Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

देश-विदेश तसेच जगभरातील महत्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर
Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Updated on

उद्धव ठाकरे दिल्लीत संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल

मंगळवारी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या इतर नेत्यांची उपस्थिती आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट दिली.

मराठा आरक्षणावर उद्या मुख्यमंत्री विधीमंडळात भूमिका मांडणार

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या विधीमंडळात भूमिका मांडणार आहेत. शिंदे समितीने त्यांचा अहवाल सरकारला सुपूर्द केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

उद्धव ठाकरेंनी घेतली अरविंद केजरीवालांची भेट

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.

दिल्लीतील सर्वपक्षीय खासदारांची बैठक संपली

दिल्लीतील सर्वपक्षीय खासदारांची बैठक संपली आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीत दोन ठराव झाल्याचं सांगितलं.

प्रिया सिंह हल्ल्याप्रकरणी आरोपींना जामीन मंजूर

प्रिया सिंह हल्ल्याप्रकरणी तीन आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. आरोपीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजित गायकवाड याचाही समावेश आहे.

उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल

उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या उद्याच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. माहितीनुसार, ते खासदार संजय राऊत यांच्या घरी मुक्काम करणार आहेत. ठाकरे अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेणार आहेत.

अरविंद केजरीवाल यांना ईडीचा दुसऱ्यांदा समन्स

मद्य घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दुसऱ्यांदा समन्स बजावला आहे. त्यांना गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले आहेत. याआधी ईडीने पाठवलेल्या समन्सकडे केजरीवाल यांनी दुर्लक्ष केले होते.

प्राजक्त तनपुरे आणि अर्जुन खोतकर यांच्या अडचणी वाढल्या

प्राजक्त तनपुरे आणि अर्जुन खोतकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना ईडी कोर्टाने समन्स पाठवून १२ जानेवारीला हजर राहण्यास सांगितलं आहे. राम गणेश गडकरी कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी हा समन्य बजावण्यात आला आहे.

निलंबित खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार

संसदेतील जवळपास ९२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत हे निलंबन कायम असणार आहे. त्यामुळे संसदेच्या कामकाजात त्यांना भाग घेता येणार नाही. याप्रकरणी निलंबित खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. पुढील रणनीती या बैठकीत ठरवली जाईल.

संसदेतून एकूण ८१ खासदारांचं निलंबन

संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी सदस्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. काही वेळापूर्वी लोकसभेतील ३३ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता राज्यसभेतील ३४ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत सदस्यांचे निलंबन कायम राहील. आज दिवसभरात ६७ खासदारांचे निलंबन झाले आहे.

CM Eknath Shinde: आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात सत्तेत आल्यापासून गेली दीड वर्ष ऊन-पावसाच्या तडाख्यात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्या समस्या समजून घेत आहोत. त्यावर उपाययोजना करत आहोत आणि करत राहू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde: नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी डीबीटी द्वारे जमा होईल

९ लाख ७५ हजार ५९ हेक्टर बाधित क्षेत्र आहे. अवकाळीसाठी अंदाजे २००० कोटींची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. जसजसे पंचनामे होतील, तसतसा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा होईल.. किंबहुना आजच मी काही शेतकरी बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात चेकचं वाटप करतोय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde: अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास १०० टक्के पूर्ण

नोव्हेंबर-डिसेंबरमधील अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास १०० टक्के पूर्ण झाले आहेत. ३२ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यांचे पंचनामे १०० टक्के पूर्ण आहेत. परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या ६ जिल्ह्यातील पंचनामे थोडेफार बाकी आहेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Girish Mahajan: विरोधकांचे माझ्यावर खोटे आरोप: मंत्री गिरीश महाजन

Girish Mahajan: जुने फोटो काढून दाऊदशी संबंध दाखवण्याचा केविलवाणा प्रकार: मंत्री गिरीश महाजन

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार नागपुरातील रेशीम बागेत जाणार नाहीत

उपमुख्यमंत्री अजित पवार नागपुरातील रेशीम बागेत जाणार नाहीत. रेशीमबागेत डॉक्टर हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करण्याकरता उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भातील शिंदे समितीचा अहवाल सादर

Maratha Reservation : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भातील निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने सादर केलेला अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सादर

विरोधी पक्षाचे ३३ खासदार निलंबित

संसदेमध्ये विरोधी पक्षाचे एकूण ३३ खासदार निलंबित करण्यात आलेले आहे. खासदार अधीर रंजन चौधरी यांनाही निलंबित करण्यात आलेले आहे.

