बांग्लादेशातील हिंदूंचे संरक्षण करा; बांग्ला उप उच्चायुक्तांना लोढांचे साकडे

Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodhasakal media
Updated on

मुंबई : बांग्लादेशातील (Bangladesh) हिंदुवर धर्मांध अतिरेक्यांकडून (terrorist) होणारे अत्याचार वेदनादायी असून ते थांबवावेत, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat lodha) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज येथील बांग्लादेशच्या उप उच्चायुक्तांकडे केली.

Mangal Prabhat Lodha
मुंबई महापालिकेचे अन्नदान संशयांच्या भाेवऱ्यात; कॉंग्रेसचा आरोप

नवरात्रीच्या काळात बांगलादेशमधील मंदिरे आणि देवी-देवतांच्या मूर्तींवर झालेल्या हल्ल्यांबाबत निषेध नोंदवण्यासाठी लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बांगलादेशच्या येथील उपउच्चायुक्तांची आज भेट घेतली. बांग्लादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार सुरूच असून याबाबत ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराजजी, मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, विश्व हिंदू परिषदेचे धनंजय पंडित तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी हजर होते. यावेळी उपउच्चायुक्तांना निवेदनही देण्यात आले.

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यामागे स्थानिक दहशतवादी संघटना आहेत. त्यांच्या चिथावणीखोर अफवांमुळे हिंदूंवर आणि मंदिरे, देवी-देवतांच्या मूर्त्यांवर वारंवार हल्ले केले जात आहेत, असे लोढा यांनी यावेळी सांगितले. तर भारताचे बांगलादेशशी चांगले संबंध आहेत. परंतु तेथील हिंदूंचा अशाप्रकारे छळ करणे म्हणजे हे संबंध कायमचे संपवण्यासारखे आहेत, असे विश्वेश्वरानंद महाराज म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.