किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्य बजावला आहे. खिचडी घोटाळ्याप्रकरणी त्यांना हा समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना बुधवारी चौकशीसाठी ईडीच्या कार्यलयात हजर राहावं लागणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. राम मंदिरावरुन आता राजकारण सुरु झालं आहे, हे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाय यांना चौकशीसाठी बोलावले आहे. याप्रकरणी जर त्यांना तुरुंगात जावं लागलं तर ते तुरुंगातून सरकार चालवतील असं आम आदमी पार्टीच्या प्रतिनिधीने म्हटलं. केजरिवाल यांनी आज नेत्यांची बैठक बोलावली होती.
मी फोटोग्राफी करतो होतो, व्यंगचित्र काढत होतो. मी मुख्यमंत्री होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. मी मुख्यमंत्री होण्याला शरद पवार जबाबदार आहेत. आणि जनतेने मला स्वीकारलं. मला जमलं तेवढं मी केलं. कुटुंबातला एक म्हणून मान जो मला मिळाला, माझ्या आयुष्याची तीच कमाई आहे, असं ठाकरे म्हणाले.
छत्तीसगडमध्ये आयईडी बॉम्बच्या स्फोटामुळे बीएसफचा हवालदार गंभीर जखमी झाला आहे. तसेच दोन पोलिंग प्रतिनिधी किरकोळ जखमी झाले आहेत. छत्तीसगडच्या कानकेरमधील ही घटना आहे. छत्तीसगडमध्ये उद्या पहिल्या टप्प्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नक्षलवाद्यांचा राज्यातील प्रभाव पाहता राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या हक्काचं आरक्षण आहे. त्यामुळे ते आम्हाला मिळणार आहे आणि ते आम्ही मिळवणारच. आमचं आरक्षण आतापर्यंत तुम्हाला दबावापोटी देण्यात आलं. आता मराठ्यांना लक्षात आलंय की आमचं आरक्षण तिथं आहे. त्यामुळे ते आम्हाला मिळायला लागलं आहे, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. (संपूर्ण बातमी येथे वाचा)
अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. आमचा मराठा आरक्षणाला कधीच विरोध नाही. पण, तो इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता देण्यात यावा. जी शरद पवारांची भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक निकाल- अपडेट दुपारी ४.३०
भाजपा नंबर १
एकूण संख्या- २३५९
विजयी
भाजपा- ७४३
शिवसेना (शिंदे) २४०
राष्ट्रवादी (अजित पवार) ३७१
ऊबाठा- १०२
काँग्रेस- १६७
शरद पवार गट-१७८
नवी दिल्ली - दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. काही मिनिटांपूर्वी दिल्ली, नोएडा भागात हे धक्के जाणवले असल्याची माहिती आहे.
आमचं विकासाचं राजकारण जनतेला आवडलं आहे. काँग्रेसनं आत्मपरिक्षण करावं. काँग्रेसची अवस्था नाचता येईना अंगन वाकडं अशी झाली आहे, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. यावेळी मुंबई भाजपच्या कार्यालर्यात जल्लोष करण्यात आला आहे.
भाजप नंबर १
एकूण संख्या- २३५९
विजयी
भाजपा- ६९७
शिवसेना (शिंदे) २३५
राष्ट्रवादी (अजित पवार) ३२१
ऊबाठा- ९४
काँग्रेस- १३७
शरद पवार गट-१४२
मी जनतेचे आभार मानतो. जनतेने दिलेला हा महायुतीचा कौल आहे. विरोधकांनी केवळ टोमणे मारण्याचं काम केलं. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दार केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता महायुतीलाच निवडून देईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
भाजपा नंबर १
एकूण संख्या- २३५९
विजयी
भाजपा- ६०८
शिवसेना (शिंदे) २१४
राष्ट्रवादी (अजित पवार) २९८
ऊबाठा- ८९
काँग्रेस- १२७
शरद पवार गट-१३४
ग्रामपंचायत निवडणूक निकाल- अपडेट दुपारी २.३०
भाजपा नंबर १
एकूण संख्या- २३५९
विजयी
भाजपा- ५०४
शिवसेना (शिंदे) २०५
राष्ट्रवादी (अजित पवार) २७८
ऊबाठा- ७४
काँग्रेस- १०७
शरद पवार गट- ९४
एकूण ग्रामपंचायत: 16
निकाल जाहीर: 16
भाजप: 04
शिंदे गट: 03
उद्धव ठाकरे गट: 1
अजित पवार गट: 03
शरद पवार गट:
काँग्रेस: 1
मनसे:
इतर: 4
काटेवाडीत अजित पवार गट आघाडीवर आहेत. कोणत्याही क्षणी निर्णय येऊ शकतो.
