Hathras Gangrape Case: देश हादरवणाऱ्या हाथरस जळीतकांडप्रकरणी एक दोषी, तीन निर्दोष

बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर यूपी पोलिसांनी पहाटे तिचा मृतदेह कुटुंबियांच्या परवानगीशिवाय जाळून नष्ट केला होता.
Hathras
Hathras
Updated on

लखनऊ : देश हादरवणाऱ्या हाथरस येथील तरुणीवरील बलात्कार आणि जाळून मारल्याप्रकरणी विशेष कोर्टानं मुख्य आरोपीला दोषी ठरवलं असून इतर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पण कोर्टाच्या या निर्णयानं समाधानी नसलेल्या पीडितेच्या कुटुंबियांनी हायकोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं आहे. (Main accused convicted and three others acquitted in Hathras gangrape murder case)

Hathras
Sharad Pawar : नागालँडमध्येही राष्ट्रवादीचा डंका; 2 विधानसभा मतदार संघात विजय, तर...

या हत्याकांड प्रकरणी प्रमुख आरोपी संदीप सिंह याला हाथरसच्या विशेष न्यायालयानं अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा अर्थात अॅट्रॉसिटी अॅक्ट कलम ३०४ अंतर्गत दोषी ठरवलं आहे. तर इतर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यानंतर पीडित कुटुंबियांचे वकील अॅड. सीमा कुशवाह यांनी कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आम्ही हायकोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं आहे.

Hathras
Shiv Sena : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आमच्या आशेला अंकूर फुटला; उद्धव ठाकरेंना दुहेरी दिलासा

कोर्टाच्या या निर्णयानंतर आरोपीच्या काकानं कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं. पण त्यांनी प्रश्न केला की, यामध्ये फक्त संदीप सिंह हाच दोषी का? असा सवाल त्यांनी विचारला तसेच या संपूर्ण प्रकरणावर राजकीय नेते आणि मीडिया ट्रायल झाल्याचा आरोपही केला.

हे ही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

हाथरसमध्ये काय घडलं होतं?

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्य़े २०२० मध्ये हे भीषण हत्याकांड घडलं होतं. यामध्ये एका १९ वर्षीय दलित मुलीवर चार सवर्ण समाजातील व्यक्तींनी बलात्कार करुन तिला शेतात रक्ताळलेल्या अवस्थेत सोडून निघून गेले होते. यानंतर मुलीच्या कुटुंबियांना ती शेतात आढळून आल्यानंतर त्यांनी तिला अलिगड येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं पण प्रकृती गंभीर बनलल्यानं नंतर अकरा दिवसांनी तिला दिल्लीला हालवण्यात आलं. त्यानंतर तिचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला होता. यानंतर तिचा मृतदेह संध्याकाळी रुग्णवाहिकेतून तिच्या गावाकडं नेण्यात आला. त्यानंतर पहाटे ३.३० वाजता यूपी पोलिसांनी जबरदस्तीनं तिच्या कुटुंबियांना न सांगताच जाळून विल्हेवाट लावली होती. पोलिसांच्या या कृतीमुळं देशभरात मोठा गदारोळ माजला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()