जय महाराष्ट्र! राजपथावरील परेडमध्ये चित्ररथाला बहुमान

उत्तर प्रदेशचा चित्ररथ ठरला सर्वोत्तम.
Maharashtra tableau
Maharashtra tableau-
Updated on

दिल्ली : 26 जानेवारी 2022 रोजी देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day of India 2022) झालेल्या दिल्लीत झालेल्या परेडमध्ये 'पॉप्युलर चॉईस' प्रकारात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा (Tableau) प्रथम क्रमांक आला आहे. तर लष्करी तुकड्यांमध्ये सीआयएसएफला (Central Industrial Reserve Force) सीएपीएफमधील सर्वोत्तम परेड करणारी तुकडी म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

Maharashtra tableau
मोदी सरकारचा मोठा निर्णय; प्रजासत्ताक सोहळ्याची नवी तारीख जाहीर
Maharashtra tableau
महाराष्ट्राच्या तरुणाला मायक्रोसॉफ्टचा MVP पुरस्कार; राज ठाकरेंना भेटणार

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्रातील जैवविविधतेवर आधारित चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जैवविविधतेचं दर्शन संपूर्ण भारतवासीयांना घडून आलं. प्रजासत्ताक दिन परेडमध्ये भारतीय नौदलाची सर्वोत्तम मार्चिंग तुकडी म्हणून निवड झाली असून, लोकप्रिय निवड श्रेणीत भारतीय वायुसेनेचा विजय झाला आहे. शिक्षण मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला मंत्रालयांच्या श्रेणीतील संयुक्त विजेते म्हणून, घोषित करण्यात आलं आहे.

Maharashtra tableau
मार्च अखेरीस राज्यात कोरोनाच अंत : राजेश टोपे

‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कास पठाराचा समावेश असून येथे आढळणाऱ्या दुर्मिळ फुलांसोबतच ‘सुपरबा’ या दुर्मिळ सरड्याची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’च्या सुमारे 15 फुटांची आकर्षक प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याशिवाय चित्ररथाच्या पुढच्या भागात महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू (butterfly) ‘ब्ल्यू मॉरमॉन’च्या आठ फूट उंचीच्या देखण्या प्रतिकृतीने चित्ररथाची शोभा वाढवली. तसेच महाराष्ट्राचे राज्यफुल ‘ताम्हण’चे सुमारे दीड फूटाचे गुच्छही ठेवण्यात आले आहेत. त्यावर छोटी छोटी फुलपाखरेही दाखवण्यात आली आहेत. चित्ररथावरील महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’च्या प्रतिकृतीवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या तसेच शेवटच्या टप्प्यातील सुमारे 15 फुटाचं आंब्याचे झाड विशेष आकर्षक दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.