Mahatma Gandhi : खाजवा डोकं! भारतीय नोटांवर गांधीजींचा परफेक्ट फोटो कुठून आला?

प्रत्येक भारतीयांच्या खिशात असलेल्या पैशांवर महात्मा गांधींचे हसरे चित्र आहे.
Mahatma Gandhi
Mahatma GandhiSakal
Updated on

Who Took Mahatma Gandhi Photo For Indian Currency : प्रत्येक भारतीयांच्या खिशात असलेल्या पैशांवर महात्मा गांधींचे हसरे चित्र आहे. बापूंचे हे मनमोहक चित्र आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत. पण, कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की, महात्मा गांधींचा इतका परफेक्ट फोटो कोणी काढला असेल आणि तो भारतीय चलनावर कसा छापला गेला?

हेही वाचा : कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

Indian Currency
Indian Currency

भारतीय नोटांवर छापलेले महात्मा गांधींचे हे चित्र खरे नसून व्यंगचित्र असल्याचे अनेकांना वाटते. मात्र प्रत्यक्षात बापूंचा एका मोठा फोटो क्रॉप करून काढण्यात आला आहे. आज आम्ही हा फोटो कुठून आणि तो भारतीय नोटांवर कसा आला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

Mahatma Gandhi
RIP : तुम्हीपण श्रद्धांजली देताना ही चूक करता का? वाचा नेमका गोंधळ कुठे होतो
Mahata Gandi
Mahata Gandi

७६ वर्षे जुना आहे हा फोटो

महात्मा गांधींचे हे छायाचित्र एप्रिल १९४६ रोजी एका अज्ञात छायाचित्रकाराने काढलेले असून, ज्यावेळी महात्मा गांधी ब्रिटीश राजकारणी लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पेथिक-लॉरेन्स यांना भेटायला गेले होते तेव्हा हा फोटे काढलेला आहे.

लॉर्ड फ्रेडरिक भारत आणि बर्माचे सचिव म्हणून काम करत होते. त्यावेळी महात्मा गांधींनी त्यांची भेट घेतली होती. काढण्यात आलेला हा फोटो भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय यांच्या घरात लावण्यात आला होता. आज आपण त्या घराला राष्ट्रपती भवन म्हणून ओळखतो.

Mahatma Gandhi
रवींद्रनाथ टागोर, अब्दुल कलाम यांचाही फोटो भारतीय नोटांवर दिसू शकतो....

१९९६ मध्ये RBI ने जारी केल्या गांधी सिरीजच्या नोटा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)जून 1996 मध्ये महात्मा गांधींच्या फोटोसह १० आणि १०० रुपयांच्या नोटा जारी केल्या. जारी करण्यात आलेल्या या नोटांना गांधी सीरीजच्या नोटा असेही म्हणतात.

जारी केलेल्या या नोटांवर बापूंच्या मूळ फोटोची मिरर इमेज छापण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांतच गांधी सीरीजमधील इतर नोटा जसे की, मार्च १९९७ मध्ये ५०, ऑक्टोबर १९९७ मध्ये ५०० रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे नोव्हेंबर २००० मध्ये १०००, ऑगस्ट २००१ मध्ये २० तर, नोव्हेंबर २००१ मध्ये ५ रुपयांच्या नोटा गांधी सीरीजअंतर्गत जारी करण्यात आल्या.

Mahatma Gandhi
Scientific Fact: रंगबिरंगी साबणांचा फेस पांढराच का असतो? जाणून घ्या कारण

५०० आणि २००० च्या नव्या नोटाही गांधी सिरीजच्या नोटा आहेत. याआधी आरबीआयकडून लायन कॅपिटल सिरीजच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. वरील माहितीमुळे नक्कीच भारतीय नोटांवर महात्मा गांधींचा परफेक्ट फोटो कुठून आला या प्रश्नाचं उत्तर मिळण्यास मदत झाली असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.