दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स
sakal breaking notifiction
sakal breaking notifictionesakal
Updated on

अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येताच राष्ट्रवादी करणार जंगी स्वागत

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. न्यायालयानं जामीन दिल्यानंतर उद्या अनिल देशमुखयांची तुरुंगातून सुटका होणार आहे. देशमुख यांच्या सुटकेमुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. पक्षाच्या वतीनं उद्या अनिल देशमुख यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

sakal breaking notifiction
Anil Deshmukh: अनिल देशमुखांना मोठा दिलासा; उद्या तुरुंगाबाहेर येणार

गिरीश महाजन यांना मिळणार नवी जबाबदारी? अजित पवारांनी टाकलं सांगूनच

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश महाजन यांची चांगलीच फिरकी घेतली, अजित पवार म्हणाले गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही तर त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी द्यायची ठरलं आहे. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्ष वाढवण्यासाठी जाणार आहे, त्यांचा संपर्क तसा आहे, युनायटेड नेशनची जबाबदारी महाजन यांना देऊ म्हणून पवार यांनी तूफान टोलेबाजी केली.

मी मनावर घेतलं तर…’, अजित पवार कोणाच करणार करेक्ट कार्यक्रम

सप्टेंबर महिन्यात भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपचे एक नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत जावून घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या वल्गना केली होती. त्यावर अजित पवार म्हणाले मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल”, असा इशारा विधानसभेत उघडपणे त्यांनी दिला.

LIVE Update : उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारचं केलं अभिनंदन

महाराष्ट्राची कर्नाटक व्याप्त 865 गावं महाराष्ट्रात आणणारच, तोपर्यंत सीमावर्तियांसाठी विविध योजना राबवणार असल्याचा ठराव आज महाराष्ट्राच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी सरकारचं अभिनंदन केलं आहे.

sakal breaking notifiction
Winter Session: उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारचं केलं अभिनंदन,म्हणाले...

शरद पवार रुबी रुग्णालयात जयकुमार गोरेंच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रुबी रुग्णालयात जाऊन भाजप आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेतली आहे. दोन दिवसापूर्वी जयकुमार गोरे यांचा मलठण येथे अपघात झाला होता. त्यानंतर पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे

sakal breaking notifiction
Jaykumar Gore: शरद पवारांनी रुग्णालयात जात आमदार जयकुमार गोरेंची घेतील भेट

अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा 

अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआय ची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. अनिल देशमुख यांच्या जामीनाची स्थगिती वाढवण्याची मागणी फेटाळली आहे.

sakal breaking notifiction
Anil Deshmukh: अनिल देशमुखांना मोठा दिलासा; उद्या तुरुंगाबाहेर येणार

अध्यक्ष महोदय, तुम्ही इंग्रजी माध्यमाचे, पण सीमाप्रश्नी ठरावात अनेक चुका : अजित पवार

आज कर्नाटकविरोधात ठराव मांडण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. आज दुपारी २ वाजता सीमावादावर ठराव मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आमचा सीमावादाच्या ठरावाला पाठिंबा आहे. ठराव एकमतानं मंजूर करु असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

सायबर चोरट्यांनी आय टी कंपनी मध्ये काम करणाऱ्याला घातला २७ लाख रुपयांना गंडा

सायबर चोरट्यांनी आय टी कंपनी मध्ये काम करणाऱ्याला घातला २७ लाख रुपयांना गंडा घातला आहे. वडिलांचे आजारपण आणि पत्नीविरोधातील घटस्फोटाचा खटला, यासाठी ४० लाखांचे कर्ज काढण्याचा प्रयत्न पुण्यातील आय टी तरुणाला भोवला आहे. ४० लाखांच्या कर्जासाठी तरुणाकडून सायबर चोरट्यांनी तब्बल २७ लाख ४५ हजार रुपये लांबवले आहेत. याबाबत ३६ वर्षाच्या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा सगळा प्रकार मार्च २०२० ते मे २०२२ दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका आय टी कंपनी मध्ये काम करत आहेत. २ वर्षापूर्वी त्यांचे वडील आजारी होते. तसेच त्यांनी पत्नीविरुद्ध न्यायालयात दिवाणी दावा टोठवला या दरम्यान पैश्यांची गरज असल्याने कमी व्याज दरात ४० लाख रुपये देतो असे एका फायनान्स कंपनीकडून त्यांना सांगण्यात आलं. कर्जासाठी त्यांच्याकडून सगळी कागदपत्रे घेण्यात आली इतकंच नाही तर कर्जासाठी प्राथमिक रक्कम म्हणून दीड लाख रुपये ऑनलाईन पाठवा असे सांगितले. सायबर चोरट्यांनी शिताफिने त्यांचा विश्वास बसावा यासाठी एक लोन नंबर दिला आणि बँकेचा कॅन्सल चेक देखील मागवण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या शौर्य दिनासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी

कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या शौर्य दिनासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जयस्तंभला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी दाखल होतात. 1 जानेवारीला खराडी ते शिक्रापूर मार्ग त्याचबरोबर या परिसरातील रस्तेही वाहतुकीसाठी राहणार बंद राहणार आहेत. पुणे शहरातील ३५००-४००० पोलिस तैनात असणार आहेत. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सी सी टिव्ही द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहेत. अनुयायी यांच्यासाठी १८० पी एम पी एल बसेस सेवेत राहणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण लाईव्ह पाहता येणार आहे. अनुयायी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, वैद्यकीय कक्ष देखील उभारण्यात येणार आहेत.

सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

खटला लढण्यासाठी कायदेतज्ज्ञांची नियुक्ती- मुख्यमंत्री शिंदे

कर्नाटक सीमाप्रश्नावर ठरावाचं वाचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरु आहे. यावेळी शिंदे यांनी खटला लढण्यासाठी कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती दिली. तसेच कर्नाटक सरकारच्या वर्तनाचा निषेध.

सीमावादावर दुपारी ठराव मांडणार; फडणवीस यांनी दिली माहीती

आज कर्नाटकविरोधात ठराव मांडण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. दरम्यान आज दुपारी म्हणजेच दुपारी २ वाजता सीमावादावर ठराव मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आमचा सीमावादाच्या ठरावाला पाठिंबा आहे. ठराव एकमतानं मंजूर करु असही फडणवीस यावेळी म्हणाले.

पुण्यातील टिळक चौकात काँग्रेसकडून आंदोलन

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. सिल्लोड कृषी व क्रीडा महोत्सवासाठी कृषी विभागातील सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यातुन कोट्यवधी रुपयांची वसुली करणाऱ्या खंडणीखोर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केला आहे. यावेळी काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते.

'भ्रष्ट मंत्र्यांना सोबत घेऊन त्यांचं ओझं बाळगत पुढं सरकार टिकवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अशक्य'

विधानसभेत लोकशाहीची रोज हत्या होत आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबरोबर मंत्री संजय राठोड, मंत्री उदय सामंत यांच्याच नाही तर आणखीही मंत्री समोर येतील. त्यांचे कारनामे येतील. शिंदे फडणवीस सरकार अडचणीत आहे. शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या सर्व आमदारांचे कामांचे बॉम्ब फुटणार आहेत हे सरकार अडचणीत आहे. त्याचबरोबर आमदारांच्या लवंगी फटाके आज फुटणार आहेत असं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले आहेत.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर सरकारने बोटचेपी भूमिका घेऊ नये. सरकारने तयार केलेला प्रस्ताव प्रभावी नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. सध्या संपूर्ण सरकार अडचणीत आहे या भ्रष्ट मंत्र्यांना सोबत घेऊन त्यांचं ओझं बाळगत पुढं सरकार टिकवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अशक्य असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत.

अधिवेशन सभागृहाच्या पायऱ्यांवर मविआ आघाडीचं गजर आंदोलन  

अधिवेशन सभागृहाच्या पायऱ्यांवर मविआ आघाडीचं गजर आंदोलन करण्यात आलं आहे.

'अब्दुल सत्तार यांच्याबद्दल पुरावे मिळाल्यामुळे राजीनाम्याची मागणी' : अजित पवार

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबद्दल गायरान जमीन घोटाळ्याचे पुरावे मिळाल्यामुळे राजीनाम्याची मागणी करत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे. वाशिम येथील कथीत जमीन घोटाळाप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.