दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

आज राज्यात विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळं विरोधक आक्रमक होऊ शकतात.
sakal breaking notifiction
sakal breaking notifiction
Updated on

इंडियन मेडिकल असोसिएशन पाळणार काळा दिवस

आरोग्य हक्क विधेयकाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने राजस्थानमध्ये 27 मार्च रोजी काळा दिवस पाळण्याचं आवाहन केलं आहे.

मोदींच्या ताफ्यात युवकाचा घुसण्याचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. आयोजित रॅलीदरम्यान एक तरुण त्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र उपस्थित सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी त्याला रोखलं.

लाचखोरीप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याची आत्महत्या

गुजरातच्या राजकोटमधील जॉईंट डायरेक्टर बिश्नोई यांना काल लाचखोरी प्रकरणात सीबीआयने अटक केली. आज सकाळी त्यांनी चेंबरच्या खिडकीतून उडी मारुन जीव दिला.

भंगारच्या कारखान्यात स्फोट, एकाचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील बारी येथे एका भंगार कारखान्यात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

नागपूरमध्ये एमबीए सीईटी परीक्षेत गोंधळ

तांत्रिक घोळ झाल्याच्या नावाखाली परीक्षा केंद्रात दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. बाकी विद्यार्थी केंद्राबाहेरच राहिल्याने गोंधळ सुरु आहे. नागपूरमध्ये हा गोंधळ झालाय.

शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल

स्वतःचं शस्त्र दुसऱ्याला दिल्यामुळे शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रभादेवी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी ही कारवाई करणयात आली.

मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंटरीविरोधात महाराष्ट्र विधानसभेत ठराव मंजूर

विधानसभेत (Maharashtra Assembly) आज शनिवारी २००२ च्या गुजरात दंगलीवरील डॉक्युमेंट्री प्रकरणी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) चा निषेध करण्यात आला. बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून देशाच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा आणि धार्मिक फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या बीबीसी डॉक्युमेंट्री विरोधातील ठराव भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मांडला. या ठरावाद्वारे डॉक्युमेंट्री प्रकरणी बीबीसीचा निषेध करत म्हटले की त्यांनी धार्मिक फूट निर्माण करण्याचा आणि भारताच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. सभागृहाने आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर केला. यावेळी विरोधक सभागृहात उपस्थित नव्हते.

औरंगाबाद नामांतराविरोधात 1 लाख 48 हजार आक्षेप

औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचे शासन आदेश राज्य आणि केंद्र सरकराने काढला आहे. दरम्यान याच निर्णयाला काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे नामांतराविरोधात आक्षेप आणि हरकती विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात येत आहे. सोबतच समर्थनार्थ देखील अर्ज दाखल केले जात आहे. तर औरंगाबादचं जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करू नये म्हणून आतापर्यंत 1 लाख 48 हजार 203 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी एका दिवसात 32 हजार 582 हरकती विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत.

राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचं सडेतोड उत्तर

राहुल गांधींवर (Rahul Gandhi) मानहानीचे 60 खटले सुरू आहेत. राहुल यांनी जाणूनबुजून अशी कामं केली. त्यांनी मागासलेल्यांचा अपमान केलाय, असा आरोप भाजप नेते रविशंकर प्रसाद (BJP leader Ravi Shankar Prasad) यांनी केलाय. राहुल गांधींच्या आरोपांना रविशंकर प्रसाद यांनी सडेतोड उत्तर दिलंय. राहुल यांच्या वक्तव्याविरोधात भाजप संपूर्ण देशात आंदोलन करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. राहुल यांच्याविरुद्ध सुरतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याकडं मोठ्या वकिलांची फौज होती. राज्यसभा आणि लोकसभेत मोठे वकील आहेत. राहुल यांच्या प्रकरणात ते सुरत कोर्टात का गेले नाहीत? असा सवाल त्यांनी केला.

कृष्णा नदी बचावासाठी सांगलीत मानवी साखळी आंदोलन

प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या कृष्णा नदीच्या बचावासाठी आज सांगलीमध्ये मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. मानवी साखळी आंदोलनात सांगली शहरासह नदीलगतच्या गावातील विविध सामाजिक संघटना तसेच पर्यावरण प्रेमी संघटना सहभागी झाल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे उमेश पाटीलही या मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले होते. 

भारतातील लोकशाहीसाठी लढत राहीन - काँग्रेस नेते राहुल गांधी

संसदेत केलेलं माझं भाषण काढून टाकण्यात आलं आणि नंतर मी लोकसभा अध्यक्षांना सविस्तर उत्तर लिहिलं. काही मंत्र्यांनी माझ्याबद्दल खोटे बोलले की, मी परकीय शक्तींची मदत घेतली. पण, मी असं काही केलेलं नाही. मी प्रश्न विचारणं थांबवणार नाही, मी पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांवर प्रश्न करत राहीन. मी अदानींना एकच प्रश्न विचारला होता. मी प्रश्न विचारत राहीन आणि भारतातील लोकशाहीसाठी लढत राहीन, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय.

sakal breaking notifiction
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचं सडेतोड उत्तर; रविशंकर म्हणाले, तुमच्यासाठी वेगळा कायदा..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

वसंत मोरे यांच्या डाॅग पाॅंड उद्घाटन कार्यक्रमाला राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. गेल्या आठवड्यात राज ठाकरेंनी वसंत मोरेंना 26 तारखेची वेळ दिली होती. उद्या सकाळी 10 वाजता राज ठाकरे पुण्यात येणार आहेत.

