नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यावर काल ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाला, त्यानंतर आता शिंदे गटाचा युक्तीवाद सुरु झाला आहे. यामध्ये हरिश साळवे सुरुवातीला युक्तीवाद करत आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे गटाकडून नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला देत जी याचिका दाखल केली आहे. ही याचिकाच त्यांना मागे घ्यावी लागेल असा दावा केला आहे. (Maharashtra Politics then Thackeray group will have to withdraw the petition itself says Harish Salve in Supreme Court)
अॅड. साळवे म्हणाले, "जर नबाम रेबिया प्रकरणाचा हवाला योग्य नसेल तर विरोधी पक्षाला म्हणजे ठाकरे गटाला त्यांची याचिकाच मागे घ्यावी लागेल. कारण याच केसला पुढे करत एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता रेबिया केसमधील काही त्रृटी ठाकरे गटाकडून पुढे करण्यात आल्या आहेत. पण त्यांना जर हे मान्य नसेल तर त्यांना त्यांची याचिकाच मागे घ्यावी लागेल"
नबाम रेबियाचा २०१६चा जो निकाल आहे त्यानुसार, अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस असेल तर त्यांना कारवाईचा अधिकार नाही. महाराष्ट्राच्या घटनाक्रमानुसार, राहुल नार्वेकर यांना देखील अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यावेळी त्यांनी त्या १६ आमदारांविरोधात नोटिस काढली होती ज्यांनी व्हीपच्या विरोधात मतदान केलं होतं. या कारवाईविरोधात सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे. यासाठी त्यांनी याचिकेत रेबिया प्रकरणाचा हवाला दिल्याचं साळवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज शिंदे गटाकडून हरिश साळवे यांच्यानंतर नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी या क्रमानं युक्तीवाद होणार आहे. त्यानंतर राज्यपालांच्यावतीनं तुषार मेहता हे युक्तीवाद करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.