BRSने पंढरपुरात ६ तर भंडाऱ्यामध्ये ९ जागांवर विजय मिळवला आहे.
पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांना धक्का बसल आहे. जळगाव जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघांमध्ये 17 पैकी 16 ग्रामपंचायत वरती निर्विवाद यश मिळालं आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जामनेर मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचार केला होता. मात्र तरीही सरकारचे संकट मोचक ओळखले जाणाऱ्या गिरीश महाजनांचा जामनेर मध्ये एकतर्फी विजय झाला आहे.
एकूण ग्रामपंचायत - 48
निकाल जाहीर - 48
भाजप - 05
शिंदे गट - 06
अजित पवार गट - 11
उद्धव ठाकरे गट - 05
काँग्रेस - 05
शरद पवार गट - 05
मनसे - 02
इतर - 08
स्थगित - 01
(इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यानं स्थगित)
भाजपा नंबर १
एकूण संख्या- २३५९
विजयी
भाजपा- ३०४
शिवसेना (शिंदे) १५१
राष्ट्रवादी (अजित पवार) २१५
ऊबाठा- ५९
काँग्रेस- ८५
शरद पवार गट- ६८
एकूण ग्रामपंचायत: 16
निकाल जाहीर: 13
भाजप: 04
शिंदे गट: 03
उद्धव ठाकरे गट: 1
अजित पवार गट: 03
शरद पवार गट:
काँग्रेस: 1
मनसे:
इतर: 1
एकूण ग्रामपंचायत - 48
निकाल जाहीर - 36
भाजप - 04
शिंदे गट - 05
अजित पवार गट - 09
उद्धव ठाकरे गट - 04
काँग्रेस - 04
शरद पवार गट - 04
मनसे - 02
इतर - 04
आत्तापर्यंत ज्या तीन ग्रामपंचायत पंकजा मुंडे यांच्या ताब्यात होत्या. त्यापैकी दोन ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांना मिळाल्या आहेत. पंकजा मुंडे यांना केवळ एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला. यापूर्वी या तिन्ही ग्रामपंचायती पंकजा मुंडे यांच्या ताब्यात वैजनाथ तालुक्यातील हिवरा, सोनहिवरा आणि वाणटाकळी तांडा या ग्रामपंचायतीवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व होते.
भाजपा नंबर १
एकूण संख्या- २३५९
विजयी
भाजपा- २७८
शिवसेना (शिंदे) १३०
राष्ट्रवादी (अजित पवार) २०१
ऊबाठा- ५७
काँग्रेस- ७१
शरद पवार गट- ६६
ग्रामपंचायत निवडणूक निकाल- अपडेट सकाळी ११.५५
एकूण संख्या- २३५९
विजयी
भाजपा- २०२
शिवसेना (शिंदे) ११५
राष्ट्रवादी (अजित पवार) १२१
ऊबाठा- ५६
काँग्रेस- ६३
शरद पवार गट- ६५
अन्य- ६९
कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल
एकूण जाहीर झालेल्या ग्रामपंचायती : 89
.................
तांत्रिक कारणामुळे रद्द झालेल्या ग्रामपंचायत : 04
प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती : 74
प्रत्यक्ष पोट निवडणुकीसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायती : 11
..............
कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत पक्षीय बलाबल
भाजप – 6
शिंदे गट – 6
उध्दव ठाकरे गट – 3
अजित पवार गट –23
शरद पवार गट – 00
काँग्रेस – 12
जनसुराज्य : 07
इतर - 28
................
एकूण : 85
एकूण ग्रामपंचायत - 48
निकाल जाहीर - 25
भाजप - 04
शिंदे गट - 03
अजित पवार गट - 06
उद्धव ठाकरे गट - 03
काँग्रेस - 03
शरद पवार गट - 02
मनसे - 01
इतर - 03
23 पैकी 22 ग्रामपंचायत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहेत, तर एका ठिकाणी भाजपचा सरपंच विजयी झाला आहे.