'मला आता कळालं अदानींचे चमचे कोण', उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या वतीने अदानी समुहाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला आता कळाल की अदानीचे चमचे कोण आहेत.आम्ही अदानीवर मोर्चा काढल पण चमचे का वाजत आहेत. धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यवर उतरलो होतो."

नागपुर स्फोटाच्या SIT चौकशीची ठाकरे गटाची मागणी

नागपुर स्फोटाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली आहे.

ही घटनादुरुस्ती बेकायदेशीर असती तर..., कामतांचा मोठा युक्तीवाद

सुनावणी दरम्यान कामत यांनी युक्तीवाद केला की, '२०१८ साली झालेली घटनादुरुस्ती ही घटनाबाह्य असती, तर निवडणूक आयोगाने पक्षाची नोंदणी रद्द का केली नाही?'

नागपूर येथे दुसऱ्यांदा सुनावणी साठी, आदित्य ठाकरे सभागृहात दाखल

नागपूर येथे दुसऱ्यांदा सुनावणी साठी, आदित्य ठाकरे सभागृहात दाखल, याआधी दीपक केसरकर यांची उलट साक्ष घेताना आदित्य ठाकरेंनी लावली होती हजेरी.

सलीम कुत्ता प्रकरणावर विधान परिषदेवर खडाजंगी!

महाजनांचे सलीम कुत्ता यांच्यासोबतचे फोटो विधान परिषदेत दाखवले गेल्यानं मोठा गदारोळ झाला. यावेळी एकनाथ खडसे आक्रमक झाल्याचे दिसून आले. एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत २८९ न्वये जी सुचना मांडली ती फेटाळण्यात आली आहे.

पुण्यात वयोवृद्धाकडून महिलेचा विनयभंग

पुण्यात वयोवृद्ध नागरिकाकडून महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील घोले रस्त्यावरील महात्मा फुले वस्तू संग्रहालयात सहकारी महिलेवर विनयभंग करण्यात आला आहे. ७० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तिविरोधात डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पुण्यातील गुलटेकडी परिसरात NIA मोठी छापेमारी सुरु

पुणे पुण्यातील गुलटेकडी परिसरात NIA मोठी छापेमारी सुरु आहे. एनआयएच्या गुन्ह्यातील आरोपीच्या घरावर मोठी छापेमारी करण्यात येत आहे. NIAच्या कर्नाटकातील बेंगलोरमधील पथकाने मोठी छापेमारी केली आहे. छाप्यात संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात मुंबई पुणे आणि राज्यभरात NIAच्या छापेमारीनंतर आज पुण्यात NIA मोठी छापेमारी सुरू आहे.

बडगुजर यांची सलग चौथ्या दिवशीही चौकशी; मनपाची फसवणूक केल्याचा बडगुजर यांच्यावर आरोप

मनपाची फसवणूक केल्याचा बडगुजर यांच्यावर आरोप आहे. बडगुजर यांची सलग चौथ्या दिवशीही एनसीबी चौकशी करणार आहे.

संसदेतील घुसखोरी प्रकरणावर लोकसभेत जोरदार गदारोळ; 12 वाजेपर्यंत कामकाज स्थगित

संसदेतील घुसखोरी प्रकरणावर लोकसभेत जोरदार गदारोळ सूरू झाल्याने 12 वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेवरून लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला.

नागपुरातील कंपनीतील स्फोटावर अधिवेशनात चर्चा सुरू

नागपुरातील कंपनीतील काल स्फोट झाला होता, त्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यावरती अधिवेशनात चर्चा सुरू आहे.

LIVE Marathi News Updates : अमरावतीच्या अचलपूरमध्ये NIAकडून छापेमारी

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे आज (सोमवारी) पहाटेच्या सुमारास NIA पथकाने अचानक छापेमारी केली. यावेळी एका विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आली. हा विद्यार्थी अचलपुरातील एका स्थानिक महाविद्यालयातील आहे. हा विद्यार्थी दहशतवादी कारवायात सहभागी असावा असा संशय आल्याने NIA पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे.

