राज्याची पोटनिवडणूक, ईशान्येतील विधानसभा अन् देश-विदेशातील अपडेट्स वाचा एका क्लीकवर

देशासह राज्यातील दिवसभरातील घडामोडी पाहा एका क्लिकवर
PM Modi
PM Modi
Updated on

आता पुस्तकांमध्ये लिहिण्याची सोय! वह्यांपासून मुक्ती

आता पुस्तकांमध्येच वह्यांची पान देण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं घेतला आहे. इयत्ता तिसरी ते दहावीच्या पुस्तकांमध्ये हा बदल केला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची आता वह्या वापरण्याची गरजच पडणार नाही.

"देशाला आम्ही राजकारणाची नवी संस्कृती दिली" - PM मोदी 

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये आज विधानसभेचा निकाल लागला. यामध्ये भाजपनं विजय मिळवला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच देशाला आम्ही राजकारणाची नवी संस्कृती दिली असंही ते म्हणाले.

मुंबईत एडलवाईज ग्रुपवर "इन्कम टॅक्स'ची छापेमारी

मुंबईतील एडलवाईज ग्रुपची कार्यालये आणि ठिकाणांवर 'इन्कम टॅक्स' विभागानं छापेमारी केली आहे. अद्यापही ही छापेमारी सुरु असल्याचं एएनआयनं म्हटलं आहे.

नव्या हक्कभंग समितीची उद्या बैठक

नव्या हक्कभंग समितीची उद्या दुपारी १२.३० वाजता बैठक पार पडणार आहे. यानंतर खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करायचा की नाही तसेच यावर काय कारवाई करायची याबाबत निर्णय होणार आहे.

पराभवानंतर संजय काकडेंचा देवेंद्र फडणवीसांना मेसेज

कसब्यात जो पराभव घडलेला आहे, त्या परभावाची नैतिक जबाबदारी माझी देखील आहे. त्यामुळेच मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच याबाद्दल जी काही कारवाई करायची असेल ती माझ्यावर करू शकता, असा मेसेज मी त्यांना पाठवला आहे, असं भाजप नेते संजय काकडे यांनी म्हटलं आहे.

चिंचवडमध्ये पैशाचा मोठा वापर झाला - नाना काटे

चिंचवड पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर मविआचे उमेदवार नाना काटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चिंचवडमध्ये पैशाचा मोठा वापर झाला, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळं आम्हाला फटका बसल्याचंही ते म्हणाले.

नागालँडमध्ये महिलांसाठी आजचा मोठा दिवस!

नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत इतिहास रचला आहे. राज्यात पहिल्यांदाच कोणत्या महिला उमेदवारानं विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. यामध्ये दीमापूर तृतीय विधानसभेच्या हेकानी जखालू यांनी विजय मिळवला. हेकानी यांना भाजपा आणि एनडीपीपी युतीनं उमेदवारी दिली होती. तसेच याच युतीची आणखी एक महिला उमेदवार सलहुतुनू क्रुसे यांनीही पश्चिम अंगामी जागेवरुन विजय मिळवला.

राहुल गांधींनी भारत जोडोमध्ये विनाकारण वेळ घालवला - आठवले

ईशान्य भारतात पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली विकास करतोय त्याचा परिणाम आपण आज पाहिला. आता आम्ही २०२४च्या निवडणुका देखील जिंकू. राहुल गांधींनी उगाचच 'भारत जोडो यात्रा' केली. काँग्रेस आता तुटत चालली आहे. त्यांनी त्रिपुराची निवडणूक हारली, अशी प्रतिक्रिया रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली आहे.

"हारकर जीतने वाले को...", भाजप प्रदेशाध्यक्षांचं सूचक ट्वीट

नागालँडमध्ये भाजपा आणि एनडीपीपी ३९ जागांसह आघाडीवर आहे. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी सूचक ट्वीट केलं आहे. ट्वीट करत तेमजेन इम्ना अलॉन्ग म्हणाले की, हारकर जीतने वाले को…. कहते है!

नागालँडमध्ये आठवले गटाचे २ उमेदवार विजयी

तारीख पे तारीख; सत्तासंघर्षावर पुन्हा मंगळवारी सुनावणी

सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे.

राज्यपालांनी कोणती चूक केली? कौल यांचा सवाल

जर सरकारला बहुमत गमवावे लागले आणि एक गट येऊन म्हणतो की आमच्याकडे बहुमत आहे, तर शिंदे गटाला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी बोलावून राज्यपालांनी कोणती चूक केली? असा सवाल कौल यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे यांची सरप्राईज एन्ट्री

सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा शेवटचा दिवस आहे. शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे यांची सरप्राईज एन्ट्री झाली आहे. साळवे लंडनमधून ऑनलाईन पद्धतीने युक्तिवादात सहभागी झाले आहेत. विधिमंडळ आणि राजकीय पक्ष यांच्यात कृत्रिम भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आमचे प्रकरण नाही. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांनी हातात हात घालून जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा युक्तिवाद कौल यांनी केला आहे.

