पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारच्या धोरणांमुळे आज ईशान्येकडील मोठ्या संख्येने युवक विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत आणि आसाम शांतता आणि विकासाच्या एका नवीन पर्वाचा साक्षीदार आहे. आसाम सरकारने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.
कर्नाटकचे माजी DGP प्रवीण सूद यांनी आज औपचारिकपणे केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या संचालकपदाचा पदभार स्वीकारला.
MPSC प्रवेशपत्र व्हायरल प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मुख्य आरोपी रोहित कांबळे याला अटक करण्यात आली. हा १९ वर्षाचा मुलगा आहे. हा पुण्यात शिक्षण घेतो.
सध्या लोकशाहीवर आघात होत आहे. दिल्ली सारखी परिस्थिती संपूर्ण देशात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं आपला पाठींबा असेल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दिल्लीच्या जनतेसोबत अन्याय - अरविंद केजरीवाल
शरद पवार यांची मी भेट घेतली. दिल्लीच्या लोकांवर अन्याय होत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकराची अधिकार काढून घेतले. मात्र कोर्टाने आम्हाला पुन्हा अधिकार दिले.
थोड्याच वेळात अरविंद केजरीवाल शरद पवारांची भेट घेणार आहेत. केजरीवाल दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
गुवाहाटी (आसाम): केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांचे स्वागत केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले आहेत. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातील विविध योजनांमध्ये लाभार्थी देखील मुख्यमंत्री उपस्थिती लावणार आहेत.
बेस्ट बेकरी प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत १४लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१.२५टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९६.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी९३.३४ टक्के इतकी आहे.
राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी. १४लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.९७ टक्क्यांनी घट झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत १४लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१.२५टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९६.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी९३.३४ टक्के इतकी आहे.
राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी. १४लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.९७ टक्क्यांनी घट झाली आहे.सर्व विभागीय मंडळातून ९३.७३ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून ८९.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ४.५९ टक्क्यांनी जास्त आहे.
सर्व शाखांमधून ३५ हजार ५८३ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६ हजार ४५४ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ८२.३९ आहे.
नितीन गडकरी मनोहर जोशींच्या भेटीला गेले आहेत.
हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर शंभर ते दीडशे मेंढ्यांचा देखील मृत्यू झाला आहे.
आम्ही विरोधक नव्हे तर देशभक्त आहोत.
राष्ट्रपतींचा अधिकार डावलू नका. आमचा नव्या संसग भवनाला विरोध नाही. पंतप्रधानांनी उद्घघाटन सोहळ्याला राष्ट्रपतींना निमंत्रण द्याव. राष्ट्रपतींना निमंत्रण नसल्याने आमचा विरोध
देशभक्तांना दिल्लीत बोलवत नाहीत. गद्दारांची गाडी चालवण्याची फडणवीसांवर वेळ.
नवीन संसद भवन उभारलं यांचा आनंद आहे.
साप आणि नागाची देशात पुजा केली जाते. आपल्या देशात लोकशाीचा मृत्यू झाला आहे. देशातील लोकशाही मेदी जगात कसाल डंका वाजवत आहात.
आज 25 मे गुरुवारी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. आज अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाणार असून निकालासंदर्भात विस्तृत माहिती देण्यात येणार आहे. तसेच, विभागनिहाय टक्केवारीही पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता बारावीचे विद्यार्थी निकाल ऑनलाईन पाहू शकणार आहेत.
दिल्ली सरकारला अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून बदलला. हाच केंद्र सरकारचा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवालांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटी घेत आहेत. त्या अंतर्गत केजरीवाल आज शरद पवारांची दुपारी 3 वाजता, वाय बी चव्हाण सेंटरवर भेट घेणार आहेत.
पुण्यात टिंबर मार्केट येथे लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. अग्निशामन दल आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशामन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.