Latest Mumbai News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक महायुतीत लढायची असून केंद्रीय भाजप या निवडणुकीचे काटेकोर नियोजन करत असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या मुंबईभेटीतून स्पष्ट झाले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका कशीही असली तरी त्यांना सांभाळून घेण्याचे तत्त्व पक्षाने अवलंबायचे ठरवले आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्यापाठोपाठ आज नड्डा आणि प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले. तसेच लालबागचा राजासह काही सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या.