Mahua Moitra : मोईत्रांनी मागितली सर्वोच्च न्यायालयात दाद

उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे व भेटवस्तू घेत मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला
mahua moitra moves supreme court against expulsion from lok sabha report politics
mahua moitra moves supreme court against expulsion from lok sabha report politicse sakal
Updated on

नवी दिल्ली : पैशाच्या बदल्यात संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर खासदारकी गमवावी लागलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी संसदेच्या शिस्तपालन समितीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.

मोईत्रा यांनी केलेले कृत्य गंभीर असल्याने त्यांची खासदारकी रद्द केली जावी, अशी शिफारस शिस्तपालन समितीने लोकसभेत केली होती. त्यानंतर मागील आठवड्यात लोकसभेने त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे व भेटवस्तू घेत मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता.

मोईत्रा यांचे एकेकाळचे सहकारी जय देहदराय यांनी दिलेले पुरावे दुबे यांनी सार्वजनिक केले होते. मोईत्रा यांनी संसदेत विचारलेले ६१ पैकी ५० प्रश्न हिरानंदानी व त्यांच्या कंपनीचे व्यावसायिक हित जपण्यासाठीचे होते, असे दुबे यांनी म्हटले होते.

mahua moitra moves supreme court against expulsion from lok sabha report politics
Mahua Moitra: खासदारकी गेल्यानंतर आता मोइत्रा निवडणूक लढवू शकतात का? कोर्टात जाऊ शकतात का?; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दुसरीकडे आपल्यावरील आरोप निराधार असल्याचा दावा मोईत्रा यांनी केला होता. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मोईत्रा यांना जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड देण्यात आला होता, त्याचा वापर हिरानंदानी यांनी दुबईसह अन्य देशांतून केल्याचा ठपका मोईत्रा यांच्यावर ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.