दिवसभरात देश अन् राज्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय.
sakal breaking
sakal breaking
Updated on

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या ट्रकला आग

जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या ट्रकला आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप आग कशामुळे लागली याबद्दल माहिती मिळू शकलेली नाहीये.

उद्धव ठाकरेंनी केली बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहाणी

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील स्मारकाच्या पाहणीसाठी दाखल झाले आहेत. यावेळी स्मारकाच्या कामकाजाची त्यांनी पाहाणी केली.

मुख्यमंत्री करायचं अन् दुधातल्या माशी सारखं फेकून द्यायचं हे याेग्य नाही - पृथ्वीराज चव्हाण

भाजपाला या दृष्टचक्रातून बाहेर पडायचं झाल्यास कुणाला तरी मुख्यमंत्री केलं पाहिजे. या मुख्यमंत्र्यांना ढकलून दिलं तरी काही फरक पडणार नाही, पण हे योग्य नाही. मुख्यमंत्री करायचं आणि दुधातल्या माशी सारखं त्याला फेकून द्यायचं हे योग्य नाही, अशी टिप्पणी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते. 

कोथरूडमध्ये जोरदार, तर सिंहगड मार्गावर मुसळधार

पुण्यातील काही भागात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. कोथरूडमध्ये जोरदार पाऊस सुरू असून काही भागात गारा पडत आहेत. सध्या सिंहगड मार्गावरही मुसळधार पाऊस सुरू आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो गोव्याच्या दौऱ्यावर

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या ठिकाणी शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) समिट पार पडणार आहे. यामध्ये पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व बिलावल भुट्टो करणार आहेत. येत्या ४ आणि ५ मे रोजी ही समिट पार पडणार आहे. 

sakal breaking
Bilawal Bhutto in Goa: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो गोव्याच्या दौऱ्यावर! जाणून घ्या डिटेल्स

पुण्यातील काही भागात हलक्या पावसाला सुरुवात

पुण्यातील काही भागात हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन तास राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजा, गारा आणि वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

बुद्धाचा मार्ग हाच भविष्याचा मार्ग आहे - पंतप्रधान मोदी

तथागत बुद्धांनी (Tathagata Gautama Buddha) दाखवलेल्या मार्गावर जग चाललं असतं तर हवामान बदलांसारख्या संकटाचा कधी सामना करावा लागला नसता, असंही मोदी म्हणाले. ज जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेच्‍या (World Buddhist Summit) उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते.

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

बाजार समिती मालेगाव निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहे. मालेगाव जिल्ह्यातील बाजार समितीची निवडणूकीत चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. पालकमंत्री दादा भुसे यांना आव्हान देण्यासाठी अद्वय हिरे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अद्वय हिरे यांच्या मविआ विरुद्ध पालकमंत्री भुसे यांच्या पॅनल मध्ये लढत होणार आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. त्यांना सध्या घरी क्वारंटाईन करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या पथकानं त्यांची तपासणी करून पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

sakal breaking
Rajnath singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाची लागण: कमांडर्स कॉन्फरन्समध्ये होणार नाही सहभागी

नगरविकास खात्याच्या शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर

नगरविकास खात्याच्या शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत नागपूर महानगर पालिकेला प्रथम क्रमांक मिळाला असून ठाणे महानगर पालिका दुसऱ्या स्थानावर, तर तिसऱ्या स्थानावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सन्मान मिळाला आहे.

sakal breaking
Beautiful City in Maharashtra: महाराष्ट्रातील तीन सुंदर शहरं जाहीर! नेटकऱ्यांनी जोडलं फडणवीस, शिंदे, पवार कनेक्शन

अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर पोलिसांच्या ताब्यात

वारीस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग याची पत्नी किरणदीप कौर हिला पंजाब पोलिसांनी अमृतसर येथील श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. ती विमानातून लंडनला जाण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळी तिला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचं उद्या मुंबईत शिबीर

गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, मंगळवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं म्हटलंय. मात्र, अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतरही राष्ट्रवादीमध्ये सर्व अलबेल नसल्याचं चित्र आहे. उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मुंबई विभागाचं शिबीर होणार आहे. मात्र, या शिबीरामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं नाव नसल्याचं समोर आलंय. 

