'महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता, भारताशी त्यांचा काही संबंध नाही'

Mahatma Gandhi
Mahatma Gandhiesakal
Updated on
Summary

'मोहनदास करमचंद गांधींचा या देशाशी काही एक संबंध नाही.'

मालेगाव बॉम्बस्फोटातील (Malegaon Bomb Blast Case) आरोपी सुधाकर चतुर्वेदीनं (Sudhakar Chaturvedi) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. सुधाकरनं महात्मा गांधींना पाकिस्तानचे (Pakistan) राष्ट्रपिता म्हंटलंय. यासोबतच महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) पुतळा हटवल्यानंतर त्या जागी गोडसेंच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात यावी, असंही तो म्हणाला. सुधाकर चतुर्वेदी इथंच थांबला नाही. तर, हा देश गांधींचा नसून महान क्रांतिकारकांचा आहे, असंही तो म्हणाला आहे.

Mahatma Gandhi
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया

चतुर्वेदी पुढं म्हणाला, मोहनदास करमचंद गांधी यांचा या देशाशी काही एक संबंध नाही. गांधीजी पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत, त्यामुळं त्यांचा भारताशी कोणताही संबंध नाही. काँग्रेस (Congress) 1947 पासून राजकारण करत आहे. मात्र, कोणतंही कारण नसताना गांधींचा फोटो नोटांवर छापण्यात आलाय.

Mahatma Gandhi
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर गृहराज्यमंत्री आक्रमक

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीनं सांगितलं की, देशात हजारो ठिकाणी गांधींचे पुतळे बसवण्यात आले आहेत. तसंच अनेक रस्त्यांना त्यांचं नावही देण्यात आलंय, याचा त्यानं निषेध नोंदवलाय. सुधाकरनं गांधीजींचा पुतळा हटवून त्या जागी नथुराम गोडसेचे (Nathuram Godse) पुतळे बसवण्यात यावा, अशी मागणी त्यानं केलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()