भारतीय तटरक्षक दलाने आज आधी विशाखापट्टणमपासून सुमारे 28 किमी अंतरावर असलेल्या एमव्ही ग्रीन के-मॅक्स 2 या व्यापारी जहाजातून एका जखमी फिलिपिन्स नागरिकाला यशस्वीरित्या बाहेर काढले. विशाखापट्टणम येथील ICG सागरी बचाव उपकेंद्र (MRSC) ला व्यापारी जहाजाकडून इंजिन रूममध्ये काम करताना गंभीर दुखापत आणि फ्रॅक्चर झालेल्या क्रूबद्दल माहिती मिळाली होती.
बाहेर काढल्यानंतर, ICG जहाजावरील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांची तपासणी केली आणि प्राथमिक उपचार केले. त्यानंतर, रुग्णाला ICG ने विशाखापट्टणमला आणले आणि पुढील वैद्यकीय व्यवस्थापनासाठी शिपिंग एजंटकडे सोपवले.
राज्य कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील सुरुवात झाली आहे. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करुन त्यावर निर्णय होऊ शकतो.
स्पर्धा परीक्षेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेपर फुटीला आळा घालण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीला तीन महिन्यांमध्ये अहवाल सादर करायचा आहे.
अंतरवाली सराटी येथील दगडफेक व जाळपोळ प्रकरणी गोंदी पोलीस स्टेशन येथे 307 कलमासह इतर गुन्ह्यात ऋषिकेश बेद्रे यांना मुख्य आरोपी करण्यात आले होते, सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ॲड. विशाल कदम यांच्या मार्फत हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. सदरील प्रकरणी आज न्या. एस. व्ही चपळगावकर यांच्या खंडपीठ समोर वरिष्ठ विधीज्ञ व्हीं. डी. सपकाळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून खंडपीठाने जामीन दिला आहे. यामुळे मराठा समाजासह सर्व आंदोलन कर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर सरकारी कर्मचारी संघटनांची तातडीची बैठक बोलवली. संप मागे घेण्यासंदर्भात चर्चा सुरु झाली असून थोड्याच वेळात संप मागे घेण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांची व्यक्त केलीये.
संसदेची सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या कालच्या प्रकारामुळं आज दोन्ही सभागृहांमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं. यावरुन सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. यामुळं दोन्ही सभागृहातील मिळून १५ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये लोकसभेतील १४ तर राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश
महाज्योतीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होत आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित आहेत.
संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी चारही आरोपींना पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं आहे.पोलिसांकडून जास्तीत जास्त कोठडीची मागणी केली जाणार असल्याचं कळतंय.
लोकसभेमधून पाच खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. संसदेमध्ये गदारोळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.
अदानी समूदाच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या ठाकरे गटाच्या मोर्चाला धारावी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आधी आयुक्तांकडे अर्ज करा असं त्यांना सांगण्यात आल्याचं कळतंय.
संसदेत गोंधळ घालणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिस लवकरच पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार आहेत. दिल्ली पोलिस आरोपींना पटियाला हाऊस कोर्टात हजर करून रिमांड मागणार आहेत. दिल्ली पोलीस सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार आहेत.
लोकसभेपाठोपाठ राज्यसभेचे कामकाजही संसदेच्या सुरक्षेबाबत विरोधकांच्या गदारोळामुळे दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यसभेच्या अध्यक्षांनी टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांना निलंबित केले आहे.
माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये लोणीकर टोपेंना शिव्या देताना ऐकू येतंय. परंतु ती ऑडिओ क्लिप बनावट असून मी कुणालाही शिवीगाळ केलेली नाही, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं.
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन (Derek O'Brien) यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आलं आहे. राज्यसभेत गोंधळ घातल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सभागृहाबाहेर सर्वपक्षीय आमदारांनी फोटोसेशन केलं. यावेळी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हेही उपस्थित होते. याआधी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अनुपस्थित असल्याने फोटोसेशन होऊ शकलं नव्हतं.
जालना जिल्हा बँकेचा वाद थांबायचं नाव घेत नाही. कारण माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या घरावर दगडफेक झालेली आहे. मागच्या महिन्यात राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली होती. त्यानंतर लोणीकरांच्या घरावर दगडफेक झालेली. गुरुवारी पुन्हा लोणीकरांच्या घरावर दगडफेक झाली आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.
माझ्या जीवाला धोका असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्या नाशिकातील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सकाळी सुरक्षा कमी होती. त्यानंतर दुपारपासून अधिक पोलीस फाटा तैनात करण्यात आलाय.
सर्वोच्च न्यायालयाने IAS अधिकारी सौम्या चौरसिया यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यासोबतच कोर्टाने त्यांना एक लाख रुपये दंडही ठोठावला. सौम्या या छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपसचिव होत्या. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. सभापतींनी सकाळी 11.30 वाजता विरोधी पक्षनेत्यांना त्यांच्या दालनात बैठक घेण्यास सांगितले आहे.
बुधवारी संसदेमध्ये चार घुसखोर घुसले होते. त्यानंतर संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. गुरुवारी या प्रकरणी लोकसभा सचिवालयाकडून सात जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे.
"छगन भुजबळ ज्या प्रकारची भाषणं करत आहे, त्याच्याशी मी सहमत नाही. अशा प्रकारच्या भाषणांना माझा विरोध आहे. जर ते म्हणत आहेत की त्यांच्या जीवाला धोका आहे, तर सरकारने नक्कीच याकडे लक्ष देऊन त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी. महाराष्ट्रात एखाद्या व्यक्तीला अशी धमकी देणं चुकीचं आहे, आणि आमचा याला पूर्णपणे विरोध आहे." असं मत रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.
दिल्लीमधील सीएनजी दरांमध्ये आजपासून वाढ झाली आहे. देशाच्या राजधानीत सीएनजी 76.59 रुपये प्रति किलो एवढ्या दरावर पोहोचला आहे. यासोबतच नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्येही CNG च्या दरात एक-एक रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे.
राज्य मागासवर्ग आयोगामध्ये सरकारला ओबीसी प्रतिनिधी नको होता, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या पाचही आरोपींना दुपारी २ वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा शोध दिल्ली पोलीस घेत आहेत.
हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आज नागपूर विधानभवनात राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेच्या मुद्यावरून आधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. आज या मुद्द्यावरुन गदारोळ माजण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज गॅन्ट्री बसवण्यासाठी 2 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेन वर हा ब्लॉक असणार आहे. आज दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई लेनवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने किवळे ब्रिजवरुन जुना महामार्गाने वळवण्यात येणार आहेत. तर पुणे ते मुंबई जुन्या महामार्गावरील येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका इथून एक्सप्रेस हायवेवर मुंबई मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.