- मराठवाड्यात भाजपला आणखी एक धक्का
- माजी आमदार सुधाकर भालेराव यांची भाजपला सोडचिठ्ठी
- भालेराव लवकरच करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
- लातुरात भाजपला मोठा धक्का
- भालेरावांच्या रूपाने राष्ट्रवादीला उदगीरमध्ये मिळाला मोठा चेहरा
- भालेराव हे येत्या निवडणुकीत विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात उमेदवार असू शकतील
- भालेराव मागासवर्गीय समाजातील भाजपचे महत्त्वाचे नेते होते.
वरळीतील हिट अँड रन प्रकरणी आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जुहू येथील वाईस ग्लोबल तापस बार वर कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाकडून दोन दिवस तपासणी करण्यात आल्यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून यापुढे या बारमध्ये दारू विक्रीस बंदी करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाकडून या बारला सील देखील ठोकण्यात आले आहे न्यायालयीन आदेश येईपर्यंत हे सील कायम राहणार आहे.
NEET-UG पेपर लीक प्रकरणी CBI ने बिहारमधून आणखी दोघांना अटक केली असल्याची माहिती मिळत आहे. या दोघांना बिहारच्या नालंदा आणि गया जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
सातारा : जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस सुरू आहे. पावसाळी पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धबधबे, जलाशयासारख्या धोकादायक ठिकाणी ग्रामपंचायतींनी प्रवेश बंदीचे फलक लावावेत. सडावाघापूरसह इतर ठिकाणीही पोलिसांनी गस्त वाढवून हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. पालकमंत्री देसाई यांनी अतिवृष्टीतील उपायोजनांबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे यंत्रणांचा आढावा घेतला.
सांगली : येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्यावर सेल्फी घेताना पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह शिरटी (ता. शिरोळ) येथे आज सापडला. त्याच्या शोधासाठी तब्बल ४८ तास शोधमोहीम राबविण्यात आली. मृतदेहाने नदीतून सुमारे ४० किलोमीटर प्रवास केला. मोईन मोमीन (वय २४, हनुमाननगर, सांगली) असे तरुणाचे नाव आहे. रविवारी (ता. ७) दुपारी कृष्णेत सांगलीवाडीकडील बाजूला बंधाऱ्यावर सेल्फी घेताना तोल जाऊन तो पाण्यात पडला होता.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) आज सोनीपत जिल्ह्यातील राय येथील आमदार मोहनलाल बडौली यांची पक्षाच्या हरियाणा युनिटचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. असे असतानाही पक्षाने त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
सोलापूरमधील करमाळा तालुक्यात येणाऱ्या दिंड्यापैकी सर्वात मोठी असलेली श्री संत निवृत्ती महाराज पालखीचा प्रवेश झाला. यावेळी जेसीबीतून वारकरी व पालखीवर पुष्पवृष्टी व भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेतील चर्चेदरम्यान आरोग्य विभागाचे धक्कादायक प्रकरण बाहेर काढले. भाजपच्या एका आमदाराने कोव्हिड महामारीच्या काळात मेलेल्या व्यक्तींना जीवंत दाखवून शासनाच्या सवलतींच्या माध्यमातून पैसे काढल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यावं, तसंच नवी मुंबई एअरपोर्टला दि. बा. पाटील यांचं नाव द्यावं, अशी मागणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. हे प्रस्ताव केंद्राकडे पाठवले आहेत, त्यावरही रिपोर्ट द्यावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नाशिकच्या सप्तशृंगी गड परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. घाटमाथ्याहून जाणाऱ्या रस्त्यावर कोसळणारे धबधब्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलं आहे. वाहनधारकांना वाहनं चालवताना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागत आहे.
देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालंची भेट घेतली आहे, मात्र, या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशसोहळा पार पडला. यावेळी ठाकरे गटात वसंत फुलला असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
उत्पादन शुल्क विभागाने जुहू येथील व्हाईस ग्लोबल तापस बार सील केला आहे. जिथे आरोपी मिहीर शाहाने भेट दिली होती. 2 दिवसांच्या तपासणीनंतर उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांची पायमल्ली केल्याचे समोर आल्याने या बारवर कारवाई करण्यात आली आहे.
''धनदांडग्यांच्या मुलांकडून सर्वसामान्य जनता चिरडली जावी, अशी सरकारची इच्छा असून आरोपींना सरकारचे संरक्षण आहे. म्हणूनच हिट अँड रन प्रकरणातील आरोपी असेच महाराष्ट्रात फिरत आहेत'' अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील मॉस्को येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी रशियन सांस्कृतिक मंडळाच्या कलाकारांची भेट घेतली
पंतप्रधान मोदी म्हणाले, ''भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कौतुक करेन. दोन दशकांहून अधिक काळ ही भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रचंड काम केले आहे. गेल्या 10 वर्षात रशियात येण्याची ही सहावी वेळ आहे आणि या वर्षांमध्ये आम्ही 17 वेळा एकमेकांना भेटलो आहोत. या सर्व बैठकांमुळे विश्वास आणि आदर वाढला आहे.''
