Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News Updates 13 July 2024: देशासह राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Marathi News Live Update
Marathi News Live UpdateEsakal
Updated on

पुण्यात रविवारी मुसळधार पावसाची शक्यता

मॉन्सून सक्रिय झाल्याने पुणे जिल्ह्यातच दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. तर घाटमाथ्यावरही पावसाची संततधार सुरू आहे. रविवारी (ता.१४) जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत

अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने अंबरनाथवरून कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा मागील अर्ध्या तासापासून विस्कळीत झाली आहे. अतिरिक्त इंजिन मागवून मालगाडी पुढे नेण्यात येणार आहे.

उल्हासनगरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

उल्हासनगर शहरात दमदार पाऊस सुरु आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे, साचेलेल्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास सुरु आहे.

कल्याण रेल्वे स्टेशनजवळील चाळीमध्ये शिरले पावसाचे पाणी

कल्याण रेल्वे स्टेशनजवळील तहसील कार्यलयामागील चाळीमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. गटाराच्या कामांमध्ये नियोजन नसल्याने पाणी तुंबल्याचा आरोप होत असून शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगरसेविकेच्या घरात पाणी शिरले आहे.

PM Narendra Modi Live : महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य - PM मोदी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. मुंबई-ठाणे येथील विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. मोदी म्हणाले, तिसऱ्या कार्यकाळात सरकार तिप्पट गतीने काम करणार, मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्याचं लक्ष्य आहे. महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य, या शिवाय महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात नंबर एक बनवणार, असंही मोदी म्हणाले.

Eknath Shinde live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामात राम आणि सोबत बाबासाहेबांचं संविधान - मुख्यमंत्री शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामात राम आणि सोबत बाबासाहेबांचं संविधान आहे, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते मुंबई-ठाणे येथील विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. मोदींनी आपल्या देशाचं जगात नाव मोठं केलं, असंही ते म्हणाले. इथे क्लिक करा

Ajit Pawar live : मोदीजी केवळ विकास पुरुष नाहीत, तर सर्वसामान्यांचे प्रधानसेवक आहेत - अजित पवार

मुंबई -ठाणे येथील विकासकामांचे 29 हजार कोटींहून अधिकच्या कामांचा शुभारंभ भूमिपूजन करत आहोत. गेल्या 10 वर्षात देशाचा मोठा विकास झाला आहे. त्यामुळे मोदींना विकास पुरुष म्हटलं जातं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मोदीजी केवळ विकास पुरुष नाहीत, तर सर्वसामान्यांचा विकास व्हावा यासाठी ते काम करणारे प्रधानसेवक आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केले.

Ashadhi Ekadashi live : मुख्यमंत्री शिंदे आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीचा आढावा घेणार

बारामती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी (ता. 14) मुंबईहून विमानाने बारामती येथे येणार असून बारामतीतून रस्तेमार्गे पंढरपूरकडे जाणार आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पूर्वतयारी व सर्व व्यवस्थेची पाहणी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असून त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. सकाळी नऊ वाजता मुंबई विमानतळावरुन विमानाने निघून मुख्यमंत्री साडेनऊ वाजता बारामती विमानतळावर येतील. तेथून ते मोटारीने पंढरपूरच्या दिशेने प्रयाण करणार आहेत. दुपारी तीन वाजता पुन्हा ते बारामतीला परत येऊन शासकीय विमानाने मुंबईला रवाना होणार आहेत.

Vishalgad live : विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी संभाजीराजे उद्या गडावर जाणार

आंबा : विशाळगडगडावरील अनाधिकृत अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी उद्या, रविवारी हिंदूत्ववादी संघटना व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती थेट विशाळगडावरील अतिक्रमण विरोधात आंदोलन छेडीत आहेत. या पार्श्वभूमीवर विशाळगडला कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil live : आजचा दिवस वाट पाहणार, मराठ्यांचा रोष सरकारला परवडणार नाही; जरांगेंचा इशारा

मराठा आरक्षणासाठी सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी १३ जूनचा अल्टीमेटम् दिला होता. आज त्यांच्या अल्टीमेटमचा शेवटा दिवस आहे. जरांगेंनी आजचा दिवस वाट पाहणार आहे, जर योग्य निर्णय घेतला नाही तर सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही, असा इशारा दिलाय. इथे क्लिक करा

Cow Milk Rate live : गायीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ

पुणे : गायीच्या दुधाच्या दरात आता २ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना आता प्रतिलिटरमागे दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहे. पुण्यात पार पडलेल्या दुध उत्पादकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इथे क्लिक करा

Assembly by-elections live : विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस चार, तर भाजपने जिंकल्या 2 जागा

विधानसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या 13 जागांपैकी काँग्रेसने चार जागा जिंकल्या तर, टीएमसीने 4 जागा जिंकल्या आहेत. पंजाबमधील जालंधर पश्चिम मतदारसंघात 'आप'ने विजय मिळवला आहे. शिवाय, भाजपने 2 जागा जिंकल्या, तर द्रमुकने 1 जागा जिंकली. बिहारच्या रुपौली जागेवर अपक्ष उमेदवार शंकर सिंह विजयी झाले आहेत.