अजित पवार गट
भोंडवेवाडी
म्हसोबा नगर
पवई माळ
आंबी बुद्रुक
पानसरे वाडी
गाडीखेल
जराडवाडी
करंजे
कुतवळवाडी
दंडवाडी
मगरवाडी
निंबोडी
साबळेवाडी
उंडवडी कप
काळखैरेवाडी
चौधरवाडी
वंजारवाडी
करंजे पूल
धुमाळवाडी
कऱ्हावागज
सायबाचीवाडी
कोराळे खुर्द
चांदगुडेवाडी - सरपंच भाजप
एकूण ग्रामपंचायत - 48
निकाल जाहीर - 20
भाजप - 03
शिंदे गट - 02
अजित पवार गट - 03
उद्धव ठाकरे गट - 03
काँग्रेस - 03
शरद पवार गट - 02
मनसे - 01
इतर - 03
ग्रामपंचायत निवडणूक निकाल- अपडेट सकाळी ११.३० वाजता
भाजपा नंबर १ वर
एकूण संख्या- २३५९
विजयी झालेले पक्ष
भाजपा- १७५
शिवसेना (शिंदे) ८७
राष्ट्रवादी (अजित पवार) ११५
ऊबाठा- ५४
काँग्रेस- ६१
शरद पवार गट- ६३
अन्य- ६५
पुणे : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणूकांचे निकाल हाती येत आहेत. यादरम्यान हवेली तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायती या शरद पवार गटाने जिंकल्या आहेत. वाडेबोल्हाई, खामगाव मावळ, कोलवडी साष्टे या तिन्ही गावात शरद पवार गटाचे सरपंच विजयी झाले आहेत,
उंदवडी मध्ये अजित पवार पुरस्कृत पॅनल विजयी
उंदवडी मध्ये विजय मिळवल्यानंतर गावातील नागरिकांच्या डोळ्यात अश्रू
यावेळी आनंद अश्रू आहेत असं सांगत विजयी जल्लोष करण्यात आला.
बारामती मध्ये १४ ठिकाणी अजित पवार गटाचा दबदबा
३१ पैकी १४ ग्राम पंचायतीचे निकाल हाती आले आहेत.
बारामती मध्ये आमबी बुद्रुक, भोंडवे वाडी, पवई माळ, महसोबा नगर, पानसरे वाडी, गाडी खेल, जराडवाडी, करंजे, कुतवल वाडी,सिद्धेश्वर निंबोडी, दंडवाडी, मगर वाडी, साबळे वाडी, उंदवडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी
नाशिक - इगतपुरी तालुक्यातील चौथा निकाल हाती
- कुशेगाव ग्रामपंचायतीवर अपक्ष गटाचा झेंडा
- सरपंच पदी एकनाथ गुलाब कातोरे विजयी
जिल्हा - कोल्हापूर
मतदान झालेल्या ग्रामपंचायती – 89
बिनविरोध - 15
निकाल
भाजप – 3
शिंदे गट – 6
उध्दव ठाकरे गट – 1
अजित पवार गट –17
शरद पवार गट – 0
काँग्रेस – 7
इतर - 20
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत ३१ पैकी १३ चे निकाल समोर आले आहेत, या मध्ये १३ ठिकाणी अजित पवार गटाची सरशी झाली असून मगरवाड मध्ये सुद्धा अजित पवार गटाचे पुरस्कृत पॅनल विजयी झाले आहे.
