Maharashtra Weather Updates: अतिवृष्टीचा इशारा, सहा लाख लोक विस्थापित, महाराष्ट्रात काय आहे पावसाची परिस्थिती?

Maharashtra Rain Alert: अरबी समुद्रातील आर्द्रता आणि पूर्वेकडील उष्णतेमुळे तीव्र हवामानाचा सामना करणाऱ्या आंध्र प्रदेशात सुमारे सहा लाख लोकांना स्थलांतर करावे लागले आहे.
Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Updatesakal
Updated on

Maharashtra Rain Updates Today:

सध्या देशाच्या विविध भागात पूर आणि पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्र, गुजरात, किनारी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि राजस्थानसह आठ राज्यांमध्ये शुक्रवारी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दुसरीकडे अरबी समुद्रातील आर्द्रता आणि पूर्वेकडील उष्णतेमुळे तीव्र हवामानाचा सामना करणाऱ्या आंध्र प्रदेशात सुमारे सहा लाख लोकांना स्थलांतर करावे लागले आहे.

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

दरम्यान महाराष्ट्रातीलक काही भागात जोरदार पाऊस झाला होता. यामध्ये महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान आणि रत्नागिरीचा समावेश होता.

दुकरीकडे पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रातही मोठा पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान गेल्या आठवड्या महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने चांगलेच झोडपले होते. यामुळे दोन्ही भागांना पुराचा फटका बसला होता. परिस्थिती इतकी भीषण होती की, शेतकऱ्यांची उभी पिके मातीमोल झाली आहेत. यामुळे पूराचा भटका बसलेल्या भगांतून नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी होत आहे.

या पावसामुळे दोन्ही भागांतील जवळपास वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी शेतकऱ्यांचे खरीपाचे पीक मात्र वाया गेले आहे.

Maharashtra Weather Update
Times Tower Fire: कमला मिल्स परिसरातील आगीत जेव्हा 14 जणांनी गमावला होता जीव; 200 लोकांसोबत 2017 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

आठवडाभर विदर्भात धुमाकूळ घातल्यानंतर पाऊस आता हळूहळू पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाकडे वळवताना दिसत आहे. कारण काही भाग सोडला तर विदर्भातील अनेक भगांत पाऊस आता थांबला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि साताऱ्या जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. दुसरीकडे मुंबईमध्येही काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली आहे.

Maharashtra Weather Update
Mumbai Times Tower Fire: कमला मिल येथील टाइम्स टॉवरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.