Badrinath Constituency : अयोध्येपाठोपाठ भाजपने बद्रीनाथची जागाही गमावली

पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अनेक महत्त्वाच्या जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यातील सर्वात दणदणीत पराभव उत्तराखंडमधील बद्रीनाथ मतदारसंघात मानला जात आहे. बद्रीनाथ हे चारधाम अंतर्गत येत असून विविध पौराणिक ठिकाणी विकासकामे होत असतानाही हा पराभव भाजपसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रभू राम जन्मभूमीवर भाजपचा पराभव होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

Monsoon live Update : गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरु; रस्त्यांवर साचले पाणी

गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

Bus Accident live : 200 फूट खोल दरीत बस कोसळून दोन ठार, तर अनेक प्रवासी जखमी

डोडा, जम्मू-काश्मीर: भालेसा ते थाथरीला जाणारी बस रस्त्यावरून घसरून 200 फूट खोल दरीत कोसळल्याने दोन ठार आणि अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

Dombivli Rain Live : कल्याणमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची संततधार, तर कधी मुसळधार सुरू असून शनिवारी दुपारी अनेक सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या समोरच गुडघाभर पाणी साचल्याने वाहन चालक, शाळकरी मुले यांना या पाण्यातून चालत जावे लागले.

Jogeshwari Temple Live : भैरवनाथ माता जोगेश्वरी मंदिरातील दानपेटी फोडली

निरगुडसर : शिंगवे (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्रीभैरवनाथ माता जोगेश्वरी मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबवली आहे, ही घटना शुक्रवार (ता. १२) मध्यरात्री घडली. या परिसरात ड्रोन फिरल्यानंतर चोरी झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Live : मराठा-मुस्लिम बांधवांच्या घोषणांनी बिडकिन परिसर दणाणला

बिडकीन : आज छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाशांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या शांतता रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी सहभाग घेतला असताना दुसरीकडे मुस्लिम बांधवांच्या वतीने ही जरांगे पाटील यांना पाठिंबा देत मोठ्या संख्येने रॅलीला निघाले आहे.

Sudarsan Pattnaik  Live Update: रशियातील आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनाईकने जिंकला गोल्डन सँड मास्टर पुरस्कार

रशियातील आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनाईकने जिंकला गोल्डन सँड मास्टर पुरस्कार. त्यांनी चॅम्पियनशिपमध्ये महाप्रभू जगन्नाथ आणि त्यांचे महान भक्त बलराम दास यांचे वाळूचे शिल्प तयार केले होते.

Ashwini Vaishnaw Live Update: सध्या देशभरात सुमारे 25 लाख लोकांना रोजगार आहे

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "माध्यम आणि मनोरंजन उद्योग हा रोजगाराचा एक मोठा स्रोत आहे, सध्या देशभरात सुमारे 25 लाख लोकांना रोजगार आहे. उद्योगातील तंत्रज्ञानाची भूमिका लक्षात घेऊन, अधिकाधिक रोजगार निर्माण करण्याची गरज आहे."

Nagpur Live Update : नागपुरात उड्डाण पुलावरून खाली कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागपुरातील पारडी उड्डाण पुलावर आज दुपारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेतील बाईकस्वार तरुण चिखलीवरून पारडीच्या दिशेने जात असताना तीव्र गतीमुळे त्या तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, त्याची दुचाकी उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकली. धडकेमुळे दुचाकी पुलावर राहिली, मात्र तो तरुण उड्डाण पुलाखाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

Worli Hit and Run Case Live Update : मिहीर शहाचे ड्रायव्हिंग लायसेन्स रद्द करण्याची पोलिसांची मागणी

वरळीतील अपघातास जबाबदार असलेला मिहीर शाह याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली असून, पोलिसांनी मिहीर शहाचे ड्रायव्हिंग लायसेन्स रद्द करण्याची मागणी केली आहे.

Ghatkopar Hoarding Accident Live : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात विशेष तपास पथकाने न्यायालयात ३,२९९ पानी आरोपपत्र केले दाखल

13 मे राेजी घडलेल्या घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने न्यायालयात ३,२९९ पानी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात चार अटक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपपत्रात BMCचे दोन अधिकारी आणि सहा जीआरपी अधिकाऱ्यांच्या जबाबांचा समावेश आहे

TMC Kunal Ghosh Live : दिल्लीत मोदी सरकार फार काळ टिकणार नाही - कुणाल घोष

टीएमसी नेते कुणाल घोष म्हणाले, विधानसभेच्या पोटनिवडणुकीत टीएमसीने 2 जागा जिंकल्या हे घडणे निश्चितच होते. दिल्लीत मोदी सरकार फार काळ टिकणार नाही आणि त्यात टीएमसीची भूमिका महत्त्वाची असेल.