त्रिपुरात भाजपाने पार केला बहुमताचा आकडा

त्रिपुरात भाजपा पुन्हा सत्तेत येणार असल्याचं दिसत आहे. भाजपाने बहुमताला लागणारा ३१ चा आकडा पार केला आहे. भाजपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. तर, कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ) ११ आणि टिपरा मोथा पार्टी ११ जागांवर पुढं आहे.

नागालँडमध्ये एनडीपीपीने पार केला बहुमताचा आकडा नागालँडमध्ये

भाजपा मित्रपक्ष असलेली एनडीपीपी पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. एनडीपीपी ३७ जागांवर आघाडीवर आहे. तर, मेघालयात एनपीपी २६ जागांवर पुढं आहे. काँग्रेस ५ आणि भाजपा ६ जागांवर मेघालयात समाधान मानावं लागत आहे. अद्यापही मेघालयात स्पष्ट बहुमत कोणाला मिळालं नाही.

नागालँडमध्ये भाजपला बहुमत; त्रिपुरात चढ-उतार

एनडीपीपी – १८

काँग्रेस – ५

एनपीपी – १

जनता दल ( युनायटेड ) – २

त्रिपुरातात भाजपची काय स्थिती

भाजपा – ३०

टिपरा मोथा पार्टी – ११

कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ) – ११

काँग्रेस – ६

मुख्य निवडणुक आयुक्तांबाबात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मुख्य निवडणुक आयुक्तांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुक आयोगाच्या आयुक्तांची नेणुक समिती करणार.

त्रिपुरात काँग्रेस-डाव्यांच कमबॅक; भाजपला धक्का

त्रिपुरात अचानक आकडेवारीत बदल झाला आहे. सुरुवातीला ४० जागांवर आघाडीवर असलेली भाजपा आता २९ जागांवर पुढं आहे. बहुमतासाठी ३१ जागांची गरज आहे.

मेघालय आणि नागालँमध्ये काँग्रेसची पिछाडी

नागालँडमध्ये एनडीएचा घटकपक्ष एनडीपीपी ३७, एनपीएफ ८ आणि काँग्रेस २ तर अपक्ष १३ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. मेघालयात एनपीपी २७, काँग्रेस ५ आणि भाजपा ७ जागांवर आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे.

त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप आघाडीची घौडदौड

त्रिपुरात भाजपा ३९ जागांवर आघाडीवर आहे. तर, कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ) १५, टीएमपी ६ जागांवर पुढं आहे. नागालँडमध्ये एनडीचा घटकपक्ष असलेला एनडीपीपी ५०, एनपीएफ ६, तर काँग्रेस एक जागेवर आघाडीवर आहे. मेघालयात एनपीपी २२, भाजपा १०, टीएमसी १०, यूडीपी ८ आणि काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्रिपुरा पाठोपाठ नागालँडमध्येही भाजपची आघाडी

त्रिपुरामध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठी मतमोजणी सुरु आहे.. भाजपा सध्या 36 जागांवर आघाडीवर आहे. नागालँडमधील विधानसभा निवडणुकीतही भाजपचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या 60 जागांवर NDPP चा कलानुसार दबदबा आहे.

त्रिपुरात भाजपकडे मोठी आघाडी; सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूने

त्रिपुरात भाजपाने मोठी आघाडी घेतल्याचं दिसत आहे. ६० पैकी ३४ जागांवर भाजपावर आघआडीवर आहे. तर, टिपरा मोथा पार्टी ( टीएमपी ) ५ जागांवर तर तृणमूल काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर असल्याचं समोर येत आहे.

नागालँडमध्ये १८३ उमेदवारांनी लढली निवडणूक

नागालँड विधानसभेसाठी १८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ६० जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान पार पडलं. येथे १३ लाख मतदार असून, ८२.४२ टक्के मतदान झालं होतं.

मेघालय विधासभेच्या ६० जागांसाठी मतदान पार पडलं आहे. येथे २१.६ लाख मतदान असून, ३६९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये ३६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. तृणमूल काँग्रेस आणि अन्य राज्यस्तरीय पक्षांनी या निवडणुकीत मोठी लढत दिली होती.

त्रिपुरात ६० जागांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान पार पडलं आहे. एकूण २५९ उमेदवारांनी आपलं नशीब या निवडणुकीसाठी आजमावलं होतं. येथे ८१.१ टक्के मतदान झालं. राज्य मुख्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष गित्ते किरणकुमार दिनकारो यांनी सांगितल्यानुसार, ३ हजार ३३७ मतदान केंद्रावर मतदान झालं होतं. यामध्ये ११०० मतदान केंद्र संवेदनशील आणि २८ अतिसंवेदनशील होती.

पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये आज निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी 8 वाजता या तिन्ही राज्यात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आज सत्तासंघर्षावरील सुनावणीचा तिसरा दिवस आहे. सरन्यायाधीशांनी आज युक्तिवाद पुर्ण करण्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच थोडा वेळ रिजाँईडरसाठी ठाकरे गटाला मिळणार. यासोबतच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. काल संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अधिवेशन चांगलच गाजलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()