उद्योजक गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट

उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. सिल्वर ओकवर दोघांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दोघांच्यातील चर्चा अद्यार गुलदस्त्यात आहे. दरम्यान राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

sakal breaking
Gautam Adani: शरद पवारांची 'ती' मुलाखत अन् अदानींच्या भेटीने चर्चांना उधाण

बॉलिवूड चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा याचं निधन

चित्रपट जगतातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. दिवंगत बॉलिवूड चित्रपट निर्माते यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्रा यांनी जगाचा निरोप घेतला आहे. पामेला ह्या एक प्रसिद्ध गायिका होत्या. त्यांनी पती यश चोप्राच्या अनेक चित्रपटांना संगीत दिलं होतं.

नाशिकमधील बिल्डरवर आयकर विभागाची धाड

नाशिकमधील बिल्डरवर आयकर विभागाने धाड टाकली आहे.  एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी सुरु आहे.  

जिलेटिनच्या स्फोटात आष्टीचे तीन मजूर ठार

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावाजवळ विहीर खोदताना जिलेटीनचा स्फोट होऊन तीन मजूर ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात एक मजूर जखमी झाला आहे. हे सर्व कामगार आष्टी (जि. बीड) तालुक्यातील आहेत. घटनेची हरसूल पोलिसांत नोंद झाली आहे.

सरकारच्या दडपशाहीला घाबरणार नाही - आमदार देशमुख

सरकार माझ्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे. यात पोलिसांचा काही दोष नाही. पाेलिसांवर सरकारचा दबाव आहे. मला आता पोलिस कुठे घेऊन जाताहेत ते माहित नाही. आगामी काळात खारे पाणी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना दाखविण्यासाठी नेणार असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले.

राहुल गांधींना दिलासा नाहीच, शिक्षेला स्थगितीची याचिका फेटाळली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मानहानीच्या खटल्यात सूरत येथील न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका सूरत सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

sakal breaking
Rahul Gandhi: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; सुरत सत्र न्यायालयाने ती याचिका फेटाळली

देशात एका दिवसात आढळले 12591 नवे रुग्ण

आज देशात एकाच दिवसात कोरोना विषाणूचे 12 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्याही 65 हजारांच्या पुढं गेली आहे.

चिनी लोकांना कोविड निर्बंधातून मुक्त करणाऱ्या दोन महिलांची तुरुंगातून सुटका

बीजिंगमध्ये कोरोना निर्बंधांविरोधात ऐतिहासिक निदर्शनांत भाग घेतलेल्या दोन चिनी महिलांना आज प्रशासनानं सोडलं. सुमारे चार महिन्यांच्या कोठडीनंतर या दोघींना सोडण्यात आलं.

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सत्तेवर आले, तेव्हा एका दशकातील सर्वात मोठ्या निषेधांमध्ये दोघींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दोन महिलांच्या जवळच्या मित्रांनी रॉयटर्सला सांगितलं की, 'नोव्हेंबरच्या उत्तरार्धात चीनमधील अनेक शहरांमध्ये निषेध सुरू झाला. निदर्शनाच्या काही दिवसांतच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.'

sakal breaking
Coronavirus : चिनी लोकांना कोविड निर्बंधातून मुक्त करणाऱ्या दोन महिलांची तुरुंगातून सुटका

राज ठाकरे आज पुन्हा एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची शक्यता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत नुकसानग्रस्त शेतकरी देखील असणार आहेत. गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, मात्र अद्यापही अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

Traffic jam on Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडं जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळं मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ पहायला मिळत आहे, असं वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) सांगितलं.

