LIVE Marathi News Updates : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. निवडणूक आयोगानं काल राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे.
BJP
BJPesakal
Updated on

कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपकडून 189 उमेदवारांची नावे जाहीर

कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपकडून 189 उमेदवारांची नावे जाहीर करत आहोत, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि धर्मेंद्र प्रधान यांचाही समावेश होत.

मुंबईमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेसचा मशाल मोर्चा

मुंबईत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मशाल मोर्चा काढला आहे. हा मोर्चा पोलिसांना अडवला असून काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आगे.

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर गेले आहेत. सुप्रिया सुळे आणि संजय राऊत देखील सिल्व्हर ओकवर गेले आहेत.

अजित पवार यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

अवकाळीमुळे झालेल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, अशी मागणी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का

मुंबई सत्र न्यायालयाने हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

चंद्रकांत पाटलांच्या मनातील मळमळ बाहेर आली - संजय राऊत

चंद्रकांत पाटलांच्या मनातील मळमळ बाहेर आली, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार, हवामान विभागाचा अंदाज

यावर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यंदा देशात 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे.

गोव्यातील तृणमूल काँग्रेसचे खासदार लुइझिन फालेरो यांचा राजीनामा

तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी स्वीकारला आहे, अशी माहिची सुत्रांनी दिली आहे.

BJP
Luizinho Faleiro : ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का; 'या' खासदारानं दिला पक्षाचा राजीनामा

सहकारी पक्षांसोबत डायलॉग ठेवण्याची आवश्यकता होती; शरद पवारांनी ठाकरेंना सुनावलं

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही, त्यांनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवं होतं," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

अदानी मुद्द्यावरून आमच्या मित्र पक्षांची मतं वेगळी आहेत - शरद पवार

हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची मागणी अनावश्यक असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीत सत्ताधारी पक्षाचे बहुमत राहिलं. त्यामुळे सत्य बाहेर येऊ शकत नाही, असं मत पवार यांनी व्यक्त केल होतं. मात्र, त्यांनी पुन्हा आपली भूमिका बदलली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार म्हणाले, अदानी मुद्द्यावरून आमच्या मित्र पक्षांची मतं वेगळी आहेत, मात्र आम्हाला विरोधकांमध्ये एकोपा ठेवायचा आहे. अदानी मुद्द्यावर माझं मत त्याठिकणी मांडलं मात्र आमच्या सहकाऱ्यांना वाटत असेल तसं, JPC च्या चौकशीचा मी विरोध करणार नाही. विरोधकांच्या एकीवर दुष्परिणाम होवू नये म्हणून आम्ही आग्रह धरणार नाही. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

BJP
Sharad Pawar: शरद पवारांनी पुन्हा मारली पलटी, अदानी प्रकरणात भाषा झाली मवाळ!

राजस्थान सरकारविरोधात सचिन पायलट यांचे लाक्षणिक उपोषण

विधानसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान काँग्रेसमधील वाद पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आला आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज असलेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी पुन्‍हा आक्रमक भूमिका घेतली आहे. जयपूर येथील हुतात्मा स्मारकावर पायलट लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. पायलट यांच्या उपोषणावर काँग्रेसने टीका केली आहे.

ज्यावेळी बाबरी पाडली, तेव्हा सगळे उंदीर बिळामध्ये लपले होते - उध्दव ठाकरे

ज्यावेळी बाबरी पाडली, तेव्हा सगळे उंदीर बिळामध्ये लपले होते. एकही बाहेर यायला तयार नव्हता, असा टोला उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपला लगावला.

आदित्य ठाकरेंनी घेतली केटीआर यांची भेट

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आज (११ एप्रिल) तेलंगानाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आदित्य ठाकरे तेलंगानाचे नेते के टी रामाराव यांची भेट घेतली. के टी आर हे तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सुपुत्र आहेत तसेच तेलंगना मंत्रिमंडळातील अनेक महत्वाची खाती ही त्यांच्याकडे आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आता 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरी होणार

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आता  ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा होणार आहे. यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्‍या माध्‍यमातून आज (दि.११) केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती २८ मे  रोजी साजरी होते. हा दिवस ‘वीर स्‍मरण दिन’ म्हणून साजरा करावा, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.

तारीख पे तारीख! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार

नवी दिल्ली :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार आहे.

सलमान खानला धमकी देणारा 16 वर्षांचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सलमान खानला मारण्याचा मेल आलाय. या मेलमध्ये ३० एप्रिलला सलमान खानला मारण्याचा खुलासा केला होता. आता सलमान खानला धमकी देणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे. हा मुलगा १६ वर्षांचा असून त्याचं नाव रॉकी आहे. पोलिसांनी १६ वर्षांच्या या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्याची खबर मिळतेय.

