनाम्याची प्रक्रिया समजून घेतली.
काँग्रेसचे माजी नगरसेवक जगन्नाथ कुट्टी यांचा आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश झाला.
भाजपच्या मुंबई कार्यालयात काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरु आहे. अशावेळी अशोक चव्हाण यांनी आमदार पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. काही वेळापुर्वी अशोक चव्हाण यांची राहुल नार्वेकरांनी भेट घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १९ फेब्रुवारीला आखण्यात आलेला सातारा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनीही पक्षाला रामराम ठोकला. आज काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश आमिन भाजपच्या वाटेवर असणार आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नगरसेवक भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत.
मराठा समाजाचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून राज्य मागासवर्गाची उद्या किंवा परवा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
शरद पवार आज कल्याणमधील उल्हासनगर दौऱ्यावर आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विधानसभेत दाखल झाले आहेत. बहुमत तपासण्यासाठी फ्लोअर टेस्ट थोड्याच वेळात घेण्यात येईल.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत. ते पदाधिकारी आणि जनतेशी संवाद साधतील.
राज्यसभेच्या १४ जागांसाठी भाजपने रविवारी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील सात, बिहारमधील दोन तर छत्तीसगड, हरियाना, कर्नाटक, उत्तराखंड आणि प. बंगालमधील प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत वरुणराजाने रविवारी उपराजधानीसह ग्रामीण भागांतही जोरदार हजेरी लावली. भंडारा, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील मौदा, कुही व कामठी तालुक्यांना गारपिटीने जोरदार तडाखा दिला, तर शहरातही विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात सोमवारीही पावसाचा इशारा असल्याने बळीराजाची चिंता व धाकधूक कायम आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण साठी केलेले हे चौथे उपोषण आहे. जरांगे यांनी या उपोषण दरम्यान अन्न, पाणी आणि औषध उपचार घेण्यास नकार दिला आहे. सग्या सोयऱ्याना त्या नोंदी आधारे आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सरकारने या संदर्भात अध्यादेश काढला आहे. आणि त्या आध्यादेशाची अंमलबजावणी करावी जरांगे, अशी मागणी मागणी जरांगेंनी केली आहे.
बिहार विधानसभेमध्ये आज बहुमत चाचणी, पाकिस्तानात कोणाचं सरकार येणार? मनोज जरांगे यांच्या उपोषणाची तिसरा दिवस, राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.