K. C. Tyagi Live : 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून घोषित; केसी त्यागी काय म्हणाले...

भारताच्या इतिहासात 1975 च्या आणीबाणीच्या स्मरणार्थ 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या निर्णयाचे स्वागत करताे.

Milind Narvekar Meet Uddhav Thackeray: मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर दाखल, घेतली उद्धव ठाकरेंची भेट

विधान परिषद निवडणुकीतील विजयानंतर मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

Chiplun Wall Collaps Live: चिपळूणमध्ये कॉलेजची संरक्षण भिंत कोसळली, विद्यार्थ्यांचा मृत्यू

चिपळूणमध्ये डीबीजी कॉलेजची संरक्षण भिंत कोसळून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे ही भिंत कोसळल्याची प्राथमिक माहीती आहे.

Pandharpur Live: पंढरपुरात पोषण आहारात सापडले मृत बेडूक

पंढरपुरात कासेगावच्या भूसेनागर अंगणवाडीच्या पोषण आहारात मृत बेडूक सापडले आहेत. त्यामुळे बालकाच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं म्हणत शासनावर टीका केली जात आहे.

Mumbai Rain Update Live: मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर वाढला, पाणी साचण्यास सुरुवात

मुंबई आणि नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रत्नागिती, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

AAP’s Mohinder Bhagat wins Jalandhar West seat in Punjab: जालंधर पोटनिवडणुकीत आपच्या मोहिंदर भगत यांचा विजय

पंजाबमध्ये आपचे उमेदवार मोहिंदर भगत यांचा विजय झाला आहे. सुरुवातीपासून त्यांनी आघाडी घेतली होती. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दृष्टीने हा विजय महत्त्वाचा आहे.

Ajit Pawar Live: नागपुरात विधान परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विजयानंतर अजित दादाचे बॅनर

नागपुरात विधान परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विजयानंतर अजित दादाचे बॅनर लावण्यात आले आहेत. अजितदादा राजकारणातील चाणक्य असल्याच्या आशयाचे बॅनर झळकले आहेत.

नागपूरच्या विधान भवन परिसरात बॅनर लावले आहेत. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना शुभेच्छा देणारे हे बॅनर आहेत. नागपूर अजित पवार गटाचे प्रशांत पवार आणि शिवराज बाबा गुजर यांच्याकडून शुभेच्छा बॅनर लावण्यात आलेत.

Ajit Pawar Live: अजित पवार आज सकाळी दिल्लीला रवाना

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे. राज्यांतील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने भेट असण्याची शक्यता आहे.

Vidhan Sabha Bypolls Result Live: पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांची पत्नी पिछाडीवर

हिमाचलच्या तीन विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, हॉट सीट देहरा येथील मतमोजणीच्या पहिल्या फेरीत, भाजपचे उमेदवार होशियार सिंह यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या कमलेश ठाकूर यांच्यावर 360 मतांची आघाडी घेतली आहे.

हिमाचलचे मुख्यमंत्री सखू यांच्या पत्नीला देहरा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, त्यामुळे सर्वांच्या नजरा या जागेवर लागल्या आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देहरामध्ये मतमोजणीच्या एकूण 10 फेऱ्या होणार आहेत. दुसऱ्या फेरीनंतर भाजपचे होशियार सिंह यांना ४९४२ तर काँग्रेसचे कमलेश ठाकूर यांना ४५८२ मते मिळाली. या जागेवर पाच उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

Vidhan Sabha By-Polls: विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

7 राज्यांतील विधानसभेच्या 13 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू झाली आहे. यात हिमाचल प्रदेशातील देहरा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार, होश्यार सिंग सध्या आघाडीवर आहेत.

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महाराष्ट्रासह गोव्याला पाऊस झोडपणार

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील २४ तासांत दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस पडेल, असे विभागाने म्हटले आहे.

PM Modi Live: मुंबईत पंतप्रधान करणार 29 हजार 400 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गोरेगाव, मुंबई येथील अभियांत्रिकी सेवा कंपनी नेस्को प्रदर्शन केंद्रात 29 हजार 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहे.

Maharashtr News Live: विधान परिषद निवडणुकीत मतफुटी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, एका क्लिकवर वाचा महत्त्वातच्या घडामोडी

Breaking Marathi News Updates 13 July 2024 : राज्यात नुकतीच विधान परिषद निवडणूक पार पडली. यामध्ये महायुतीची सरशी झाली, तर महाविकास आघाडीला मतफुटीचा फटका बसला. यामध्ये काँग्रेसचे काही आमदार फुटले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या फुटीर आमदारांवर काँग्रेस काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यासह काही दिवसांपासून राज्यासह देशातील विविध भगांमध्ये पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत असून ते मुंबईमध्ये अनेक विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. यासह ते अनंत अंबानी यांच्या रिसेप्शनलाही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.