BJP
Salman Khan: सलमान खानला धमकी देणारा १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील वारजे मधून हा फोन आल्याचं उघड झालं आहे. ११२ हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला होते. "मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे" असे बोलून कॉल कट करण्यात आला. सोमवारी रात्री ११२ वर फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. कॉल करणारा शास्त्री नगर, धारावी इथे राहणारा असल्याची माहितीही समोर आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी राजेश आगवणे या व्यक्तीला अटक केली आहे. त्याने दारूच्या नशेत आधी ॲम्बुलन्सला फोन केला. त्यानंतर ११२ वर फोन केला. पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

BJP
CM शिंदेना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक; धक्कादायक कारणही आलं समोर...

निषेध म्हणून राजीनामे द्या, संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना आव्हान

बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, अयोध्येतून आलावर चंद्रकांत पाटील सांगतात की बाबरीसंदर्भातील त्या घटनेत शिवसेनेचा आणि शिवसेनाप्रमुखांचा काडीमात्र संबंध नव्हता. ते फार कुचेष्ठेने बोलले. यावर मिंधे काय म्हणतात हे आम्हाला ऐकायचं आहे. महाराष्ट्र आणि देश ऐकू इच्छितोय कि मिंधे काय बोलून हिम्मत दाखवतायत का की परत एकदा शरण जातायत असे संजय राऊत म्हणाले.

BJP
Shiv Sena : 'बाळासाहेब बाबरी कांड प्रकरणात प्रमुख आरोपी होते, हे भाजपला माहिती नाही का?'

मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिकेवर आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. आजच्या सुनावणीत राज्य सरकार भूमिका मांडणार असल्याने समस्त मराठा समाजासह राज्यातील जनतेचे सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे.

भारतातील मुस्लिमांची स्थिती पाकिस्तानपेक्षा खूपच चांगली - निर्मला सीतारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान एका कार्यक्रमात बोलताना सीतारामन म्हणाल्या, 'भारतातील मुस्लिमांची (Indian Muslim) स्थिती पाकिस्तानपेक्षा (Pakistan) खूपच चांगली आहे.' निर्मला सीतारामन ह्या रविवारी वॉशिंग्टनमध्ये (Washington) पोहोचल्या आहेत. पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये आयोजित कार्यक्रमात निर्मला सीतारामन यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर खुलेपणानं भाष्य केलं.

BJP
Nirmala Sitharaman: मुस्लिमांबाबत अर्थमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; सीतारामन म्हणाल्या, मुस्लिमांची स्थिती पाकिस्तानपेक्षा..

हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीनावर आज फैसला

ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर आज (11 एप्रिल) निर्णय होणार आहे. त्यामुळं हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळणार की ईडी कारवाईला सामोरे जावे लागणार? याकडं कोल्हापूर जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील वारजे मधून हा फोन आल्याचं उघड झालं आहे. ११२ हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला होते.

BJP
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

संजय राऊत यांचं डोकं फिरलंय, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची टीका

बुलढाणा : जिल्ह्यातील पीक नुकसान पाहणीच्या आपल्या धावत्या दौऱ्याच्या समारोपात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडविली. सोमवारी बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे कृषिमंत्री सत्तार यांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत धावता संवाद साधला. ‘प्रभू रामचंद्र शिंदे गटाच्या नेत्यांना आशीर्वाद देणार नाही’, या संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता कृषिमंत्री म्हणाले की, ‘‘त्यांचं डोकं फिरलं आहे. प्रभू रामचंद्र राऊतांना विचारून आशीर्वाद देतील का? असा सवाल त्यांनी केला.

अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 177 कोटींची मदत जाहीर

मार्च महिन्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. राज्यात विविध जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटी रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

BJP
Weather Update: राज्यात पाच दिवस गारपीट, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा

पुढचे पाच दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला गारपीटीचा बसणार तडाखा

हवामान खात्याच्या माहितीनुसार भारतातून अवकाळी पावसानं काढता पाय घेण्यास सुरुवात केली असून, बहुतांश भागांमध्ये तापमानात काही अंशांनी वाढही होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. असं असतानाच महाराष्ट्रातील परिस्थिती मात्र सुधारण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. मराठवाड्याचा बराचसा भाग आणि मध्य महाराष्ट्रातच गारपीटीमुळं येत्या काही दिवसांत नुकसान होऊ शकतं. तुलनेनं कोकण आणि विदर्भाला गारपीटीचा फारसा फटला बसणार नाही. असं असलं तरीही या भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरुच असेल.   

भारतीय हवामान विभागाची आज पत्रकार परिषद

आज (11 एप्रिल) भारतीय हवामान विभागाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षी देशात मान्सूनची स्थिती काय रहाणार याबाबतची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात येणार आहे. 

Latest Marathi News : केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. निवडणूक आयोगानं काल राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे, त्यामुळं महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीसह ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ आणि ‘तृणमूल काँग्रेस’ या अन्य दोन पक्षांचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. तसेच कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर भाजप आज आपली उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवाय, देशात कोरोना विषाणूचा फैलावही अधिक तीव्र होताना दिसत आहे. तसेच वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.