कायदा आणि शिक्षण क्षेत्रात तमिळ लोकांचे योगदान अतुलनीय आहे. भारत ही जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे. तमिळ संस्कृतीत बरेच काही आहे ज्याने भारताला एक राष्ट्र म्हणून आकार दिला: पंतप्रधान नरेंद्र मोदी
पावसामुळे पुणेकरांचे हाल सुरु आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी साचले आहे. सिंहगड रस्ता, दांडेकर पूल येथे अर्ध्या तासापासून वाहतूक कोंडी झालेली आहे.
पुण्यात जोरदार पाऊस आणि वारा सुरू आहे. यामुळे पौडरस्त्यावरील गुजरात काॅलनी चौकात फ्लेक्स पडला आहे.
नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी नागरीकांना बावधन परिसरात सर्व्हिस रोडचा वापर न करण्याची विनंती केली आहे. सर्व्हिस रोडवर पावसामुळे खूप पाणी साचले आहे. रामनदी ते घोडावत पर्यंतचा रोड पाण्याखाली गेला आहे. घोडावत - LMD चौक ते पेट्रोल पंप रोडवर 3 ठिकाणी झाडे पडली आहेत.
पश्चिम बंगाल: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 14 एप्रिल रोजी बीरभूममध्ये भाजप पक्ष कार्यालयाची पायाभरणी करतील आणि बेनीमाधाब शाळेच्या मैदानावर जाहीर सभेला संबोधित करतील.
राज्यात गेल्या काह दिवसांपासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात काही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. पुण्यातील कोथरुड पावसाची धुव्वाधार बॅटींग सुरू आहे.
अदानी प्रकरणातल्या वक्तव्यावरून शरद पवारांच्या भूमिकेवर चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीत काँग्रेस अध्यक्षांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार आज मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांना भेटणार रात्री 8.30 भेटणार आहेत
माझ्या मनात फक्त एवढंच आहे की लोकांनी माझ्याबद्दल कधीही गैरसमज करून घेऊ नये. कधीकधी आम्हाला निधी दिला जातो, कधीकधी नाही. 2024 पर्यंत आम्हाला काहीही दिले जाणार नाही, असे सध्या ऐकायला मिळत आहे. गरज पडली तर मी माझा पदर पसरून मातांसमोर भीक मागेन, पण भीक मागायला दिल्लीत जाणार नाही: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कोलकाता
गुजरातचे सुरत कोर्ट २० एप्रिल रोजी ‘मोदी आडनाव’ टिप्पणीवरून २०१९ च्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींच्या याचिकेवर निर्णय देणार आहे.
ज्याने जुनैद आणि नसीरला मारले त्याचा सामना तुम्ही (भाजप) एन्काउंटर कराल की नाही. कारण तुम्ही धर्माच्या नावावर एन्काउंटर करता. ही चकमक नाही, कायद्याची पायमल्ली होत आहे. गोळ्यांनी न्याय करायचे ठरवले तर न्यायालये बंद करा : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अतिक अहमद यांचा मुलगा असद अहमद याचा पोलिसांनी केलेल्या एन्काउंटर भाष्य केले.
पालघर साधू हत्या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दोन आठवडे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने हा तपास आता सीबीआयकडे सोपवला आहे.
उमेश पाल खून खटल्यात हजर राहण्यासाठी न्यायालयात आणलेल्या माजी खासदार अतिक अहमद याच्यावर प्रयागराज इथं एका अज्ञात इसमाने बाटली फेकून मारली.
उमेश पाल हत्याकांड प्रकरणी उत्तर प्रदेशातून मोठी घटना समोर आली आहे. त्यानुसार गँगस्टर आतिमक अहमद याचा मुलगा असद अहमद याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे.
नाशिक शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महिला मेळावा होणार आहे. या मेळाव्याला रश्मी ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे. या महिला मेळाव्यात रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीने पक्षातील महिला आघाडीमध्ये नवीन ऊर्जा येईल, अशी माहिती अशी महिती शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (Drug Controller General of India DCGI) बनावट औषधं बनवणाऱ्या 18 फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. एएनआयनं आज (गुरुवार) सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, डीसीजीआयनं 20 राज्यांतील 76 कंपन्यांची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे दिवसभरातले कार्यक्रम रद्द कऱण्यात आले आहेत. संध्याकाळी ४.३० वाजता आनंदाचा शिधा वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमांतून सहभागी होतील.
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बीबीसी इंडियावर कारवाई केली आहे. बीबीसी इंडियावर फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीबीसीवर विदेशी निधीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर ईडीनं फेमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांबाबत (Hasan Mushrif) मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) मनी लाँड्रिंग प्रकरणात हसन मुश्रीफ यांना अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण कायम ठेवलं आहे. त्यांना 27 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाल्यामुळं मोठा दिलासा मिळालाय. ईडीनं उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यानंतर न्यायालयानं मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम ठेवलं आहे.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काल एकनाथ शिंदे यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन अक्षरशः रडले, असा दावा त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारलं असंही ते म्हणाले. याला आता संजय राऊतांनी पुष्टी केली आहे. माध्यमांशी बोलताना आज संजय राऊत म्हणाले, "आदित्य ठाकरे बोलले ते खरं आहे. एकनाथ शिंदे मातोश्रीवर आले आणि म्हणाले की मला जेलमध्ये जायचं नाहीये. तुम्ही काहीतरी करा. ही युती तुम्ही तोडा. आम्ही म्हणालो त्यांना की तुम्ही का जाल जेलमध्ये? तुम्हाला पक्षाने काहीतरी दिलंय, तर तुम्ही पक्षासोबत राहायला हवं."
चंदीगड : पंजाबमधील गडशंकर (Punjab Garhshankar) इथं काल रात्री उशिरा झालेल्या एका रस्ता अपघातात (Road Accident) आठ भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा सुमारे 50 भाविक बैसाखी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी चरण छो गंगेच्या दिशेनं चालले होते. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या ट्रकनं त्यांना चिरडलं. या अपघातात पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
केंद्रातील भाजप सरकारविरोधात समविचारी पक्षांना एकत्र करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली. यासाठी काँग्रेस नेतृत्वाने देशपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे लवकरच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. मोदी आडनावाबाबत बदनामी प्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले. आता सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. राहुल गांधींविरोधात नव्याने मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे.
देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १०,१५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ४४,९९८ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भरतपूर : राजस्थानमधील (Rajasthan) भरतपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा (Dr. Babasaheb Ambedkar Statue) बसवण्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. 12 एप्रिलच्या रात्री हा वाद इतका वाढला की, दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली. दोन जातींनी परस्पर संघर्षात केवळ जाळपोळ आणि रस्ता जाम केला नाही, तर त्यांनी पोलिसांवर तीन वेळा दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांना पांगवण्यासाठी त्यांनी अश्रुधुराचा वापर केला.
100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं असून नाशिक महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प झाली आहे. तीन महिन्यांपासून पगार होत नसल्यामुळं कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. पहाटेपासूनच तपोवनमध्ये असलेल्या बस डेपोतून एकही गाडी रस्त्यावर धावणार नाही, असा कर्मचाऱ्यांनी पवित्रा घेतला आहे.
भारतीय जनता पक्षानं बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मंगळवारी 189 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर 24 तासांच्या आत भाजपनं दुसरी यादी जाहीर केली आहे.
राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.