बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आणि उपमुख्यमंत्री तेजस्वि यादव हे उद्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेणार आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आणि शहरातील केआर सर्कल भागातील जलमय अंडरपासमध्ये बुडून मृत्यू झालेल्या 23 वर्षीय महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
साताऱ्याच्या आणेवाडी टोलनाक्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. या कोंडीमुळे गाड्यांची पाच किलोमीटडर पर्यंत रांग लागली आहे. चालक देखील संतापले आहेत.
जम्मू-काश्मीर: रियासी जिल्ह्यातील कटरा येथील मुरी भागात बसला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले. तीव्र वळणामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 24 मे रोजी उद्धव ठाकरे आणि 25 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार असून दिल्लीतील बदलीबाबत केंद्राच्या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी पाठिंबा मागणार आहेत.
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सुट्टी संपवून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांमुळे ही कोंडी झाली आहे. लोणावळा एक्झिटला वाहनांच्या ४ ते ५ किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.
पक्षातील अंतर्गत गटबाजी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या पक्षांतर्गत बैठकांसाठी राज ठाकरे नाशिक मध्ये आले होते.
या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांनी शेतकरी संघटना, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, वास्तु विशारद, ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या देखील भेटी घेतल्या.
मनसेच्या नाशिक शहराध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर कोणाची नेमणूक होते याची सर्वांना उत्सुकता होती.
सह पक्षात नवीन नेमणूक देखील राज ठाकरे करतील का याबाबत सर्वत्र चर्चा होती.
मात्र या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.
शाखाध्यक्षपदासाठी उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या.
यासह नवीन कार्यकारणी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
पुढच्या पंधरा ते वीस दिवसात राज ठाकरे पुन्हा नाशिक दौऱ्यावर येणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महिन्याच्या शेवटची अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती देखील पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही फॉर्मची किंवा कोणत्याही ओळख प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही. एसबीआयकडून मुख्य कार्यालयांना पाठवलेल्या पत्रात हे स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रलंबित असून, ही निवडणुक घ्यायला तुमची का फाटते असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तर न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक का ठेवता असेही संजय राऊत म्हणाले आहे.
राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा काँग्रेसचे नेते वारंवार व्यक्त करत असतात. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अशीच इच्छा बोलून दाखवली आहे.
सध्या पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेसाठी हिरोशिमाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या चर्चेत त्यांनी भारत-यूके एफटीए वाटाघाटींमधील प्रगतीसह द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला. दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसारख्या विस्तृत क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यावरही सहमती दर्शवली.
चौकशीला जाण्यापूर्वी समीर वानखेडे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले आहेत. यावेळी प्रतिक्रिया देताना वानखेडे म्हणाले की, चौकशीला सामोरे जायचे आहे. विजय सत्याचाच होईल
पुणे- नगर मार्गावर आज पहाटे लोणीकंद येथे एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. यात बस पलटी झाली असून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. काही प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शहरात नगर परिषदेच्या कचरा डेपोला आग लागली आहे. पुणे जिल्ह्यात इंदापूर शहरातील ज्योतिबा माळ परिसरातील इंदापूर नगरपरिषदेच्या कचरा डेपोला शनिवारी रात्री उशिरा आग लागली.
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनचे अंदमानात निर्धारित वेळेत आगमन झाले असून, लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये आगमन झाल्यानंतर अडथळाविना पुढेही प्रवास कायम राहिल्यास मॉन्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात धडकण्याची शक्यता आहे.
एका ऑईल वाहून नेणाऱ्या टँकरमधून ऑईल गळती झाली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी आरटीओ चेकपोस्टजवळ ऑईल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. एका ऑईल वाहून नेणाऱ्या टँकरमधून ऑईल गळती झाली. यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात ऑईल सांडले आहे.त्यावरून घसरून एक बाईकस्वार जखमी झाला आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.