मुंबई BMW हिट-अँड-रन : कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप लीलाधर नाखवा यांनी सांगितले... मी त्याला थांबायला सांगितले, तरीही तो थांबला नाही; तो पळून गेला. तिला खूप वेदना झाल्या असतील, गरिबांसाठी कोणीही नाही.
मुंबईत वरळी येथे हीट अँड रनची घटना घडली आली आहे. एका भरधाव कारने महिलेला उडवले असून यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना अॅट्रिया मॉलजवळ घडली. कॉंग्रेस नेते अस्लम शेख म्हणाले वरळीत जी हिट अँड रनची घटना घडली त्यातल्या मृत महिलेला १० लाखाची मदत करावी.
तामिळनाडूचे बसपा प्रमुख के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येबाबत द्रमुकचे प्रवक्ते सर्वानन अन्नादुराई यांनी सांगितले की दोषींना पकडण्यात आले आहे. संपूर्ण तपास सुरू असून यामागे कोणाचा हात होता ते उघड होईल. तामिळनाडू पोलिस याचा कसून तपास करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आज जेव्हा भारत जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, जगातील सर्वात उंच पुतळा बांधतो, तेव्हा जग म्हणते, भारत बदलत आहे आणि याच कारण म्हणजे 140 कोटी नागरिकांचा विश्वास.
तिसरी आघाडी करण्याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बैठकीनंतर घेतला जाईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
''मी तिसरी आघाडी करणार पण महाविकास आघाडीत जाणार नाही'' अशी माहिती कडूंनी दिली.
आज सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते यशवंतरावांच्या समाधी स्थळाला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कराडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर राष्ट्रवादीचे नेते अभिवादनाला करणार असून असून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन लवकरच कराडला जाणार असल्याची माहिती आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शेगाव येथून आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज दुपारच्या सुमारास सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन होणार आहे. दुपारी गंगेवाडी येथे या पालखीचे स्वागत करण्यात यणार आहे. त्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे या पालखीचा जिल्ह्यातील पहिला मुक्काम असणार आहे.
सांगोला शहर व तालुक्यात रविवारी (ता. 7) रोजी सर्वच महसूल मंडळमध्ये कमी अधिक 16.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही अनेक भागात पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील सुमारे 30 हजार हेक्टरवर पेरणी झालेल्या खरीप पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते आज सिद्धीविनायकाच दर्शन घेणार आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री, आमदार आणि पदाधिकारी सगळेच बाप्पाच दर्शन घेणार आहेत. सगळ्या नेत्यांसाठी पक्ष कार्यालयात बसची व्यवस्था करण्यात आलीये. येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा नवा अध्याय.
मराठा आरक्षणाच्या लढ्याला अधिक बळ मिळावे याकरिता मनोज जरांगे पाटलांनी मागच्या 6 जुलै पासून मराठवाड्यात महाशांतता रॅली काढली आहे. ही रॅली आज लातूरमध्ये निघणार आहे. आज दुपारी बारा वाजता छत्रपती शाहू महाराज चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली निघणार आहे, दरम्यान लातूर जिल्ह्यातील जवळपास पाच लाखापेक्षा अधिक मराठा बांधव या रॅलीत सहभागी होतील अशी अपेक्षा मराठा बांधवांनी व्यक्त केली, तर रॅलीसाठीची जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे.
आसाममधील पुरात आतापर्यंत 72 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील पूरस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी 27 जिल्ह्यांतील 22 लाखांहून अधिक लोक अजूनही पुराशी झुंज देत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे दिनांक ०९ व १० जुलै रोजीच्या उमेदवारांच्या चाचणी वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्यात आले आहेत. दिनांक ०९ व १० जुलै २०२४ रोजी कोणीही उमेदवारांनी भरती प्रक्रियेकरिता नेहुली क्रीडा संकुल येथे उपस्थित राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे, मुंबई विद्यापीठातील आज (9 जुलै 2024) होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आल्या असून, नवीन तारखा लवकरच जाहीर होतील अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
Breaking Marathi News Updates 9 July 2024 : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यासह देशातील विविध भगांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे तेथे आतापर्यंत 80 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जनावरेही दगावली आहेत.
दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहेत. आज रशियाचा दौरा आटोपून ते पुढे ऑस्ट्रिया देशाचा भेटीसाठी जणार आहेत.
येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात 11 जगांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्व पक्ष मतांची जुळवाजुळव करत आहेत.
यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.