दिवसभराती महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिक वर...

राज्यात सध्या अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे.
Sharad Pawar Nagaland
Sharad Pawar Nagalandesakal
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौरा करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरचं मुंबई दौरा करणार आहेत.

पंचनामे झाल्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. मुख्य सचिवांना व राज्यातील सर्व जिल्हाधीकाऱ्यांना मी सुचना केल्या आहेत. युद्धपातळीवर पंचनामे सुरू झाले. सर्व पालकमंत्र्यांना नुकसानीचे पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येईल.

मुंबई महापालिकांच्या रुग्णालयात उद्यापासून मास्क वापरण्याचे आवाहन

मुंबई महापालिकांच्या रुग्णालयात उद्यापासून मास्क वापरण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. अवकाळी पवसामुळे झालेल्या नुकसानीचे शिंदे पाहणी करणार आहेत.

उगीच कोणालाही आरोपीच्‍या पिंजऱ्यात उभं करणं बरोबर नाही - अजित पवार

सातारा : अदानी उद्योगसमूहाच्‍या (Adani Group) अनुषंगानं आलेल्‍या हिंडेनबर्ग अहवालाची (Hindenburg Report) चौकशी करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाने समिती नेमण्‍यास मान्‍यता दिली आहे. त्‍यानुसार ती नेमल्‍यानंतर वस्‍तुस्‍थिती समोर येईल. तोपर्यंत उगीचच कोणालाही आरोपीच्‍या पिंजऱ्यात उभं करणं बरोबर नसल्‍याचं मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सातारा इथं माध्यमांशी बोलताना नोंदवलं. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे मविआचे समर्थक, पाठीराखे म्‍हणून एकत्र आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडीला कोणताही धोका नसल्‍याचा विश्‍‍वासही त्‍यांनी यावेळी केला. सातारा इथं विविध कार्यक्रमांसाठी अजित पवार (Ajit Pawar) आले होते.

मोठी बातमी! शिवसेना भवन, शाखा, पक्ष निधी शिंदेंच्या शिवसेनेला द्या; सुप्रीम कोर्टात याचिका

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णया नंतर उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुप्रिम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. शिंदे गटाला शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा, आणि पक्षाचा निधी मिळावा, यासाठी एका वकीलाने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली असून त्यावर २४ एप्रिलला सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.

Sharad Pawar Nagaland
Shivsena News: मोठी बातमी! शिवसेना भवन, शाखा, पक्ष निधी शिंदेंच्या शिवसेनेला द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका

देशात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

देशात कोरोना प्रादुर्भावाचा वेग अद्याप कमी झालेला नाही. गेल्या 24 तासांत देशात कोरोना व्हायरसच्या 5 हजार 880 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 35 हजार 199 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत एकूण 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. 

देशभरात यंदा सरासरीच्या 94 टक्केच पाऊस पडणार; स्कायमेटचा अंदाज

देशात यावर्षी अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी संस्थेने यंदाचा मान्सूनबद्दलचा अंदाज व्यक्त  केला आहे. स्कायमेटकडून यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत 94 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.   

उद्या संपूर्ण राजस्थानात सुट्टी जाहीर, सीएम गेहलोत यांच्याकडून प्रस्तावाला मंजुरी

प्रसिध्द समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सार्वजनिक सुट्टीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

Sharad Pawar Nagaland
Good News : महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; मुख्यमंत्र्यांकडून 'या' प्रस्तावाला मंजुरी

छ. संभाजीनगरमध्ये 'बीआरएस'ची 24 एप्रिलला जाहीर सभा

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भारत राष्ट्र समिती (बीआरएस-BRS) पक्षाचे अध्यक्ष तथा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपला पक्ष वाढवण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. 24 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.

अकोला दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत जाहीर

अकोला जिल्ह्यातील पारस येथे झाड पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींना मोफत वैद्यकीय उपचार देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पारस (जि.अकोला) येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. पारस येथील या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. या घटनेची मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली.

