Mahatma Gandhi Punyatithi : तब्बल १४ वर्ष आखला जात होता महात्मा गांधींच्या हत्त्येचा कट, ५ वेळा हल्ला

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्त्याचा प्रयत्न ५ वेळा झाला. त्यापैकी तीन वेळा नथुराम गोडसेचा सहभाग होता.
Mahatma Gandhi Punyatithi
Mahatma Gandhi Punyatithiesakal
Updated on

Mahatma Gandhi Punyatithi : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या घालून त्यांची हत्त्या केली होती. पण या घटनेच्या आधी चार वेळा गांधीजींच्या हत्त्येचा प्रयत्न झाला होता. तब्बल १४ वर्ष गांधीजींच्या हत्त्येचा कट आखला जात होता, हे अनेकांना माहित नाही. जाणून घ्या.

पहिला प्रयत्न

अधिकृत सजले जाणारे जी. डी. तेंडुलकर यांचे गांधीचरित्र च्या तिसऱ्या खंडात २० व्या प्रकरणात गांधींवराल एका बॉम्ब हल्ल्याची माहिती दिली होती. गांधींनी १९३४ मध्ये अस्पृश्य निवारणासाठी देशव्यापी दौरा सुरु केला होता. १९ जून ला ते त्यासाठी पुण्यात आले. २५ जूनला नगरपालिका सभागृहात भाषणासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. पण त्यावेळी हल्ला करणाऱ्याचा गाडीचा अंदाज चुकल्याने गांधीजी वाचले. पण पालिकेचे मुख्याधिकारी, दोन पोलीस यांसह सात जण त्यात जखमी झाले.

Mahatma Gandhi Punyatithi
Mahatma Gandhi Punyatithi : गांधींच्या अस्थी 46 वर्ष कटकमधील SBIच्या लॉकरमधे होत्या, कारण...

दुसरा प्रयत्न

यानंतर १० वर्षांनी जुलै १९४४ मध्ये एक छोटा प्रयत्न झाला होता. गांधी आजारी होते त्यावेळी विश्रांतीसाठी पाचगणीला आले होते. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी पुण्याहून १५-२० जणांचा एक गट आला. त्यांनी दिवसभर गांधींच्या नावाने शिमगा केला. गांधींनी भेटायला बोलावलं तर नकार दिला. आणि प्रार्थनेच्या वेळी त्यातला एक तरुण सुरा घेऊन गांधीजींच्या अंगावर धावून गेला. त्याला पकडण्यात आले. त्यावेळी त्या तरुणाने आपले नाव नथुराम गोडसे सांगितले होते.

Mahatma Gandhi Punyatithi
Mahatma Gandhi Jayanti : नक्की कसे आले महात्मा गांधी आपल्या नोटेवर? वाचा इतिहास

तिसरा प्रयत्न

या घटनेनंतर दोन महिन्यांनी म्हणजेच सप्टेंबर १९४४ मध्ये पुन्हा सेवाग्राममध्ये नथुराम गोडसे आणि त्यांच्या ल. ग. थत्ते या साथीदारास जंबियासह पकडण्यात आले. तेव्हा गांधी तेथेच होते.

Mahatma Gandhi Punyatithi
Mahatma Gandhi Punyatithi : स्वत:ला देशभक्त म्हणवणारा नथुराम गांधीजींचा एवढा राग का करायचा?

चौथा प्रयत्न

गांधींना मारण्याचा आणखी एक प्रयत्न १९४६ मध्ये झाला होता. २९ जून १९४६ मध्ये गांधीजी मुंबईहून पुण्याला रेल्वेने निघाले होते. त्या ट्रेनचा उल्लेख गांधी स्पेशल असा करण्यात आला होता. ट्रेनला अपघात व्हावा या उद्देशाने कोणीतरी नेरळ कर्जतच्या दरम्यान रेल्वेमार्गावर मोठमोठ्या दरडी टाकल्या होत्या. गाडी पूर्ण वेगात होती. पण चालकाच्या प्रसंगावधानाने अपघात टळला. गांधी बचावले. ही माहिती ‘हरिजन’च्या ७ जुलै १९४६ च्या अंकातही आहे.

पाचवा प्रयत्न

गांधींवर ५ वा हल्ला ३० जानेवारी १९४८ ला झाला. यावेळी नथुराम गाडसेने दिल्लीमधील एका प्रार्थना सभेनंतर गांधीजींवर गोळ्या झाडल्या. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.