उद्धव ठाकरे यांची निवडणुक आयोगावर जोरदार टीका केली आहे. ते मराठी भाषा दिना निमित्ता बोलताना म्हणाले, निवडणूक आयोग बोगस आहे. निवडणूक आयोग हे चूना लावू आयोग आहे.
नागपूर-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण जागीच ठार तर दोन जखमी झाला आहे. अपघातात दोघांना दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पीएम मोदींनी कर्नाटकातील बेळगावी येथे पीएम-किसान योजनेंतर्गत 16,000 कोटींहून अधिक रुपयांचा 13 वा हप्ता जारी केला
दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सिटी कोर्टात हजर केले.
सीबीआयने मनीष सिसोदिया यांची पाच दिवसांची कोठडी मागितली आहे.
मनीष सिसोदीया यांच्या अटकेनंतर आप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. देशभरात आप आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.
राज्यपाल रमेश बैस यांना चुकीची माहिती पुरवल्याचा संशय आहे. कारण कर्जमाफी किंवा उद्योगांबद्दल राज्यपालांनी जे सांगितलं ते चुकीचं आहे. राज्यपालांची दिशाभूल होत आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले.
विधान परिषदेचं आजच्या दिवसभराच कामकाज संपलं आहे. उद्या दुपारी 12 वाजता कामकाजाला सुरुवात होणार आहे.
मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात बसले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणासाठी सभागृहात येऊन बसले. सुरक्षारक्षकांनी आत कसे काय सोडले ? असा प्रश्न निर्माण होत आहे आदित्य ठाकरेंनी नंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर ते उठून बाहेर गेले.
सिमभागतील लोकांसाठी राज्य सरकारच्या विविध योजना
75 हजार युवकांसाठी नोकरी भरत्या
राज्यात विविध क्षेत्रात भारती सुरू
जानेवारी 2023 मध्ये 1 लाख 35 हजारांच्या गुंतवणुकीचे करार
मराठा समाजासाठी राज्य सरकारच्या विशेष योजना
युवकांसाठी गडचिरोली, गोंदियामध्ये प्रशिक्षण केंद्र
पेन्शन योजनेतही राज्य सरकारकडून बदल
मैत्री योजनेतून अनेक सुविधा उपलब्ध
सरकारने मेट्रोच्या अनेक नव्या योजना हाती घेतल्या आहेत.
मुंबईकरांसाठी आपला दवाखाना योजना राबवली
छ. शिवाजी महाराज टर्मिनसपासून मेट्रो प्रकल्प
आर्थिक सल्लागार समितीची घोषणा
सी-लिंकचं काम तातडीने पूर्ण करणार
राज्याचे राज्यपाल रमेश बैस विधानभवनात दाखल झाले आहेत.
दिल्ली हायकोर्टाने अग्निपथ योजनेला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.
आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली आहे.
माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास- उदय सामंत
सार्वजनिक बांधकाम -शंभूराज देसाई
मृदू व जनसंधारण - दादा भुसे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य -संजय राठोड
मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन - तानाजी सावंत
अल्पसंख्यांक विकास- अब्दुल सत्तार
पर्यावरण व वातावरणीय बदल- दीपक केसरकर
माहिती व जनसंपर्क- संदिपान भुमरे
सामान्य प्रशासन, परिवहन -गुलाबराव पाटील
आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. तर, अनेक मुद्द्यांवर अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असून ठाकरे गट शिंदे सरकारची कशाप्रकारे अधिवेशनात कोंडी करतं याकडे पाहावं लागणार आहे.
मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. 2 मार्च रोजी मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यांचे निकाल जाहीर होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव भागातील मिटमिटा परिसरात रविवारी रात्री 9.50 वाजता अचानक आग लागली. अंदाजे सात एकरमध्ये असलेल्या एका मंडपाच्या गोडाऊनला ही आग लागली होती. आगीचे प्रमाण अधिक असल्याने शहरातील वेगवेगळ्या भागातून एकूण 10 अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल दीड तासाने म्हणजेच 11.20 वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळाले.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.