Marathi News Live Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Anurag Thakur China-Congress Link
Anurag Thakur China-Congress LinkSakal
Updated on

भारत नावाला विरोध करणारे नेमके कोण आहेत? अनुराग ठाकुर यांचा संतप्त सवाल

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर म्हणाले की,"भारत नावाला विरोध करणारे नेमके कोण आहेत? आता त्यांना भारत नावाचीही अडचण व्हायला लागलीये"

उद्या दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाची बैठक, मराठा आरक्षाणावर चर्चा होण्याची शक्यता

उद्या दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुथय्या मुरलीधरनच्या आयुष्यावर येतोय चित्रपट, सचिन तेंडुलकरने लाँच केला भन्नाट ट्रेलर

सचिन तेंडुलकर यांनी मुथय्या मुरलीधरन यांच्या आयुष्यावर बनवण्यात आलेल्या '800'या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. यावेळी श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसुर्या हा देखील उपस्थित होता .

आशियान शिखर परिषदेत चीनच्या नकाशाचा मुद्दा उपस्थित केला जाणार

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या १८ व्या आशियान शिखर परिषदेसाठी जकार्ताला रवाना झाले आहेत. या परिषदेत चीनने नव्याने प्रकाशित केल्याचा मुद्दा उचलला जाण्याची शक्यता आहे.

आरक्षण मिळालं नाही, तर जबाबदार मी- संदीपान भुमरे

सध्या अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलन समन्वयक मनोज जरांगे आणि महाराष्ट्र शासनाच्या शिष्टमंडळाची बैठक सुरु आहे. यावेळी 'आरक्षण मिळालं नाही, तर जबाबदार मी' अशी ग्वाही दिली.

संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर अंतरवली सराटीमध्ये दाखल, मनोज जरांगेंची घेतली भेट

शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी मराठा आंदोलनाचे समन्वयक मनोज जरांगे यांची अंतरवली सराटा गावात जाऊन भेट घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जकार्ताला रवाना, १८व्या आशियान शिखर परिषदेत होणार सामील

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जकार्तामध्ये होणाऱ्या १८व्या आशियान (ASEAN) शिखर परिषदेत सामील होण्यासाठी रवाना झाले आहेत.

शरद पवारांच्या जळगाव सभेला कार्यकर्त्यांची गर्दी, रोहित पवार थेट कार्यकर्त्यांमध्ये

शरद पवार यांची नुकतीच जळगावमध्ये सभा पार पडली. यावेळी सभेला कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. यावेळी मंडपात जागा नसल्याने आमदार रोहित पवार कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बसले. या सभेत बसायला जागा नसल्याने गोंधळही निर्माण झाला होता.

कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर सुप्रिम कोर्टाने राखून ठेवला निकाल

२०१९मध्ये केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मिर या राज्याचा विशेष राज्याच्या दर्जा काढून घेत, दोन नविन राज्यांची निर्मीती केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रिम कोर्टात युक्तीवाद करण्यात आला. यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी हा निर्णय राखून ठेवला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून १६ दिवसांनी यावर निर्णय घेतला जाईल

शरद पवारांच्या सभेत गोंधळ, बसायला जागा नसल्याने कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्सवरुन मारल्या उड्या

कार्यकर्त्यांना बसण्यासाठी जागा करुन द्या, असं शरद पवारांनी सांगितल्यानंतर लोकांनी बॅरिकेटवरुन उड्या मारण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

'वाघ हा वाघ असतो, तो कधीच म्हातारा होत नसतो'; जळगावात झळकले शरद पवारांचे बॅनर्स

शरद पवारांच्या सभेआधी जळगावात बॅनर्स झळकले आहेत. वाघ हा वाघ असतो तो कधीच म्हातारा होत नाही, सत्तेसाठी नाही साहेबांच्या सन्मानासाठी आम्ही सारे साहेबांच्या पाठीशी, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे.

जळगावमध्ये शरद पवारांचा रोड शोला सुरुवात...

मंत्री गिरीश महाजन जालन्याच्या दिशेने रवाना

मंत्री गिरीश महाजन जालन्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची ते मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. काल मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती देणार आहेत. आरक्षणाबद्दल सरकार सकारात्मक असले तरी अजून महिनाभराचा अवधी लागेल, कालच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल होतं. त्यानंतर आता सरकारच्या वतीने शिष्टमंडळ जालन्याच्या दिशेने रवाना झालं आहे.

शरद पवार उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

शरद पवार उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत मल्लिकार्जून खर्गे यांच्यासोबत शरद पवाराची भेट होण्याची शक्यता आहे. इंडियातील पक्षातील प्रमुख नेत्यांची उद्या बैठक पार पडणार आहे. इंडिया नावावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच- शरद पवार

देवेंद्र फडणवीस यांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच आहे, असं शरद पवार म्हणालेत.

आरक्षणाची मर्यादा ५० टक्के वाढवण्याची गरज - शरद पवार

आरक्षणाची मर्यादा ५० टक्के वाढवण्याची गरज आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देणं योग्य नाही. असं शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आहेत.

शरद पवार जळगाव विमानतळावर दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज मंगळवारी (दि.५) जळगाव शहरातील सागर पार्कवर जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी शरद पवार जळगावमध्ये दाखल झाले आहेत

वाई ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर वाई तालुका मराठा क्रांती मोर्चा

वाई ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी निघालेला वाई तालुका मराठा क्रांती मोर्चा, यामध्ये सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि हजारो मराठा समाज बांधव उस्फुर्त सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय आहे.

जळगाव- शरद पवारांची आज जळगावात सभा, आजचं टार्गेट मंत्री अनिल पाटील?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज मंगळवारी (दि.५) जळगाव शहरातील सागर पार्कवर जाहीर सभा होणार आहे. दुपारी दीड वाजता सभेची वेळ असून, त्यापूर्वी ते महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.

पुण्याहून मराठवाड्याला जाणारी एसटी बससेवा पुन्हा सुरू

जालन्यातील लाठीमाराचे पडसाद राज्यभरात दिसून येत आहेत. यावेळी अनेक बसचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मराठवाड्यातील बससेवा ठप्प झाली होती. ती आता पुर्ववत करण्यात आली आहे. पुण्याहून मराठवाड्याला जाणारी एसटी बससेवा पुन्हा सुरू झाली आहे.

जालन्यातील लाठीमाराचे पडसाद! आज कोल्हापूर कडकडीत बंद, एसटी बसही रद्द

जालन्यातील लाठीमाराचे पडसाद राज्यभरात दिसून येत आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासून या बंदला मोठा प्रतिसाद मिळत असून एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

सहा राज्यांमधल्या सात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

सहा राज्यांमधल्या सात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भाजप आणि इंडिया आघाडी यांच्यापैकी यश कुणाला मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. झारखंड मधील डूमरी, केरळ मधील पुतूपल्ली , त्रिपुरातील बॉक्स नगर , धनपूर उत्तराखंड मधील बागेश्वर उत्तर प्रदेशातील घोसी आणि पश्चिम बंगाल मधल्या धूपगुरी या जागांवर आज मतदान होत आहे. पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()