गांधी हत्या ते सावरकरांची निर्दोष मुक्तता; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं

गांधी हत्येप्रकरणी न्यायालयाने एकूण 9 जणांना आरोपी केले होते.
mahatma gandhi
mahatma gandhisakal
Updated on

30 जानेवारी 1948 हा दिवस देशाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस मानला जातो कारण, याच दिवशी अहिंसेचे मूर्त रूप असलेल्या महात्मा गांधींची (Mahatma Gandhi Death Anniversary ) हत्या करण्यात आली. आजही गांधी हत्येचा उल्लेख आला की, आपल्या मनात कोणतंही नाव किंवा चित्र येतं ते फक्त आणि फक्त नथुराम गोडसे (Nathuram Godse). पण 30 जानेवारी 1948 रोजी घडलेली घटना सामान्य नव्हती. गांधी हत्येप्रकरणी न्यायालयाने एकूण 9 जणांना आरोपी केले होते, त्यापैकी दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. गांधी हत्येतील पहिल्या व्यक्तीला फाशी देण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सर्वांनाच माहिती आहे ते म्हणजे नथुराम गोडसे. पण या प्रकरणात आणखी एका व्यक्तीला फाशी (sentenced to death.) देण्यात आली होती, ज्याचे नाव होते नारायण आपटे. आपटे हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते आणि त्यांना गोडसेप्रमाणेच 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली होती.

mahatma gandhi
महात्मा गांधी १५ ऑगस्ट रोजी जल्लोषात सहभागी नव्हते, कारण...

1939 मध्ये हिंदू महासभेत दाखल झाले होते आपटे

नारायण आपटेचा जन्म 1911 मध्ये एका उच्चभ्रू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी घेतली होती. 1932 मध्ये आपटेनी अहमदनगरमध्ये शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर आपटे 1939 मध्ये हिंदू महासभेत सामील झाले. 22 जुलै 1944 रोजी पाचगणी येथे महात्मा गांधींच्या विरोधात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्वही त्यांनी केले. त्यानंतर 1948 मध्ये त्यांनी गांधी हत्येचा कट रचला.

mahatma gandhi
गांधी आणि सावरकर : विरोधी प्रवृत्तींचं चिरंतन द्वंद्व...

सावरकरांची निर्दोष मुक्तता

गांधी हत्येप्रकरणी 10 फेब्रुवारी 1949 रोजी विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली. मात्र, या खून प्रकरणातील नऊ आरोपींपैकी एका आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यांचे नाव होते विनायक दामोदर सावकर. न्यायालयाने सावरकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. तर, उर्वरित आठ जणांना गांधीहत्या, कटकारस्थान आणि हिंसाचाराच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावण्यात आली होती. यामध्ये नथुराम गोडसे आणि नारायण आपटे या दोघांना फाशीची तर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांमध्ये नथुराम गोडसेचा भाऊ गोपाळ गोडसेचाही समावेश होता.

त्याच संध्याकाळी महात्मा गांधींची हत्या झाली

30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळी 5.17 वाजता महात्मा गांधी दिल्लीतील बिर्ला भवन येथे संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी जात होते. त्यावेळी नथुराम गोडसेने प्रथम गांधी यांच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर बापूंसोबत उभ्या असलेल्या महिलेला बाजूला करत स्वतःकडील सेमी ऑटोमॅटिक बंदुकीच्या सहाय्याने गांधीजींवर तीन गोळ्या झाडत त्यांची हत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.