मध्य प्रदेश सरकारचे मुख्य कार्यालय सातपुडा भवनाला आग लागल्याची घटना घडली आहे. सरकारच्या अनेक संचालनालयाची कार्यालयं इथं आहेत.
मुंबईचा जुहू चौपाटीवर सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सहा जण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सहाजण बुडाले. यातील दोघांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले.
तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल झाली असून शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंब्र्यामध्ये २५ टक्के हिंदू आहेत. परंतु लव्ह जिहादच्या नावाखाली मुंब्र्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांचे आज निधन झाले. माध्यमांनी यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे.बिपरजॉय चक्रीवादळ 500 ते 600 किमी दूर असून ते गुजरातला धडकणार आहे. यादरम्यान मुंबईत वाऱ्याचा वेग 55 ते 60 किलोमीटर प्रती तास राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि परीसरात पुढील 48 तासांत तुरळक ठिकाणी मेघगर्जानांसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
देशात बिपरजॉय चक्रीवादळचं मोठं संकट समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी एक वाजता हवामान तज्ञ आणि मंत्र्यांसोबत मोदींची बैठक होणार आहे. बीपरजॉय चक्रीवादळाबाबत केंद्र सरकार नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे.
काल आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, या विरोधात ठाकरे गटाने मुंबईतील चर्चगेट परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. यावरून सध्या राजकारण तापण्याची शक्यता आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी बोपोडीत दाखल झाली आहे. पुण्यात सर्वत्र हरी नामाचा गजर सुरू आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज अन् ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असणार आहे. पालखीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आज आपल्या तिसऱ्या मुक्काम स्थळी म्हणजे पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे. तुकोबांची पालखी रविवारी संध्याकाळी उद्योग नगरी म्हणजेच पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाली.
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखीचे लोकेशन diversion.punepolice.gov.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे. तसेच पालखी मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.
वाहतुकीस बंद असणारे मार्ग (कंसात पर्यायी मार्ग)
गणेशखिंड रस्ता (रेंजहिल्स चौक ते संचेती रुग्णालय) पर्यायी मार्ग- रेंजहिल्स-खडकी पोलीस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता
फर्ग्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक) पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स
शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग- कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता
टिळक चौक ते वीर चापेकर चौक, पर्यायी मार्ग- शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल
लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक), पर्यायी मार्ग- शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वचित कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी वारजेतील पॉप्युलर-गिरीधर नगर सोसायटी मधील एम. एन. जी. एल.च्या गॅस कनेक्शनचा गॅस पेटवून शुभारंभ केला.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीमधून पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे. पुण्यात सध्या विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
वऱ्हाडाचा टेम्पो उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 13 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. टेम्पोचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांच्या नावाची चर्चा रंगली होती. त्यानंतर प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आपापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणत बॅनरबाजी करत आहेत. आता या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव देखील घेतले जात आहे.
श्रीक्षेत्र आळंदी येथून रविवारी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान ठेवले. यंदाच्या वारी सोहळ्याला गालबोट लागले आहे. वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडींना वेग. शिंदे गटातील पाच मंत्र्यांवर टांगती तलवार. गच्छंतीसाठी भाजपचा दबाव असल्याची चर्चा.
गरीब कुटुंबातील तमिळ व्यक्तीनं भारताचा पंतप्रधान व्हायला हवं, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सांगितलं. पक्षाच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.