गांधीजींनी बोस यांची हत्या केली; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

Mahatma Gandhi assassinated Subhash Chandra Bose
Mahatma Gandhi assassinated Subhash Chandra BoseMahatma Gandhi assassinated Subhash Chandra Bose
Updated on

जयपूर : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी सुभाषचंद्र बोस (Mahatma Gandhi) यांची हत्या केली होती, असे वक्तव्य राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील भाजप खासदार नरेंद्रकुमार खिचड यांनी केले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खासदार खिचड यांनी आपली जीभ घसरल्याचे स्पष्टीकरण दिले. (Mahatma Gandhi assassinated Subhash Chandra Bose)

२५ जून रोजी बाकरा गावात स्वातंत्र्यसैनिक शेओलाल खिचड यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला खासदार खिचड गेले होते. पंतप्रधान एकच होणार होता. यामुळे महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी सुभाषचंद्र बोस यांना निवडणुकीसाठी पटवले आणि मारले, असे खिचड कार्यक्रमात म्हणाले. या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

Mahatma Gandhi assassinated Subhash Chandra Bose
महिला म्हणताहेत, गर्भपाताचा अधिकार मिळाल्यानंतरच संबंध बनवणार

वडिलांचा खून करून मुलगा राज्य करतो, अशी राजा महाराजांच्या काळापासूनची परंपरा असल्याचेही खासदार खिचड म्हणाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावेळीही ही भावना होती. मी महात्मा गांधींचा आदर करतो. त्याचा फोटो ऑफिसमध्ये लावला आहे, असेही खासदार खिचड म्हणाले.

सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले पंतप्रधान व्हायला हवे होते. गांधीजींनी म्हटले असते तर सुभाषचंद्र बोस पंतप्रधान होऊ शकले असते. परंतु, त्यांनी जवाहरलाल नेहरूंना पसंती दिली. महात्मा गांधी यांच्यामुळेच सुभाषचंद्र बोस (Mahatma Gandhi) पंतप्रधान होऊ शकले नाहीत. गांधींनी सुभाषचंद्र बोस यांची राजकीय हत्या केली. गांधींनी बोस यांना मारले असे म्हणायचे नव्हते, असे स्पष्टीकरण खासदार खिचड यांनी वादानंतर दिले.

Mahatma Gandhi assassinated Subhash Chandra Bose
महाराष्ट्रात भाजप सरकार स्थापन करणार? ‘हे’ आहेत मोठे संकेत

चुकीचा अर्थ काढला गेला

मला काही वेगळेच म्हणायचे होते. मात्र, माझ्‍या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. तो फिरवून मांडण्यात आला. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. आम्ही महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) तत्त्वांचे पालन करणार आहोत. देशभक्त आहोत. महात्मा गांधींबद्दल पूर्ण आदर आहे. काही शब्द चुकले असतील तर माफी मागतो, असेही वाद वाढल्यानंतर खासदार नरेंद्रकुमार खिचर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.