पारस दुर्घटना : मुख्यमंत्री सहायता निधीतून परिवाराला मदत देणार - देवेंद्र फडणवीस

पारसची घटना अतिशय दुर्दैवी आणि गंभीर आहे. त्या ठिकाणी शेडवर झाड कोसळलं आणि ते शेड कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत 37 लोक जखमी आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आणि जखमींना चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावा, अशा सूचना मी दिल्या आहेत. जे काही जखमी आहेत त्या सर्व जखमींच्या उपचाराचा खर्च ते राज्य सरकारच्या वतीनं करातील. जे मृत्युमुखी पडले आहेत, त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांच्या परिवाराला मदत देण्यात येईल. एकूणच संपूर्ण घटनेची चौकशीचे आदेश मी दिले आहेत. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आमच्या सर्व संवेदना या परिवाराच्या सोबत आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

अमेरिकेच्या 'व्हिसा' शुल्कात वाढ

US Visa Fee Increase : अमेरिकेला जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं 'व्हिसा' शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. काही नॉन इमिग्रंट व्हिसावर (Non Immigrant Visa) हे शुल्क वाढवण्यात आलंय. परराष्ट्र विभागाच्या या निर्णयामुळं भारतीय विद्यार्थी आणि पर्यटकांना महागाईचा भार सोसावा लागणार आहे. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व्हिसाच्या शुल्कात अमेरिकेनं 25 डॉलर्सची वाढ केली असून सध्याच्या चलन दरानुसार, आता एका विद्यार्थ्याला 15 हजार 400 रुपये मोजावे लागणार आहेत. ही शुल्कवाढ 30 मेपासून अंमलात येणार आहे.

Sharad Pawar Nagaland
US Visa : अमेरिकेला जाण्याचा विचार करताय? मग, आधी ही बातमी वाचा; परराष्ट्र विभागानं घेतलाय मोठा निर्णय

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा - मुख्यमंत्री शिंदे

अयोध्यावरून परतल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मी मुख्य सचिव आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात असून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी कलेक्टर स्वतः गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालंय.  सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Sharad Pawar Nagaland
Akola Accident: अकोल्यातील पारस गावात झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 35 जण जखमी

राज्यातील मोठा पाऊस संपला, आजपासून तापमानात होणार वाढ

राज्यातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला अवकाळी पाऊस कमी होत असून, सोमवारपासून पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. 13 एप्रिलपर्यंत राज्यात तुरळक पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेले तीन दिवस संपूर्ण देशासह राज्यातील बहुतांश भागांत अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.

उत्तराखंड कारागृहात एका महिलेसह 44 कैदी HIV पॉझिटिव्ह

उत्तराखंडमधील हल्दवानी तुरुंगात एका महिलेसह ४४ हून अधिक कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कैदी एचआयव्ही बाधित झाल्याने कारागृह प्रशासनाला धक्का बसला आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारागृह प्रशासन याबाबत बोलायलाही तयार नाही. एवढ्या मोठ्या संख्येने कैदी कसे पॉझिटिव्ह झाले, हे अजून पर्यंत कळू शकले नाही. 

Sharad Pawar Nagaland
Haldwani Jail: तुरुंग प्रशासन हादरलं! कारागृहात एका महिलेसह 44 कैदी HIV पॉझिटिव्ह

मुश्रीफांच्या मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी आहे. मुंबई सत्र न्यायालयानं तिघांना ईडीच्या कारवाईपासून दिलेलं तूर्तास अंतरिम संरक्षण कायम आहे. मुंबई सत्र न्यायालय विशेष कोर्टात हसन मुश्रीफ यांची 3 मुलं साजिद, आबीद आणि नाविद या तिघांनी अटकपूर्व जामीन अर्ज केलाय.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर आज सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज पुढची तारीख मिळण्याची शक्यता आहे. आज कोर्टाच्या कामकाजात 39 नंबर वर प्रकरण आहे. गेल्या आठ महिने या प्रकरणावर सुप्रिम कोर्टात सुनावणी नाही.

पावसामुळं मंदिराच्या शेडवर झाड कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

राज्यात सध्या अवकाळी पावासाचा कहर सुरु आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या वादळी पावासामुळे अकोल्यातील पारस गावातील एका मंदिराच्या शेडवर झाड कोसळले. या शेडमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 

Latest Marathi News : सध्या राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वादळी पावसामुळं अकोल्यातील पारस गावातील एका मंदिराच्या शेडवर झाड कोसळलं. या शेडमधील 7 जणांचा मृत्यू झाला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अयोध्येत पोहोचले आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या 350 जागांसाठी 18 मे रोजी मतदान होणार आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर भाजप आज आपली उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.