भाजपचा उद्धव ठाकरेंवर इतका राग का? शिवसेना संपवण्याचे 'कट' कारस्थान

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर इतका राग का ?
Uddhav Thackeray And Narendra Modi
Uddhav Thackeray And Narendra Modie sakal
Updated on

शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरी हे फक्त महाविकास आघाडी सरकार वाचवणे हे नसून भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रात वाढत जाणारा प्रभावापासून पक्ष वाचवणे हा अग्रक्रम आहे. भाजप अगोदरच शिवसेनेच्या तुलनेत गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये वाढली आहे. ती संख्या आणि मतदान प्रमाणात वाढ झाली आहे. १९९० पासून ते २००४ पर्यंत शिवसेना (Shiv Sena) विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या पुढे होते. हा ट्रेंड २००९ मध्ये बदल झाला. यावेळी पहिल्यांदा भाजपने शिवसेनेपेक्षा दोन जागा जिंकल्या होत्या. (Maharashtra Political Crisis BJP Why Anger On Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray And Narendra Modi
Maharashtra | बंडखोर शिवसेना आमदारांची हाॅटेलवारी जोरात, जनता मात्र वाऱ्यावर

हा किरकोळ फरक २०१४ मध्ये भरुन निघाला. यावेळी भाजपने १२२ जागा जिंकल्या. ही संख्या शिवसेनेच्या ६३ पेक्षा दुप्पट होती. २०१९ मध्ये हा फरक कमी झाला. आता भाजपची विधानसभेतील सदस्य संख्या १०५ असून ती शिवसेनेच्या (५५) तुलनेत जास्त आहे. मतदानाच्या टक्केवारी बाबतही भाजप शिवसेनेपुढे गेले. भाजपची टक्केवारी विधानसभा निवडणुकांमध्ये १०.७१ टक्के, १९९० ते २०१९ मध्ये २५.७५ टक्के होते. याच काळात शिवसेनेचे मतातील टक्केवारी १५.९४ पासून ते १६.४१ पर्यंत काहीशी वाढली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची वाढ जवळपास १३.५ टक्के होती. शिवसेनेच्या २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक होते. (Maharashtra Politics)

Uddhav Thackeray And Narendra Modi
आता कुणाला खरा वाघ म्हणायचं, हेमांगी कवीचा सवाल

शिवसेनेची मतदान टक्केवारी सुमारे ३ टक्क्याने गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढले. दुसरीकडे लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा शिवसेनेच्या तुलनेत मतदान टक्केवारी पुढे गेली. गेल्या दोन निवडणुकांध्ये भाजपने २३ जागा, तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या. १९९१ ते २००९ मध्ये दोन्ही पक्षांनी प्रत्येकी तीन निवडणुकांमध्ये भाजप व शिवसेनेने एकमेकांचा सन्मान केला. ही सर्व आकडेवारी दाखवते, की भाजप (BJP) हळूहळू वाढू आणि राजकीय प्रभाव राज्यात पसरवू लागला आहे. हा निश्चितच शिवसेनेसाठी चिंतेची बाब आहे. हे थांबवण्यासाठी पक्ष झुंज देत आहे. हिंदुत्वाचा विचार महत्त्वाचा मानणाऱ्या शिवसेनेचा राजकीय जागेसाठी भाजपबरोबर स्पर्धा आहे. यातूनच सध्याचे मित्र पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तुलनेत पक्षासमोर भाजपचे मोठे आव्हान आहे. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही भारतातील हिंदुत्वाची शक्ती मोठी मानली जात होती.

Uddhav Thackeray And Narendra Modi
शरद पवार ठाकरेंच्या भेटीला 'वर्षा'वर; सरकार वाचणार की...

मात्र आता ते सर्व बदलल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप हिंदुत्वाच्या अजेंड्यासाठी लढणारा सर्वात ताकदवान राजकीय शक्ती बनली आहे. उद्धव ठाकरे यांना जाणवू लागले की त्यांचा पक्ष भाजपबरोबर जास्त काळ बरोबर राहू शकत नाही. भाजपला काही वर्षात मोठा फायदा झाला. त्यातून राष्ट्रवादी आणि काँग्रसेसह शिवसेनेसाठी भाजप धोका बनला आहे. कदाचित यातून उद्धव ठाकरे यांना जाणीव झाली असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसबरोबर २०१९ मध्ये जाऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवले. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. भाजपला आता संधी आहे की २०१९ मधील शिवसेनेकडून बदला घेण्याचा. सरकार स्थापन करुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची त्यांच्या पक्षावरील नियंत्रण मोडीस घालण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.