हैदराबाद गुप्तचर विभागाने विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. त्यांनी जवळपास २ कोटींची सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली आहे. इसमाने आपल्या अंतर्वस्त्रामध्ये लपवून या सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न केला होता.
Hyderabad | Air Intelligence Unit (AIU) intercepted one passenger coming from Dubai and seized 1,924 gms of gold worth Rs. 1.18 crores. Gold in paste form was found concealed in the underwear of the pax. Further investigation is in progress: AIU, Hyderabad pic.twitter.com/v4xrj6Iljt
— ANI (@ANI) August 6, 2023
नागपुर-सुरत महामार्गावर प्लास्टिकने भरलेला ट्रक अपघातग्रस्त झाल्याने जळून खाक झाला. या अपघातात चालक सुदैवाने बचावला आहे. ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगितलं जातंय.
अफगाणिस्ताला पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा बसला आहे. या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी असल्याची माहिती मिळाली आहे.
'इंडिया'युतीच्या खासदारींची सकाळी १० वाजता बैठक आयोजित करण्यात आली. उद्या राज्यसभेत सादर करण्यात येणाऱ्या दिल्ली विधेयकावर करण्यात येणाऱ्या चर्चेसाठी योजना आखण्यात येणार आहे.
INDIA party's Floor Leaders meeting tomorrow at 10 am, LoP RS Office in Parliament to Chalk out the strategy for the floor of the house pic.twitter.com/2Uew7SrH1X
— ANI (@ANI) August 6, 2023
आम आदमी पक्षाकडून आपल्या खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला आहे. उद्या देशाचे गृहमंत्री अमित शाह दिल्ली विधेयक राज्यसभेत मांडणार आहेत. त्या अनुषंगाने 'आप'ने आपल्या सर्व खासदारांना ७ आणि ८ ऑगस्ट या दिवशी राज्यसभेत हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
अमित शाह सोमवारी (दि. ७ ऑगस्ट) राज्यसभेत सादर दिल्ली विधेयक सादर करतील. या विधेयकाला लोकसभेतून पास करण्यात आलं आहे . राज्यसभेतून पास झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल.
पोलीस अधिक्षक नरेंद्र बिजर्निया यांनी माहिती दिली की, हिंसाचार थांबण्यासाठी विविध स्तरांवर बैठकी घेतल्या जात असून गावच्या सरपंचांवर सलोखा राखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या माध्यामातून आतापर्यंत एकूण १५० जणांना अटक करण्यात आली आहे.
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील विविध समस्यांप्रश्नी शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी कोंडमळा येथे महामार्ग रोखत शुकवारी आंदोलन केले होते. याप्रकरणी बेकायदा जमाव केला व महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्यासह २७ कार्यकर्त्यांवर सावर्डे पोलिस (Sawarde Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहू, फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहाच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत सुट्टी न घेता सीमेवर असतात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी आणि शहांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. पुण्यातील रामकृष्ण मोरे सभागृहात सहकार क्षेत्राच्या वेबपोर्टलच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
मी पहिल्यांदाचा अजित पवारांसोबत एका मंचावर आहे. मोठ्या कालावधीनंतर अजित दादा तुम्ही आता योग्य जागेवर, तुम्ही आधीच या जागेवर यायला हवं होतं. CRCS चा कार्यक्रम आजपासून पूर्णपणे डिजीटल असणार असल्याचं अमित शाह म्हणाले. देशातील ४२ टक्के संस्था महाराष्ट्रात आहेत. सरकार क्षेत्र पारदर्शकतेशिवाय चालू शकत नाही. 9 वर्षांमध्ये मोदींनी लोकांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. 60 वर्षापासून लोकांची जी स्वप्न होतीत ती मोदींनी पूर्ण केली आहेत.
अमित शहा यांच्याकडून सहकार विभागात क्रांतीकारी निर्णय घेण्यात आले आहेत, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. शाहांचं सहकार क्षेत्रात मोठं योगदान आहे. नवं पोर्टल सहकार क्षेत्रातील नवा आयाम, सहकार क्षेत्रात कार्यकारी निर्णय घेतला आहे. शाहांनी एखादी गोष्ट ठरवली की ते करतातच. मोदी आणि शाहांमुळे देशात मोठे बदल होत आहेत. त्यांचं नेतृत्त्व सहकार विभागासाठी वरदान असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अजित पवार म्हणाले आजपर्यंत केंद्रात सहकार विभाग सुरू करण्याची हिंमत अमित शाहांनी दाखवली. बरोबर ना अजित दादा, हे बोलण्याचं अन मान्य करण्याचं ही धाडस लागतं. हे कार्य पाहूनच अजित दादांनी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतल्याचंही शिंदे म्हणाले.
