ओडिशातील झारसुगुडा येथील महानदीत लहान मुले आणि महिलांसह सुमारे 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर सात जण बेपत्ता आहेत. दरम्यान, बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.
काल (शुक्रवारी) ओडिशातील झारसुगुडा येथील महानदीमध्ये लहान मुले आणि महिलांसह सुमारे 50 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर सात जण बेपत्ता आहेत. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची भरपाई देण्याचे जाहीर केली आहे.
मृत आणि बेपत्ता व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, ही बोट बरगढ जिल्ह्यातील बांधीपाली भागातून प्रवाशांना घेऊन जात होती. दरम्यान, शारदाजवळ ही दुःखद घटना घडली आहे.
स्थानिक मच्छिमारांनी तात्काळ 35 प्रवाशांना वाचवले. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आणखी सात प्रवाशांची सुटका केली. बोटीतील सात जण अद्याप बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे. मात्र महानदीच्या जोरदार प्रवाहामुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरत आहे.
दरम्यान, बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी बचाव पथके सर्व तैनात करत आहेत. तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नुकसान भरपाई जाहीर केली आहे. या दु:खद घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची रक्कम दिली जाईल, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.