कल्याण कसारा दरम्यान रेल्वे सेवा खोळंबली आहे. वासिंद स्टेशनदरम्यान सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याण कसारा मार्गावरील ट्रेन एक ते दीड तास उशिरा चालत आहे. त्यामुळे कामावरून घरी परतत असलेल्या चाकरमाण्याचे हाल होत आहेत.
वंदे भारत एक्सप्रेस गोवा-मडगाव-मुंबई च्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीएसएमटी स्थानक येथे पोहचले.
"मडगाव-मुंबई" वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मडगाव रेल्वे स्थानकावरून दूरदृष्टी प्रणालीद्वारे करण्यात आले.
यावेळी या वंदे भारत एक्सप्रेस स्वागत करण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहेत
उद्या तीन वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबात जागा वाटप होण्याची शक्यता आहे.
20 जून रोजी, NCB-मुंबईने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणारी सिंडिकेट फोडली ज्यामध्ये विदेशी पोस्ट ऑफिस-मुंबई येथून एका पार्सल खेपातून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 996 ग्रॅम MDMA वजनाच्या सुमारे 2000 गोळ्या जप्त करण्यात आल्या. नेदरलँडमधून आणलेली औषधे कॅनमध्ये लपवून ठेवली होती. जप्त केलेली औषधे डार्कनेट आणि क्रिप्टोकरन्सी पेमेंटद्वारे मागविण्यात आली होती
२६ जून रोजी नालासोपारा येथे जॉन संडे नावाच्या आफ्रिकन नागरिकाची ओळख पटली. घराची झडती घेतली असता, त्याच्या बनावट छायाचित्रासह बनावट भारतीय पासपोर्ट सापडला. चौकशीदरम्यान जॉनने कबूल केले की त्याने हे औषध दिल्ली, मुंबई, गोवा आणि इतर शहरांमध्ये वितरणासाठी आणले होते. संपूर्ण भारतातील त्याच्या स्थानिक सहकाऱ्यांची चौकशी केली जात आहे:
IMD ने 28 जून साठी रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा साठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेसने छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिडे गुरूजींच्या पुतळ्याला जोडे मारत हे आंदोलन करण्यात आले.
जम्मू-काश्मीर : कुलगाम चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आहे. शस्त्रास्त्र आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. सुरक्षा दलांनी आज चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्याचे नाव आदिल मजीद लोन असे आहे.
अभियंता मारहाण प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या चार जणांना अकरा तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे ते आता सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहेत.
जळगाव दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काळे झेंडे दाखवणाऱ्या रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री जळगाव दौऱ्यावर पोहचणार आहेत. आज जळगावात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
केसीआर यांनी आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर सरकोली गावात जाहीर सभा घेतली. या सभेत भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश झाला. यावेळी बोलताना केसीआर यांनी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांवर खोचक शब्दांत टीका केली. “महाराष्ट्रातील राजकारणी मला म्हणतायत इथे या, दर्शन घ्या, पण राजकारण करू नका. मला हे समजत नाही, आम्ही आत्ता कुठे महाराष्ट्रात सुरूवात केली. पण महाराष्ट्रातील या सगळ्या पक्षांमध्ये एवढी भीती का आहे? एवढ्या छोट्या पक्षासाठी एवढा गोंधळ का घालत आहात? कोणताच पक्ष आम्हाला सोडत नाही सर्व पक्ष आमच्यावर टीका करत आहेत. भाजपा, काँग्रेस बोलत आहेत. काँग्रेसनं आम्हाला भाजपाची बी टीम म्हटलं. भाजपाने आम्हाला काँग्रेसची ए टीम म्हटलं असं केसीआर म्हणालेत.
दर्शना पवार हत्याकांड ताजं असतानाच आता पुण्यात आणखी एका तरुणीवर कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे.एकतर्फी प्रेमातून या तरुणानं तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याच्या सदाशिव पेठ भागातील ही घटना आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
विक्रोळी मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या उड्डाण पुलावर एक डंपर ब्रिजच्या कॉर्नरला असलेला डिव्हायडर वर चढल्यामुळे या ठिकाणी एका रिक्षाचा देखील अपघात झाला गेल्या दोन तासापासून या ठिकाणी वाहतूक मंदावली आहे. सुदैवाने या अपघातात दोन्ही चालक यांना दुखापत झाली नाही मात्र सकाळची कार्यालयाची वेळ असल्यामुळे चाकरमानांना याचा नाहक त्रास होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी ते राणी कमलापती रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भोपाळ-इंदोर, भोपाळ-जबलपूर, रांची-पटना, धारवाड-बेंगळूरू आणि गोवा-मुंबई या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली आहे.
केसीआर पंढरपूरमध्ये पोहचले आहेत. केसीआर विठुरायाच्या दर्शनासाठी पोहचले आहेत. थोड्याच वेळात ते वारकऱ्यांशी संवाद साधणार आहेत . तर आमदार आणि खासदारांनी नामदेव पायरीचे दर्शन घेतले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. लवकरच श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन घेणार आहे. फक्त केसीआर यांनाच व्हीआयपी दर्शन मिळणार आहे. त्याच्यासोबत आलेल्या इतर मंत्री, आमदार, खासदारांना सोडण्यात येणार नाही, मंदिर प्रशासना स्पष्ट केलं आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. आजही हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणसह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज ते आणखी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. ते त्यांच्या संपूर्ण मंत्रीमंडळासह पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. मात्र, फक्त के. चंद्रशेखर राव यांनाच व्हीआयपी दर्शन मिळणार असून त्याच्यासोबत आलेल्या इतर मंत्री, आमदार, खासदारांना सोडण्यात येणार नसल्याचं मंदिर प्रशासना स्पष्ट केलं आहे.
शनिवारी-रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात सोमवारपर्यंत १,१५१ मिमी इतक्या वापरण्यायोग्य पाण्याची वाढ झाली आहे. यंदा मान्सून लांबल्याने मुंबईच नाही तर राज्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठी घट झाली होती. मुंबईकरांना देखील जुलैअखेरपर्यंत पुरेस इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, २ दिवस झालेल्या पावसाने मुंबईकरांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. सोमवारपर्यंत धरणांमध्ये ७९०५६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
शनिवार-रविवारी झालेला पाऊस
२५ जून - ९३.९७२ मिमी
२६ जून - ९५.१२३ मिमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशमध्ये असणार आहेत. यावेळी ते राणी कमलापती रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भोपाळ-इंदोर, भोपाळ-जबलपूर, रांची-पटना, धारवाड-बेंगळूरू आणि गोवा-मुंबई या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे.
हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने धावत आहे. वडाळा स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचा परिणाम हार्बर मार्गावरील लोकलवरती झाला आहे. आज सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वडाळा रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.