sakal breaking
Traffic Jam : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे'वर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या दीड किमीपर्यंत रांगा

भाजप उमेदवारकडं सापडली एक कोटी 54 लाखांची रोकड

कर्नाटक विधानसभा निवडणूक : रामदुर्गचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित एका गाडीत एक कोटी 54 लाखांची रोकड आढळली. पोलिसांनी ही रोकड जप्त केली असून अनधिकृत रोकड प्रकरणी चिक्करेवन्ना यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

खारघर दुर्घटनेवर विशेष अधिवेशन बोलवा, 50 लोकांचा बळी घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी त्यांनी फडणवीस कुठे आहेत, त्यांना मन आहे की नाही? असा सवाल केला. सरकारनं श्री सदस्यांच्या मृत्यूचा आकडा लपवला, असा आरोपही त्यांनी केला.

नाशिक-दिल्ली विमानसेवेला पुन्हा ब्रेक

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं विस्कळीत होत असलेल्या नाशिक-दिल्ली विमानसेवेला पुन्हा एकदा ब्रेक देण्यात आलाय. स्पाइस जेटनं या सेवेला 20 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. दरम्यान, कंपनीनं सेवा बंद करण्यामागं तांत्रिक कारण सांगितलं असले तरी, पुन्हा एकदा राजकीय अनास्थळेमुळंच ही सेवा बंद झाल्याची चर्चा उद्योजक तसंच व्यावसायिकांमध्ये रंगत आहे.

राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार? न्यायालयात आज सुनावणी

राहुल गांधींच्या खासदारकीबाबत याचिकेवर आज  सुनावणी होणार आहे.  2019 मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने 23 मार्चला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या विरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार? आज कोर्टाचा यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.

फेक न्यूज देणाऱ्या युट्यूब चॅनल्सविरोधात आराध्या बच्चनची हायकोर्टात धाव

युट्यूब चॅनलवर आराध्याच्या तब्येतीची चुकीची माहिती दिल्याच्या विरोधात आराध्यानं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चननं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

भाजप उमेदवारांची चौथी यादी जाहीर, बीव्ही नायक यांना मिळाली संधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं बुधवारी रात्री उशिरा उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. भाजपच्या चौथ्या यादीत उर्वरित दोन जागांसाठीच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या बीव्ही नायक यांनाही पक्षानं संधी दिली आहे. तर, भाजपनं शिमोगामधून चन्ना बसप्पा यांना तिकीट दिलं आहे.

काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची सहावी यादीही प्रसिद्ध केली आहे. पक्षानं आपल्या अंतिम यादीत सीव्ही रामम नगर, रायचूर, अर्कलगुड, सिडलाघाटा आणि मंगलोर सिटी उत्तर विधानसभा जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत.

..अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या 'बीआरएस'च्या सभेला परवानगी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस (BRS) पक्षाची मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होत आहे. 24 एप्रिल रोजी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या सभेसाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे. 

यमनच्या राजधानीमध्ये जकात वाटप करताना चेंगराचेंगरी; 79 जणांचा मृत्यू

यमनची राजधानी साना इथं जकात वाटण्याच्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 79 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. साना येथील एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, यमनमध्ये झालेल्या दुर्घटनेत 79 लोकांचा मृत्यू झाला असून 322 नागरिक जखमी झाले आहेत.

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची जल संघर्ष यात्रा रोखली, पोलिसांनी घेतलं ताब्यात

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या सीमेवर दाखल झाले. मात्र, पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आणि त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Latest Marathi News : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय.

काल काँग्रेसनं पाचवी तर भाजपनं चौथी उमेदवारांची यादी केली. तसेच यमनची राजधानी साना इथं जकात वाटण्याच्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 79 लोकांचा मृत्यू झाला आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या सीमेवर दाखल झाले.

मात्र, पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आणि त्यांना ताब्यात घेतलं. याशिवाय, देशभरात काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे, तर काही भागांना उन्हाचा तडाखा बसत आहे. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.