बारामती मध्ये आमबी बुद्रुक, भोंडवे वाडी, पवई माळ, महसोबा नगर, पानसरे वाडी, गाडी खेल, जराडवाडी, करंजे, कुतवल वाडी,सिद्धेश्वर निंबोडी, दंडवाडी, मगर वाडी, साबळे वाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी
पन्हाळा तालुक्यातील आमदार विनय कोरे यांची बाजी
अनेक ग्रामपंचायत मध्ये कोरे यांचे सरपंच विजयी
आत्तापर्यंत निवडून आलेले सरपंच पुढीलप्रमाणे :
1) वेखंडवाडी
लोकनियुक्त सरपंच : संतोष खोत, जनसुराज्य
2) शिंदेवाडी
नम्रता जगताप, जनसुराज्य
3) वाळवेकरवाडी
वर्षाराणी कुंभार, जनसुराज्य
4) देवठाणे
कल्पना पाटील
5) बाजारभोगाव
नितीन हिरडेकर सर्व पॅनेल विजयी
एकूण ग्रामपंचायत - 48
निकाल जाहीर - 10
भाजप - 02
शिंदे गट - 01
अजित पवार गट - 01
उद्धव ठाकरे गट - 01
काँग्रेस - 01
शरद पवार गट - 02
इतर - 02
बारामती मध्ये ९ ठिकाणी अजित पवार गटाचे पॅनल विजयी झाले आहे. यामध्ये आमबी बुद्रुक, भोंडवे वाडी, पवई माळ, महसोबा नगर, पानसरे वाडी, गाडी खेल, जराडवाडी, करंजे, कुतवल वाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी झाला आहे.
पालघरमध्ये ग्राम पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येथे चाटाळे ग्राम पंचायतीवर बहुजन विकास आघाडीचा झेंडा, उचली उच्छेली ग्राम पंचायतीवर गाव परिवर्तन पॅनल विजयी झाले आहे. गाव परिवर्तन पॅनल मध्ये शिंदे आणि ठाकरे गट एकत्र लढले तर लाल ठाणे ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीला विजय मिळाला आहे. उनभाट ग्राम पंचायतीवर शिव सेना ठाकरे गटाचा झेंडा तर खानिवडे गारगाव ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.
जलसार ग्रामपंचायत ग्रामविकास परिवर्तन पैनल
मासवन ग्रामपंचायतीवर शिव सेना ठाकरे गटाचा झेंडा
लालांडे आदर्श पैनल विजयी कांग्रेस बीजेपी
भाजपा नंबर १
एकूण संख्या- २३५९
विजयी/घोषित
भाजपा- १०३
शिवसेना (शिंदे) ६७
राष्ट्रवादी(अजित पवार) ८७
ऊबाठा- ३०
काँग्रेस- ३८
शरद पवार गट- ३२
अन्य- ४२
बारामती तालुक्यातील ५ ग्रामपंचायतचा निकाल हाती आले आहेत. या तीनही ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे सत्ता गेली आहे. पानसरे वाडी धरून ५ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट विजयी झाला आहे. अजित पवार गटाला बुद्रुक, भोंडवे वाडी, पवई माळ, महसोबा नगर, पानसरे वाडी येथील ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे.
कोल्हापूर : शिरोली दुमाला इथे गोकुळ माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे पुत्र सचिन पाटील यांचा विजय झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे आणखी एक ग्रामपंचायत आली आहे. चंदगड मध्ये 8 ग्रामपंचायतमध्ये अजित पवार गटाची सत्ता आली आहे.
कोल्हापूर आत्तापर्यंतचे निकाल
भाजप – 2
शिंदे गट – 6
ठाकरे गट – 1
अजित पवार गट –5
शरद पवार गट – 0
काँग्रेस – 4
इतर - 7
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराच्या झटका आल्याने रात्री रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आले होते, त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आता बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत
वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सचिवालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 74 ग्रामपंचायतींसाठी काल जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. आज विविध मतदान केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात होत आहे. सकाळी आठ वाजता ग्रामपंचायत मतदान मोजणीला सुरुवात होत असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. काल कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीन 85 टक्के मतदान झालेला आहे.
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींसाठी 82.45 टक्के मतदान झालं असून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ, दादा भुसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून मराठा आरक्षण आंदोलनाचा ग्रामपंचायत निवडणुकीवर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आजच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा निकाल आज लागणार आहेत. दुपारी १२ ते १ दरम्यान राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे निकाल येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी 74 टक्के मतदान काल (रविवारी) झाले होते. राज्यभरात अंदाजे 74 टक्के मतदान झालं. तसेच, राज्यभरातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींपैकी अंदाजे 185 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत.
राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी सुरू झाली असून राज्यभरातून निकाल हाती येत आहेत. निवडणुकांच्या निकालांसह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.