Gandhi Jayanti: महात्मा गांधींसोबत फोटोंमध्ये दिसणारी 'ती' महिला कोण? नेहरुंनी दिलं होतं आरोग्यमंत्री पद

Sushila Nayyar: ...जेव्हा नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर तीन गोळ्या झाडल्या तेव्हा तिथे बापूंच्या जवळ डॉ. सुशिया नायर आणि मनु बेन उभ्या होत्या. या सगळ्या घडामोडींमध्ये डॉ. नायर यांची खरी ओळख विसरली जाते. त्या केवळ डॉक्टर नव्हत्या तर राजकीय अभ्यासक, समाजसेविका आणि महिलांसाठी काम करणाऱ्या लढवय्या होत्या.
Gandhi Jayanti: महात्मा गांधींसोबत फोटोंमध्ये दिसणारी 'ती' महिला कोण? नेहरुंनी दिलं होतं आरोग्यमंत्री पद
Updated on

Mahatma Gandhi: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना सातत्याने सुशिला नायर यांच्याबाबत बोललं जातं. पेशाने डॉक्टर असलेल्या सुशिला नायर ह्या महात्मा गांधींचे खासगी सचिव प्यारेलाल यांच्या बहीण होत्या. त्या बापूंच्या वैद्यकीय सल्लागार म्हणूनही काम बघत होत्या. त्यांचं सुरुवातीचं आयुष्य गांधींच्या आजूबाजूलाच गेलं.

जेव्हा नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर तीन गोळ्या झाडल्या तेव्हा तिथे बापूंच्या जवळ डॉ. सुशिया नायर आणि मनु बेन उभ्या होत्या. या सगळ्या घडामोडींमध्ये डॉ. नायर यांची खरी ओळख विसरली जाते. त्या केवळ डॉक्टर नव्हत्या तर राजकीय अभ्यासक, समाजसेविका आणि महिलांसाठी काम करणाऱ्या लढवय्या होत्या.

डॉ. सुशिला नायर यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी अविभाजीत हिंदुस्थानमध्ये (सध्याचं पाकिस्तान) झाला होता. त्यांचे भाऊ प्यारेलाल हे महात्मा गांधी यांचे खासगी सहाय्यक होते. त्यामुळे १९३९ मध्ये डॉक्टर झाल्यानंतर त्या बापूंना भेटण्यासाठी सेवाग्रामला पोहोचल्या. तेव्हा तिथे कॉलरा आजाराची साथ पसरली होती. आश्रमातल्या लोकांना होणारा त्रास बघून डॉ. नायर यांनी तिथेच सेवेला सुरुवात केली. त्या पुढे महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांच्या खासगी सहाय्यक बनल्या.

Gandhi Jayanti: महात्मा गांधींसोबत फोटोंमध्ये दिसणारी 'ती' महिला कोण? नेहरुंनी दिलं होतं आरोग्यमंत्री पद
Mahatma Gandhi Jayanti: सनातनी गांधींना पुरोगामी बनवणारे मराठी गुरु तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

पंडित नेहरुंनी दिली आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी

महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर डॉ. सुशिला नायर पुढच्या शिक्षणासाठी परदेशात गेल्या. तिथून माघारी आल्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. १९५२ मध्ये त्यांनी दिल्ली विधानसभेच्या सदस्य बनल्या. १९५५-५६मध्ये त्या विधानसभेच्या अध्यक्ष राहिल्या. १९५७ मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी डॉक्टर नायर यांना अचानक झाशी ललितपूर लोकसभेच्या जागेवरुन उमेदवारी दिली. त्यापूर्वी त्या कधीच झाशीला गेल्या नव्हत्या.

काँग्रेस उमेदवार म्हणून त्या झाशीला पोहोचल्या तेव्हा दोन हजारांपेक्षा जास्त लोक स्वागतासाठी स्टेशनवर पोहोचले. त्यांनी आपली पहिली निवडणूक जिंकली आणि लोकसभेत प्रवेश केला. पुढे त्यांनी १९६२ आणि १९६७ च्या निवडणुकीत बाजी मारली आणि केंद्र सरकारमध्ये आरोग्यमंत्री पद सांभाळलं. पंडित नेहरु आणि लालबहादूर शास्त्री या दोघांच्याही काळात त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()