मी आधी शिवसैनिक होतो, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. यावेळी त्यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबतही वक्तव्य केलं. ते म्हणाले की, "राहुल नार्वेकर जे काही निर्णय देतील ते देतील पण जो काही निर्णय अध्यक्ष देतील त्यांनतर पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार आहेच."
लोकसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप तिकीट वाटपावर चर्चा झाली नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर त्यांनी इंडिया युतीच्या बैठकीबाबतही माहिती दिली. ते म्हणाले की, "राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष आणि अनेक मोठे काँग्रेस नेते येणार आहे म्हणून आम्ही मुंबईत त्यांचे जंगी स्वागत करणार आहोत."
पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटात वाहतूकीचा खोळंबा झालाय. यावेळी लांबपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
कारगीलमध्ये एका स्फोट झालाय, ज्यात ३ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी आहेत.
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट १५ वर्ष पूर्ण झाले आहेत. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, 'फोरेव्हर ग्रेटफुल'
युवा सेना कोर कमिटीतील सचिव व मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रवीण पाटकर हे थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. प्रवीण पाटकर हे आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. युवा सेनेतील अंतर्गत कलहा मुळेच प्रवीण पाटकर यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगितले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा या ठिकाणी असलेल्या एका कंपनीला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
नवी मुंबईमधील नेरुळ स्थानकाजवळील ट्रॅकमध्ये सायकल अडकल्याने त्या मार्गावरुन धावणाऱ्या लोकल गांड्यांचा खोळंबा झाला होता. ही सायकल काढल्यानंतर वाहतूक सुरु झाली.
भारत विरुद्ध आयर्लंड या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी जस्प्रित बुमराहच्या खांद्यावर आहे.
राहुल गांधी सध्या दोन दिवसाच्या लेह दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका फुटबॉल सामन्याचा आनंद लुटला.
बिहारमध्ये एका पत्रकाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. यावरुन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बिहारच्या कायदा व सुवस्थेवर प्रश्न निर्माण केला होता. ते म्हणाले की, "ज्या राज्यात पत्रकार आणि पोलीस सुरक्षित नाहीत, महिला आमदारांना असुरक्षित वाटतय, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानी राजीनामा दिला पाहिजे."
आपण पुढच्या आरोग्य आपत्तीसाठी तयार राहून त्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलं आहे. ते यावेळी जी-२० परिषदेला संबोधित करत होते.
बिहारमध्ये एका पत्रकाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर पत्रकार संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील भाजपचे सर्व आमदार परराज्यात प्रवासाला निघाले आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील आमदारांना केंद्राकडून भरगच्च अभ्यास सुरू केला आहे. प्रत्येक आमदार करणार दुसर्या राज्यात ७ दिवसांचा प्रवास करणार आहे. तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अश्या राज्यात भाजपचे आमदार करणार मोदींचा प्रचार करणार आहेत. सलग ७ दिवस केंद्राकडून भाजपच्या आमदारांची ‘ शाळा ‘ घेतली जाणार आहे.सकाळी ७ पासून ते रात्री ७ पर्यंत प्रत्येक आमदारावर ॲपद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे.
कल्याण कोळसेवाडी परिसरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर जाब विचारण्यासाठी आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अप्पर पोलीस आयुक्त यांची भेट घेतली. कल्याण कोळसेवाडी मधील अल्पवयीन मुलीची झालेली हत्या. भररस्त्यात मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रकार.. दिवसाढवळ्या कोयत्यांनी हल्ले केले जाताहेत.. वारंवार पोलिसांना पत्र देऊन ही पोलीस लक्ष देत नसल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.. एवढं सर्व होऊन ही पोलीस काय करताहेत हे विचारण्यासाठी सुषमा अंधारे सोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे राज्यपालांची भेट घेणार आहेत. शनिवारी दुपारी अडीच वाजता मनसेचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. मुंबई विद्यापीठाने अचानक सिनेट निवडणुका स्थगित केल्याने अमित ठाकरे भेट घेणार आहेत. सिनेटसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाच निवडणुका स्थगित केल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारच्या दबावामुळे निवडणुका स्थगित केल्याचा आरोप मनसेने केला आहे.
दिल्ली-पुणे विमानात बॉम्ब असल्याचा फोन करण्यात आला होता. त्यानंतर या विमानातून प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. विमानाचा संपुर्ण तपास करण्यात आला. विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. विमानाची चौकशी पूर्ण झाली आहे. पुन्हा सर्व प्रवासी विमानात बसून थोड्याच वेळात विमान पुण्याकडे रवाना होणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचं जंगी स्वागत केलं आहे. राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत.
पुण्यातील नारायणगाव बायपासजवळ भीषण अपघात झाली आहे. या अपघातात १४ जण जखमी झाले आहेत. कंटेनर आणि शिवशाही बसचा अपघात झाला आहे. ही बस पुण्यावरून नाशिककडे जात होती.
महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन काहीच मतभेद नाहीत. जो जिंकेल ती जागा त्यांची असणार आहे. मविआमध्ये जागा वाटपावरुन कोणताही तिढा नसल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधींचा पत्ता पुन्हा बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी तुघलक लेनच्या जागी दुसऱ्या घराच्या पर्यायाच्या शोधात असल्याची महिती आहे. खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांना तुघलक लेनवरच 12 नंबरच निवासस्थान रिकामं करावं लागलं होतं. सफदरजंग लेनवर राहुल गांधींचा पत्ता निश्चित होण्याची शक्यता आहे. सध्या राहुल गांधी लेह लडाखच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावरून आल्यानंतर निवासस्थानाचा निर्णय होणार आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.