कात्रजमध्ये लिफ्टमध्ये अडकलेल्या तरुणांची सुटका

कात्रज - भारती विद्यापीठ परिसरातील युनियन लिव्हींग होस्टेलमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन तरुणांची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. रविवारी (ता. १७) मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली. हे युवक जवळपास दीड तास लिफ्टमध्ये अडकले होते. त्यानंतर याची माहिती अग्निशामक दलाला मिळाल्यावर जवानांनी घटनास्थळी पोहोचत कार्यवाही केली.

अमेय विधाते, साहिल कटकमवार, वेदांत अगरवाल हे तिघेजण तळमजला आणि पहिल्या मजल्याच्या मध्ये अडकले होते. कात्रज अग्निशामक केंद्रातील अग्निशमन अधिकारी प्रदिप खेडेकर, फायरमन तेजस मांडवकर आणि मदतनीस जाधव यांनी घटनास्थळी पोहोचत केवळ सहा मिनीटांत तीनही मुलांची सुखरूप सुटका केली. यामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

धक्कादायक! हॉटेलमधील अंडे चोरल्याचा संशयावरून पुण्यात महिलेचे उतरवले कपडे अन्...

पुणे - पुण्यातील येरवडा मधील धक्कादायक प्रकार पाहिला मिळाला आहे. हॉटेलमधील अंडे चोरल्याचा संशयावरून महिलेला कपडे उतरवण्यास भाग पाडले. पुण्यात महिला कर्मचाऱ्यासोबत हा प्रकार घडला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा! -

Pune Crime News : अंडी चोरल्याच्या संशयावरून महिलेस कपडे उतरवण्यास भाग पाडलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचा पहिला दिवस; मराठा आरक्षणावर होणार चर्चा?

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील आज पहिला दिवस आहे. अवकाळी पावसावरती दोन्ही बाजूकडून चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री याला उत्तर देणार आहेत. मराठा आरक्षण प्रश्नावरील चर्चा पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणावर सभागृहात मंगळवारी चर्चा होऊ शकते.

वन नेशन वन इलेक्शन बाबत आज महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली - वन नेशन वन इलेक्शन बाबत आज महत्त्वाची बैठक होणार आहे. माजी राष्ट्रपती आणि समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक असुन या बैठकीत आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी समितीने सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहीत त्यांच्या सूचना मागितल्या होत्या. राजकीय पक्षांनी सुचवलेल्या सूचनांवर देखील बैठकीत चर्चा होऊ शकते. बैठकीसाठी समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता पण जास्त आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार हवालदाराला अखेर अटक

पुणे: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पसार झालेल्या रेल्वे सुरक्षा दलातील हवालदाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हवालदार दोन महिने पोलिसांना गुंगारा देत होता.

अनिल पवार असे अटक करण्यात आलेल्या लोहमार्ग पोलिस दलातील हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी कमलेश तिवारी (मूळ रा. उत्तर प्रदेश), सुश्मिता कसबे आणि करण राठोड यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पवार याने ताडीवाला रस्त्यावरील रेल्वेच्या जागेत बेकायदा सोसायटी सुरू केली होती. परगावावरून रेल्वे स्थानकात पळून आलेल्या फिर्यादी मुलीला व तिच्या प्रियकराला हेरून पवार आणि त्याचे साथीदार सोसायटीत घेऊन गेले होते. तेथे आरोपींनी दोघांना धमकावून पैसे उकळले. त्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते. मुलगी आणि तिचा प्रियकर मूळचे छत्तीसगडमधील आहेत.

ॉ बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार फरार झाला होता. लोहमार्ग पोलिस त्याच्या मागावर होते.तो पुण्यातील घरी येणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचून पवारला अटक केली.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी आजपासून

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सलग तीन दिवस अंतिम सुनावणी चालणार आहे. सकाळी ८.३० वाजता ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत बाजू मांडणार आहेत.

अंतिम सुनावणीत युक्तिवाद करण्यासाठी ठाकरे गटास दीड दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मंगळवार व बुधवार दीड दिवस शिंदे गटाचे वकिल युक्तिवाद करणार आहेत. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकिल महेश जेठमलानी युक्तिवाद करतील.

राज्याची उपराजधानी नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आजपासून अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचं कामकाज सुरू होणार आहे.  शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज अंतिम सुनावणी सुरु होत आहे. या आणि देशासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()