अमित शहांकडून सहकारात मोठे बदल झाले आहेत. त्यांचा जन्म मुंबईतला आहे. अमित शहा यांना महाराष्ट्र खूप चांगला कळतो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अजित दादा म्हणाले ते महाराष्ट्राचे जावई आहेत. हे खरंय पण त्यांचा जन्म मुंबईतला आहे. त्यांची कर्मभूमी गुजरात आणि दिल्ली असली तरी त्यांची जन्मभूमी ही महाराष्ट्र आहे. म्हणूनच ते महाराष्ट्राचा विचार अधिक करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (शनिवारी) संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले. त्यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा आहे. शनिवार आणि रविवारी संपूर्ण दिवस अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात होता. या दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी तब्बल ४ तासांची राखीव वेळ ठेवली होती. मात्र त्यांच्या दौऱ्यामध्ये तातडीने मोठा बदल झाला असून चिंचवडमधील कार्यक्रमानंतर थेट दिल्लीला रवाना होणार आहेत.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मध्यप्रदेशच्या 34 रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तर महाराष्ट्रात 44 रेल्वे स्थानकांसाठी एक हजार पाचशे कोटी रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. यासाठी पंतप्रधानांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार व्यक्त केले.
आजरा - आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यातून १८० क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. गतवर्षी हा प्रकल्प ९ आॅगस्टला भरला होता. यंदा हा प्रकल्प चार दिवस आधीच भरला आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे गडहिंग्लज, आजरा तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचे फोन करणाऱ्या व्यक्तीला जुहू पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रविवारी सकाळी धमकीचा फोन आला होता. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याचं त्या व्यक्तीनं सांगितलं होतं. अशोक मुखिया असं आरोपीचं नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे.
भारतीय तटरक्षक दलाचे एडीजी एस परमेश यांची नवी दिल्लीतील मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ADG S Paramesh has been appointed as Additional Director General of Indian Coast Guard at headquarters in New Delhi. He was earlier handling the charge of Commander (Eastern Seaboard) at Vishakhapatnam, pic.twitter.com/ROqAyStXPJ
— ANI (@ANI) August 6, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, ' भारत आता विकासाच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. नवी ऊर्जा, नवी प्रेरणा आणि नवा संकल्प आहे आणि याच भावनेने भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू करत आहे.
जेद्दाह : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine War) सुरू असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळं युक्रेनमधील अनेक प्रमुख शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. युक्रेनमधील संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या उद्देशानं सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) जेद्दाह शहरात दोन दिवसीय परिषदेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल शनिवारी उपस्थित होते. त्यांच्यासह इतर अनेक देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही या परिषदेत सहभागी झाले होते. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या परिषदेचं आयोजन केलं होतं. सुमारे 40 देशांचे उच्च सुरक्षा अधिकारी यात सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 ऑगस्ट रोजी देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत या स्थानकांचा 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून पुनर्विकास केला जाईल. शहराच्या दोन्ही बाजूंचे योग्य एकत्रीकरण करून स्थानके 'सिटी सेंटर' म्हणून विकसित करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे, असं मोदींनी स्पष्ट केलं.
ही 508 स्थानके 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत, त्यापैकी उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 55 स्थानके आहेत. बिहारमध्ये 49, महाराष्ट्रात 44, पश्चिम बंगालमध्ये 37, मध्य प्रदेशमध्ये 34, आसाममध्ये 32, ओडिशामध्ये 25, पंजाबमध्ये 22, गुजरात आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी 21, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 18 या प्रकल्पात हरियाणातील 15 आणि कर्नाटकातील 13 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्यासंदर्भातील दिलेल्या निकालास ७२ तास उलटले आहे. त्यानंतरही त्यांना खासदारकी दिली नाही. कोर्टाचा निकाल मानायला केंद्र सरकार तयार नाही, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.
