अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा.. लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे.. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे. असं ट्विट अंबादास दानवे यांनी केलं आहे आणि जे.पी.नड्ड यांना टोला लावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या 400 कोटींच्या रूपयांच्या आरोपांची तपासनी करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ खडसे यांना धक्का बसला आहे.
परभणीतील रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी एक धक्कादायक खुरासा केला आहे. ते म्हणाले तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मला जीवदान मिळालं नाही तर मी आत्महत्या केली असती, त्याच्या या भावनिक विधानाने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे.
28 डिसेंबर रोजी पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज या भागात दोन तरुणांनी कोयता घेऊन दहशत माजवली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि पाठलाग करून त्या दोन्ही तरुणांना पकडायचा प्रयत्न केला मात्र यातील मुख्य आरोपी करण दळवी हा पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार झाला होता. याच करण दळवी ला आता पुणे पोलिसांनी बीडमधून अटक केली आणि इतकाच काय तर जिथे कोयता फिरवत दहशत माजवली तिथूनच त्याची दिंड काढली
जे.पी. नड्डा सध्या चंद्रपुर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बाबतुल्लाशाह दर्ग्याला जे. पी. नड्डा यांनी भेट दिली. तसेच त्यांनी दर्ग्यावर चादर चढवली. ते आज चंद्रपुर दौऱ्यावर आहेत.
भिवंडीत मेरी पाठशाला आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. 19 आंदोलकाना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कंटेनरला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.
पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज या ठिकाणी कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी करण दळवी याला पुणे पोलिसांनी बीड मधून अटक केली आहे. सिंहगड लॉ कॉलेज या ठिकाणी दोन तरुणांनी कोयता घेऊन दहशत प्रयत्न केला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 डिसेंबर रोजी करण दळवी आणि त्याचा अल्पवयीन साथीदार दहशत पसरवली होती. या परिसरात ये जा करणाऱ्या नागरिकांवर या दोघांनी मिळून कोयते उगारले होते. या हल्ल्यात एक जण जखमी देखील झाला होता. या घटनेची माहिती मिळताच, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी यातील दोन जणांचा पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले होते यावेळी करण दळवी हा फरार होता.
जे पी नड्डा सध्या चंद्रपूर दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी सभेला संबोधित केलं. त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं आहे.
भारत आता मागणारा नाही तर देणारा देश बनला आहे.
भारत सर्वात जास्त निर्यात करणारा देश ठरत आहे.
मोदी यांच्यामुळे देश प्रगती करत आहे.
भारतातून 57 टक्के मोबाईल निर्यात होत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये जिंदाल कंपनीला भीषण आग लागली होती. अखेर 24 तासांनंतर ही आग आटोक्यात आली आहे. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहे.
छत्रपती संभाजी राजे बोलताना म्हणाले छत्रपती संभाजी महाराज यांनी देशाच रक्षण केलं. त्याचबरोबर त्यांनी धर्माचही संरक्षण केलं असं म्हंटलं तर वावग ठरणार नाही. राज्यात जो वाद सुरू आहे. अजित पवार यांनी म्हंटलं की, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे वाक्य त्यांनी कोणत्या संदर्भाच्या आधारे बोलले ते त्यांनी स्पष्ट करावं असं छत्रपती संभाजी राजे म्हणाले आहेत. कोणत्याही विषयाबाबत बोलताना अर्धसत्य सांगू नये. एकत्र संपूर्ण महितीसह बोलव किंवा बोलू नये. अजित पवार यांनी यासाठी स्पष्टीकरण द्यावं असंही ते म्हणालेत. त्याचबरोबर जबाबदार पुढऱ्यांना हे असलं बोलणं शोभत नाही.
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं तर ते एखादं गल्लीतलं भाषण वाटतं', अशा शब्दात राऊतांनी शिंदेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.
पुण्यातील खंडोजी बाबा चौकात भाजपकडून अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी "छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते" असे विधान केले होते. त्यावरून हे आंदोलन करण्यात आली आहे
राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी ‘मार्ड’ने आज राज्यव्यापी संप पुकारला आहे. आज पासून राज्यातील निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील हा संप सुरू झाला आहे. पुण्यातील ससून रुग्णालया बाहेर निवासी डॉक्टरांनी सरकार विरोधात आंदोलन केले आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय व महापालिका महाविद्यालय व रुग्णालये यात निवासी डॉक्टरांकडून दिली जाणारी बाह्यरुग्ण सेवा (OPD SERVICES) व नियमित आंतररुग्ण सेवा आज बंद ठेवण्यात आली आहे. रुग्णांच्या आरोग्याचा विचार करून आपत्कालीन सेवा बजावणार आहोत जसे की अपघात विभाग, प्रसूती कक्ष, आय सी यु, एन आय सी यु या विभागामध्ये सध्या निवासी डॉक्टर सेवा बाजावतील. सहयोगी व सहायक प्राध्यापकांची अपुरे पदे तातडीने भरणे, अपुऱ्या आणि मोडकळीस आलेल्या वस्तीगृह, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या एक हजार ४३२ जागांची पदनिर्मितीची मागणी यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
नोटबंदीच्या निर्णयावर दोन भिन्न मत दर्शवण्यात आली आहेत. यापैकी एका प्रकरणावर न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती बी. व्ही. नागारत्न करत आहेत. न्यायमूर्ती नजीर, न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती नागारत्न यांच्याशिवाय, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या सदस्यांमध्ये न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांचाही समावेश आहे.
केंद्र सरकार आणि नोटबंदीच्या बाजूने 4 न्यायाधीश आहेत तर बि. व्ही. नागरत्ना या निर्णयाच्या विरोधात निकाल दिला आहे.
नोटबंदी संदर्भात दोन न्यायाधीशांचे वेगवेगळे निर्णय देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी त्यांच्या मतभेदात असे म्हटले आहे की, 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटांची संपूर्ण मालिका बंद करणे हे राजपत्र अधिसूचनेद्वारे नव्हे तर कायद्याद्वारे केले जावे.
आर्थिक निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप होऊ शकत नाही, त्याचबरोबर नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही. केंद्र सरकारने २०१६ मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टाने सोमवारी निकाल दिला. मोदी सरकारने सहा वर्षांपूर्वी हा निर्णय घेताना एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. न्या. एस. ए. नाझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने या प्रकरणावर सोमवारी निकाल दिला.
शेअर बाजारात नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत आहेत. नवीन वर्षाच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत आहेत. आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 60,800 च्या पुढे तर निफ्टी 18100 च्या पुढे पोहोचला.
8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात नोटाबंदीची घोषणा केली. ज्यामध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी 7 डिसेंबर रोजी केंद्र आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) यांना 2016 मध्ये 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयाशी संबंधित रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिले होते. अशा निर्णयांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी न्यायालयाला नियम तयार करण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्यावर आज न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.