हिजाबवर बोलणारी मलाला युसूफझाई ट्रोल; जुना ट्विट होतोय व्हायरल

मलालाने तिच्या ‘आय एम मलाला’ या पुस्तकात बुरख्याला चुकीचे आणि गुदमरणारे म्हटले होते
Malala Yousafzai
Malala YousafzaiMalala Yousafzai
Updated on

कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याबाबत भारतीय नेत्यांना उपदेश करणारी नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई (Malala Yousafzai) तिच्या जुन्या ट्विटमुळे ट्रोल होत आहे. तिने जुन्या ट्विटमध्ये तिने बुरख्याला विरोध केला होता.

मलाला युसुफझाईने (Malala Yousafzai) मंगळवारी रात्री ट्विट केले की, ‘कॉलेज आम्हाला हिजाब किंवा शिक्षण यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहेत. मुलींना हिजाब घालून शाळेत प्रवेश न देणे हे भयंकर आहे. महिलांवर कमी-अधिक प्रमाणात कपडे घालण्यासाठी दबाव आणला जात आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना बाजूला करण्याचा प्रयत्न थांबवावा.’ ट्विटद्वारे ती मुलींना हिजाब घालून शाळेत जाण्याची परवानगी देण्याचे म्हणत आहे.

आता तिचे जुने विधान ट्विटरवर (tweet) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने बुरख्याला विरोध केला होता. मलालाने तिच्या ‘आय एम मलाला’ या पुस्तकात बुरख्याला चुकीचे आणि गुदमरणारे म्हटले होते. मलाला युसुफझाईने लिहिले की, बुरखा घालणे म्हणजे मोठ्या कापडाच्या शटलकॉकमध्ये जाण्यासारखे आहे. ज्यामध्ये एकच ग्रील आहे. ज्यातून बाहेर पाहता येते. तर उन्हाळ्यात ते ओवनसारखे होते. मलालाच्या या विधानावरून लोक तिला ट्रोल करीत आहे. मलालाच्या पुस्तकातील याच कोटाचा संदर्भ देत लेखक आनंद रंगनाथन यांनी ट्विट (tweet) केले आहे.

ज्या नॉर्वेतून तिला नोबेल पारितोषिक मिळाले आहे, त्यांनी २०१७ मध्ये शाळा आणि विद्यापीठांमध्ये हिजाब किंवा चेहरा झाकणारे कपडे घालण्यावर बंदी घालण्याचा कायदा केला होता. नॉर्वेच्या कायद्याचा संदर्भ देत मलालाने नॉर्वेबद्दल काहीच का सांगितले नाही, असा प्रश्न लोक उपस्थित करीत आहेत. इतकेच नाही तर अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहे.

Malala Yousafzai
हिजाबचे राजकारण यूपीत : ‘त्या’ विद्यार्थिनीसाठी जमियत उलेमा-ए-हिंदची घोषणा

लिंगाचा मुद्दा बनवू नका

महाविद्यालयाच्या निर्णयांचा प्रश्न आहे, तो फक्त महिलांसाठी नाही. पुरुषही हिजाब घालून आले तर त्यांनाही परवानगी मिळणार नाही. तुमच्या धर्मात स्त्रियांना वस्तू समजावे असे सांगितले आहे. जिथे फक्त स्त्रियांना हिजाब घालण्यास सांगितले जाते. महाविद्यालयांकडून मुलांनाही भगवी शाल परिधान करून येऊ दिले जात नाही. त्यामुळे लिंगाचा मुद्दा बनवू नका, असे उत्तर मलाला युसूफझाईला (Malala Yousafzai) ‘द स्किन डॉक्टर नावाच्या ट्विटर हँडल’वर देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()