MP Mahua Moitra News : मोइत्रांच्या अडचणी थांबेनात, आता मित्राचा कुत्रा चोरल्याचा आरोप

Mahua moitra
Mahua moitraesakal
Updated on

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा या सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्या वेगळ्याच वादात सापडल्या आहेत. उद्योगपती दर्शन हीरानंदानी यांनी त्यांच्या विरोधात अने गंभीर आरोप केले आहेत.

यानंतर आता त्यांचा एक पूर्वीचा मित्र असलेल्या वकीलाने देखील कुत्रा चोरल्याचा/ अपहरण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप देखील करण्यात आले. यावर न्यायाधीशांनी कठोर शब्दात टिप्पणी केल्यानंतर ज्येष्ठ वकीलांनी महुआ मोइत्रा यांच्या केसमधून स्वतःला बाजूला केलं आहे.

यापूर्वी वकील जय अनंत देहाद्राई यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहून आपला पाळीव कुत्रा हेनरी याची चोरी केल्याचा आरोप केला होता. मागील काही दिवसांपासून महुआ मोइत्रा यांच्याकडून वकील जय अनंत देहाद्राई यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती.

वकीलाकडून आज सकाळी एक्सवर पोस्ट करत दावा केला होता की हेनरीचा वार सीबीआयकडे करण्यात आलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये काल दुपारी मला हेनरीच्या बदल्यात निशिकांत दुबे यांना सीबीआयकडे करण्यात आलेली तक्रार आणि पत्र वापस घेण्यात यावे यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी साफ नकार दिला. मी सीबीआयला संपूर्ण माहिती देणार आहे.

Mahua moitra
Devendra Fadnavis : उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आता माफी मागणार का? कंत्राट भरतीवरून फडणवीसांचा थेट सवाल

पत्रात काय लिहीलं आहे?

दिल्ली पोलिस आयुक्तांना लिहीलेल्या पत्रात वकील अनंत देहाद्राई यांनी आपला दावा खरा ठरवण्यासाठी आपला पाळीव कुत्रा हेनरी याला विकत घेतल्याच्या तारखेची पावती, पाळीव प्राण्यांच्या दुकानाचे नाव आणि प्रमाणपत्रासहीत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी महुआ मोइत्रा यांनी पाळीव कुत्रा हेनरीचे अपहरण केलं आहे. तसेच त्यांनी कुत्रा हेनरी याला सुरक्षा वापस देण्याची मागणी देखील केली आहे.

Mahua moitra
Maharashtra News : मंत्रालयात गाडीला प्रवेश नाकारला, शिंदे गटाच्या आमदाराचा गेटवरच राडा

दिल्ली हायकोर्टात झाली सुनावणी

आज दिल्ली हायकोर्टात महुआ मोइत्रा यांच्याशी संबंधीत या प्रकरणाची सुनावणी झाली. देहाद्राई यांनी कोर्टाला सांगितलं की, ही खूप त्रासदायक बाब आहे. येथे हितसंबंध अतिशय गंभीररित्या गुंतले आहेत. त्यांनी माझ्याशी ३० मिनीटं चर्चा केली. त्यांनी माझ्याकडे कुत्र्याच्या बदल्यात सीबीयायची तक्रार वापस घ्यायला सांगितलं. ते हजर राहू शकत नाहीत, माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान महुआ मोइत्रा यांचे वकील शंकरनारायणन यांनी कोर्टाला सांगितले की, जय यांनी मला यापूर्वी देखील माहिती दिली आहे. म्हणून मला जेव्हा या प्रकरणात हजर होण्यास सांगण्यात आलं तेव्हा मी माझ्या अशिलाला विचारणा केली की मला त्यांच्याशी बोलू द्या. त्यांनी यासाठी सहमती दर्शवली.

दोन्ही गटांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश सचिन दत्ता यांनी सांगितलं की, ते या आरोपांनी स्तब्ध झाले आहेत आणि या प्रकरणात महुआ मोइत्रा यांच्याकडून शंकरनारायणन हे हजर राहिल्यानं हितसंबंधांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यानंतर शंकरनारायणन यांनी या प्रकरणातून मागे हटण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणावर आता ३१ ऑक्टोबर रोजी सुणावनी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

निशिकांत दुबे यांनी केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय राज्य मंत्री (एमओएस) आयटी राजीव चंद्रशेखर यांना एक पत्र लिहीलं, ज्यामध्ये महुआ मोइत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते. त्यांनी एक समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांनी महुआ मोइत्रा आणि उद्योजक दर्शन हीरानंदानी यांच्यात लाचेची देवाणघेवान झाल्याचे आरोपांचा हवाला देत करवाई करण्याची मागणी करत याला आयपीसीचे कलम १२० ए अंतर्गत संसदेचा अवमान असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.