मुंबईतल्या सीपी टँक परिसरात आग भीषण आग लागली असून आगीमध्ये दोन दुकाने जळून भस्मसात झाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.
आपचे खासदार संजय सिंग यांनी ज्येष्ठ आप नेते मनिष सिसोदिया यांच्या पत्नी सीमा सिसोदिया यांची भेट घेतली. ते सहा महिन्यांनंतर तिहार जेलमधून बाहेर आले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडूनमध्ये भाजपच्या टिहरी लोकसभा मतदारसंघाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी चित्तोडगढ येथील प्रचार सभेत सत्ताधारी भाजवर कवितेच्या माध्यमातून हल्ला चढवला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून बीडमधून बजरंग सोनावणे यांना तर भिवंडी सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महायुतीचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरला असून या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात आता अर्चना पाटील लढणार आहेत. त्या भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत.
दरम्यान, अर्चना पाटील काही वेळातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेशानंतर धाराशिवमधून त्यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात जर महिलांवरील अत्याचाराच्या आरोपांमध्ये एक टक्का जरी तथ्ये असलं तरी ही बाब गंभीर असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.
आमदार प्रतिभा धानोकर यांनी विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची स्वतःहून दखल घेतली आहे.
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत माजी काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांचा भाजपमध्ये प्रवेश.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात गौरव वल्लभ पोहचले आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.
यवतमाळ- वाशिम मतदारसंघातून भावना गवळी यांना डावलण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पाथर्डी पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल असतानाही तालुक्यातील मढी येथे एका समाजाने जातपंचायत भरवली. यात न्यायनिवाडा करताना प्रेमविवाह केलेल्या मुलीला पंचांनीच मारहाण केली. ही घटना एक मार्च २०२४ रोजी घडली. याप्रकरणी बुधवारी (३ मार्च) मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सहा जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
वंचित बहुजन आघाडी स्वत:हामुळे महाविकास आघाडीपासून दूर झाली आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली.
अमरावतीत नवनीत राणा यांची रॅली सुरु आहे. थोड्याच वेळात त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील.
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ३८ वर्षीय इसमाचे प्राण वाचविण्याचे काम गस्तीवर असलेल्या दोन बीट मार्शलने करीत संवेदनशिलतेची प्रचिती दिली. यावेळी त्याची समजूत काढून घरी रवानगी केली.
नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने जात प्रमाणपत्र ठरवल वैध ठरवले आहे. न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि संजय करोल यांनी हा निर्णय दिला आहे.
नवी दिल्ली - दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे परिवहन मंत्री आणि आप नेते कैलाश गहलोत यांना समन्स बजावले आहे.
Nagpur Son in Law Ended his Life: मध्यप्रदेशातील संपत्ती विकून मेहुण्याजवळ राहणाऱ्या जावयाने मंगळवारी (ता.२) रोजी घर पेटवून आत्महत्या केली. याघटनेत वाचविण्यासाठी गेलेल्या भाच्याचा होरपळून मृत्यू झाला होता. तर भावसासरे श्याम चौधरी गंभीर जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. बुधवारी(ता.३) रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सदर घटना ही अंतर्गत कलहातून झाल्याची चर्चा आहे.
आम्ही नारायण राणे यांचा पराभव केला. आता श्रीकांत शिंदेंचा कल्याणमध्ये पराभव करणारच असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. आज उर्वरीत ४ ते ५ नावांची घोषणा होऊ शकते. सातारा, रावेर, बीड, माढा आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघापैकी किती जागेवर उमेदवार जाहीर करतात, हे पाहणंही महत्वाचं आहे.
संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पत्राद्वारे राजीनामा पाठवला आहे. कालच त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती.
महाविकास आघाडीत तीन जागांचा तिढा सोडविण्यासाठी आज प्रमुख नेत्यांची खलबते झाली. मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाने जाहीर केलेल्या कोणत्याच जागांबाबत फेरविचार करण्यास स्पष्ट नकार दिल्याने जागा वाटपाचा तिढा कायम राहिला.
काँग्रेसने उत्तर मुंबईची जागा लढविण्यास नकार दिला आहे. तसेच मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेने सोडावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने शिवसेनेकडे (ठाकरे गट) केली. सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडीबाबत मार्ग निघू शकला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र बाबत आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार, नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचार सभा देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.