राहुल गांधींवर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - नितेश राणे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांना भारताबाहेर काढून पाकिस्तानला पाठवून द्या, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना भारताबाहेर काढलं पाहिजे, असेही राणे म्हणालेत. नितेश राणे कोल्हापुरात बोलत होते. 

संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईने एकिकडे अवघा देश ढवळून निघतोय. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाच्या प्रस्तावित कारवाईने वेग पकडलाय. राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग प्रक्रियेत आज मोठी घडामोड समोर आली आहे. विधान परिषदेत संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव आज मांडला गेला. महाराष्ट्रातील विधिमंडळावर टीका करताना संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या विधानभवनात उमटले. 

sakal breaking notifiction
Dalai Lama : दलाई लामांचा चीनला मोठा धक्का; अवघ्या 8 वर्षांच्या मंगोलियन मुलाला बनवलं 'धर्मगुरु'

राहुल गांधींची खासदारकी रद्द, तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला निषेध

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे म्हणत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. मविआचे आमदार तोंडाला काळी पट्टी बांधून पायऱ्यांवर बसले होते. यावेळी यातील काही आमदारांनी हातामध्ये लोकशाहीची हत्या असे फलकही धरले होते.

कोरोना विषाणूनं जोर पकडला, एक दिवसात कोरोनाचे 1590 नवीन रुग्ण आढळले

कोरोना विषाणूनं पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या एका दिवसात कोरोनाचे 1590 नवीन रुग्ण आढळले आहेत. एकूण प्रकरणांची संख्या 8.5 हजारांच्या पुढं गेली आहे. सध्या भारतात 8,601 सक्रिय प्रकरणे आहेत. उत्तराखंड, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये 1-1 मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनामुळं तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

समृद्धी महामार्गानजीक बस-ट्रकचा अपघात; 15 प्रवासी जखमी

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पूलाच्या खालच्या बाजूस आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या बसची आणि वाळूच्या ट्रकची धडक झाली. या अपघातात बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीमधील ३ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

sakal breaking notifiction
Nitesh Rane : राहुल गांधींवर कसाबप्रमाणं देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पाकिस्तानला पाठवा; राणे खवळले

राहुल गांधींना झटका बसल्यानंतर सुप्रीम कोर्टात कायद्याला आव्हान देणारी याचिका दाखल

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोर्टानं एका प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधींना बसलेल्या या झटक्यानंतर आता ज्या कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली, त्या कायद्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

बच्चू कडूंची आमदारकी कधी रद्द होणार? पुण्यात झळकले बॅनर

राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. पण २ वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याचे पडसाद शुक्रवारी देशभर उमटल्याचे पाहिला मिळाले. तसेच देशातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला. दरम्यान आता याचे पडसाद पुण्यात पाहिला मिळत आहेत. पुण्यात आज शनिवारी राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना नाशिकमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आता त्यांची आमदारकी कधी रद्द होणार असा सवाल बॅनर वरून विचारला आहे.

अभिनेत्री नीलू कोहलीच्या पतीचे निधन

मालिका आणि चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री नीलू कोहलींचे पती हरमिंदर सिंह यांचं निधन झालं. शुक्रवारी (24 मार्च) हरमिंदर सिंह हे गुरुद्वारमध्ये गेले होते. गुरुद्वारा येथून घरी आल्यानंतर ते बाथरुममध्ये गेले.  बाथरुममध्ये असताना ते कोसळले. त्यावेळी नीलू यांच्या घरातील हेल्पर तिथे होता. हरमिंदर सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा, एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व सामान्य लोकांना स्वस्त दरात गॅस मिळणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नवीन अधिसूचनेनंतर, उज्ज्वला योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांना प्रति वर्ष 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मिळणार आहे.

sakal breaking notifiction
LokSabha Election : राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर वायनाड जागेची काय स्थिती, कधी होणार पोटनिवडणूक?

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्रींवर उदयपूरमध्ये गुन्हा दाखल

उदयपूर : बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांच्यावर उदयपूरमधील समुदायांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयपूर पोलिसांनी हाथीपोल पोलीस ठाण्यात (Hathipole Police Station) पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात कलम 153-ए अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक : काँग्रेसनं पहिली यादी केली जाहीर

Karnataka Assembly Election 2023 : काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं (Congress) 124 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांच्या नावांचा समावेश आहे. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. सध्या कर्नाटकात भाजपची सत्ता आहे.

कल्याण स्टेशन परिसर : फुलांच्या दुकानाला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आगीची मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. एका फुलाच्या दुकानाला पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण पसरले आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीला मंजुरी मिळाली आहे. ही वाढ जानेवारी 2023 पासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार आहे. महागाई भत्तावाढीमुळं केंद्रावर दरवर्षी 12,815 कोटींचा बोजा पडणार आहे. वाढीव महागाई भत्त्याचा 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे.

कोरोनाचा धोका वाढला, राज्यात तीन जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. काही महिन्यात अत्यंत कमी झालेली रुग्णसंख्या आता वाढू लागू लागल्याने चिंताही वाढू लागली आहे. शुक्रवारी राज्यात 343 रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात राज्यात कोरोनाच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

आज सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी 6.55 ला कुर्ला इथं सिग्नल यंत्रणेत बिगाड झाल्यामुळं वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरा होती. सध्या वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.

Latest Marathi News : आज राज्यात विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळं विरोधक आक्रमक होऊ शकतात. काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर आता काँग्रेसच्या सर्वच खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय, बागेश्वर धामचे बाबा यांच्या विरोधात उदयपूरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तसेच देशभरात पावसाचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.