महाविकास आघाडीसोबत एकनाथ शिंदे व शिंदे गटातील त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या विश्वासघाताला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे राज्यभरात आजचा दिवस 'गद्दार दिवस' म्हणून साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही गद्दार दिनानिमित्त आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिस प्रशासनाकडून वापरल्या जात असलेल्या दबावतंत्राचा पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी निषेध केला. रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळत नसेल तर ही दडपशाहीच म्हणावी लागेल. आम्ही नेहमी लढत राहणार यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. महाराष्ट्र कधी झुकलेला नाही आणि झुकणारही नाही. जे गद्दार असतील त्यांना गद्दार म्हणायची ताकद आमच्यात आहे, पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकावं, आम्ही जेलबंद आंदोलनही करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे सोलापूर रस्त्यावर 93 मॉल च्या समोर दुचाकी चालकाच्या एका चुकीमुळे विचित्र अपघात घडला आहे. एका मागून एक अशा चार वाहनांची धडक झालेली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. यात मारुती कारचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. असून वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.
दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करण शोभत नाही. दुध का दुध पाणी का पाणी होईल. गेले १५- २० वर्ष मुंबई महापालिकेच्या पैशावर डल्ला मारला त्यांच्यावर कॅगने ताशेरे ओढले आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. लोकांच्या समोर सत्य आले पाहिजे, मुंबई महापालिकेचे फिक्स डिपॉझिट कमी केलं असं म्हटलं जातंय, जेव्हा सरकार आलं ते ७७ हजार कोटी होतं आता ते ८८ हजार कोटी आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
1 जुलै रोजी महानगरपालिकेवर विराट मोर्चा काढणार - उद्धव ठाकरे
या मोर्चमद्धे ठाकरे गटाचे नेते सहभागी होणार
सरकारकडून क्लीनचिट देणं सुरू आहे
शिंदेंना नोटिसा येत आहेत म्हणून दिल्लीच्या वाऱ्या सुरू
मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात खाजगी बस आणि कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 3 ठार, किमान 10 जखमी झाले आहेत.
वसतिगृहातील मुलींना रात्री पर्यटकांसमोर नाचवले असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये पाहायला मिळाला. या प्रकरणी संस्थेचे चालक आणि शिक्षिकेविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारला कलाकारांची किंमत नसते. राज ठाकरे जहांगीर आर्ट गॅलरीतून बोलत होते. आपल्याकडे उत्तम चित्रकार आहेत. शिल्पकार आहेत. त्यांना सरकारनं प्रोत्साहित केलं पाहिजे. प्रदर्शनासाठी सरकारनं केंद्र उभारलं पाहिजे. असं मत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने आज ठाकरे गटाकडून गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याच दरम्यान ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलींसानी ताब्यात घेतलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज गद्दार दिन साजरा करण्यात आला. नाशिक शहरातील मुंबई नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयासमोर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. '50 खोके एकदम ओके' अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक खोके देखील आंदोलनाच्या ठिकाणी ठेवण्यात आले होते.
पुणे शहरातील कारागृहातुन मोठी बातमी समोर आली आहे. येरवाडा कारागृहात दोन गटात तुफान राडा झाला आहे. वर्चस्व वादातून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी येरवाडा पोलिसांनी 16 कारागृहातील कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेना आजचा दिवस म्हणून स्वाभिमान दिन साजरा करणार आहे तर ठाकरे गट जागतिक खोके दिन म्हणून पाळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 20 जून गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तर आजचा दिवस म्हणजे 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, या मागणीचे पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला (युनो) लिहिले आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन,आषाढी वारी, मान्सून, चक्रीवादळ या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.