Mumbai Breaking : मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडालीये. हा फोन आज सकाळी आला. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आज सकाळी हा फोन आला असून फोनवर बोलताना संबंधित व्यक्तीनं मुंबई लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचं सांगितलं.
मांगले : येथील मांगले - सावर्डे बंधाऱ्यावरून एका तरुणाने वारणा नदीपात्रात वाहत्या पाण्यात मोबाईलला 'स्टेटस' (Mobile Status) ठेवून उडी घेतल्याची घटना काल दुपारी चारच्या सुमारास घडली. तुषार गणपती पांढरबळे (वय २४, मूळ गाव बिळाशी, सध्या मांगले) असे या तरुणाचे नाव आहे.
पुण्यामधील दहशतवादी कारवाईला आळा घालण्यात एटीएसला यश आलं आहे. पुणे कोंढवा परिसरात राहणारे ISIS या दहशतवादी संघटनेचे मॉड्युल महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून उध्वस्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसने दहशदवादी संघटनेशी संबंधित अटक आरोपीकडून एक चारचाकी वाहन आणि दोन अग्निशस्त्रे तसेच पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. अटक आरोपी आणि फरार साथीदार आरोपी यांनी पुणे आणि इतर ठिकाणी रेकी करण्यासाठी वापरलेले एक दुचाकी वाहनही महाराष्ट्र एटीएसने जप्त केलं आहे. मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान वय (23 वर्षे) आणि मोहम्मद यूनुस मोहम्मद याकूब साकी (वय 24 वर्षे), या दोन्ही आणि त्यांचा पळून गेलेला साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याता आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. अमित शहा ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत, त्या हॉटेल परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डॉग स्कॉड पथक, बॉम्ब शोधक पथक हॉटेल परिसरात दाखल आहे. त्याचबरोबर संपूर्ण हॉटेलची तपासणी करण्यात येत आहे.
Manipur Violence : मणिपुरात मे महिन्यापासून सुरू असलेला जातीय हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची आग भडकली आहे. मणिपुरात गेल्या 24 तासांत अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. सध्या इथं मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मृतांचा आकडा 160 आहे, परंतु सततच्या हिंसाचाराकडं पाहता या उपद्रवात किती लोक मारले गेले याची मोजदाद झाली नाहीये. काल (शनिवार) IRF जवानासह किमान 6 जणांचा मृत्यू झाला.
एनआयकडून मुंबईसह भिवंडीमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. आयसीस मॉ़डेल प्रकरणी सहावी अटक करण्यात आली आहे. बोरिवलीतून आकीब नाचण याला अटक करण्यात आली आहे.
असा असणार वाहतुकीत बदल
महावीर चौक : महावीर चौकाकडून चिंचवडकडं जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलीये. त्यामुळं पर्यायी मार्गावरून ही वाहनं महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.
दर्शन हॉल लिंक रोड : लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडं येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग : ही वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडून इच्छित स्थळी जातील.
रिव्हर व्ह्यू चौक : अहिंसा चौक बाजूकडं जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली असून ही वाहने या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.
हा सर्व बदल रविवारी (आज ता. 6) सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत असणार आहे, असे पोलिस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी स्पष्ट केले.
वाशी आणि सानपाडा दरम्यान रेल्वे रुळाला रात्री उशिरा तडे गेले. त्यामुळं हार्बरची सेवा विस्कळीत झाली होती. मात्र, रेल्वे कर्माचाऱ्यांनी रात्री उशिराच काम सुरू करून रेल्वे सेवा पूर्ववत केली आहे.
Maharashtra Live Blog Updates : केंद्रीय मंत्री अमित शाह आज (6 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आणखी एक यशाचं टप्पा गाठला आहे. 14 जुलैला प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान 3 नं चंद्राच्या परिघात यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. जवळपास 22 दिवसानंतर इस्रोच्या मोहिमेला यश मिळालंय. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं सुनावलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यावर सर्वत्र चर्चा सुरु आहे. तसेच प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी खालापूर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 एवढी नोंदवली गेली आहे. यासह देश-विदेशातील बातम्या आपण लाईव्ह ब्लाॅगच्या माध्यमातून पाहणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.