नवी दिल्ली : महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सातत्याने चर्चेत असतो. अलिकडेच घडलेल्या हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. महिलांच्या अत्याचाराबाबत काहीतरी ठोस उपाययोजना केली जाण्याची मागणी देशभरातील संवेदनशील नागरिकांकडून सातत्याने केली जात असते. अशातच सध्या छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचं एक विधान वादग्रस्त ठरलं आहे. त्यांच्या या विधानावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
छत्तीसगढमधील बिलासपूर येथे त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी म्हटलंय की, बहुतांश मुली या स्वत:हूनच मुलांशी शारिरीक संबंध ठेवतात आणि मग ब्रेकप झाल्यानंतर पुरुषांवर बलात्कार झाल्याचा आरोप करतात. पुढे त्यांनी म्हटलंय की, एखादी विवाहीत व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य शारिरीक संबंध ठेवत असेल, तर अशावेळी या मुलींनी हे तपासायला हवं की ती व्यक्ती त्यांना जगण्यासाठी पुढे मदत करणार आहे की नाही. कारण जेंव्हा हे संबंध तुटतात तेंव्हा या बहुतांश घटनांमधील महिला पोलिसांत धाव घेतात.
हेही वाचा - Corona Update : कोरोना परिस्थिती दिलासादायक; आकडेवारीत घसरण
त्यांनी म्हटलंय की, या अल्पवयीन मुलींना माझा सल्ला आहे की, कसल्याही प्रकारच्या फिल्मी रोमान्सच्या फंद्यात फसू नका. कारण यामुळे तुमचं कुंटुंब, मित्र आणि तुमचं संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होऊ शकतं. अलिकडे 18 व्या वर्षीच लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, काही वर्षांनंतर जेंव्हा मुलं झालेली असतात, तेंव्हा त्या दाम्पत्याला एकमेकांसोबत राहणं कठीण होतं. असंही नायक म्हणाल्या. अनेक घटना अशा आहेत की, लिव्ह इनमध्ये राहून एकमेकांच्या सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. मी महिलांना आवाहन करते की, आधी नातं समजून घ्या. जर तुम्ही अशा प्रकारच्या नात्यात राहत आहात तर त्याचा परिणाम सरतेशेवटी वाईटच होईल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.