Swati Maliwal : 'मी एकटी पडलीय...'; स्वाती मालीवाल यांचं इंडिया आघाडीच्या नेत्यांना पत्र; चर्चेसाठी मागीतला वेळ

Swati Maliwal Letter to INDIA Bloc Leaders : स्वाती मालिवाल या आम आदमी पक्षातर्फे खासदार होण्यापूर्वी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या.
Swati Maliwal : 'मी एकटी पडलीय...'; स्वाती मालीवाल यांचं इंडिया आघाडीच्या नेत्यांना पत्र; चर्चेसाठी मागीतला वेळ
Updated on

नवी दिल्ली, ता. १८ (पीटीआय) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभवकुमार यांनी केलेल्या मारहाणीबाबत चर्चा करण्यासाठी खासदार स्वाती मालिवाल यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहीत चर्चेसाठी वेळ मागितली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.

‘‘मला मारहाण झाली आहे. याबाबत जाहीरपणे बोलल्यावर मलाच दोषी ठरविण्याचा प्रकार झाला आणि माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला गेला. मला पाठिंबा देण्याऐवजी माझ्याच पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोधीमोहिम राबवत माझा अपमान केला,’’ असे मालिवाल यांनी पत्रात म्हटले आहे. मागील महिनाभरात मला प्रचंड त्रास झाला असून न्यायाची मागणी करताना मी एकटी पडली आहे, त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मला वेळ द्यावा, अशी विनंती मालिवाल यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना केली आहे. मालिवाल यांनी हे पत्र सोशल मीडियावरही प्रसिद्ध केले आहे.

Swati Maliwal : 'मी एकटी पडलीय...'; स्वाती मालीवाल यांचं इंडिया आघाडीच्या नेत्यांना पत्र; चर्चेसाठी मागीतला वेळ
Skin Bank for Jawan: लष्करातील जवान अन् कुटुंबियांसाठी आता 'स्कीन बँक’; अत्याधुनिक उपचार शक्य

‘ही बाब वेदनादायी’

स्वाती मालिवाल या आम आदमी पक्षातर्फे खासदार होण्यापूर्वी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. पत्रात त्या म्हणतात,‘‘मी १८ वर्षे लोकांमध्ये राहून काम केले आहे आणि महिला आयोगाच्या मार्फत एक लाख ७० हजार प्रकरणे हाताळली आहेत. हे करताना मी कोणालाही घाबरले नाही. महिला आयोगाची मान मी कायम उंच ठेवली. मात्र, माझ्यावर मुख्यमंत्र्यांच्या घरात मारहाण होऊनही नंतर चारित्र्यहनन केले जात आहे, ही शरमेची बाब आहे.’’

Swati Maliwal : 'मी एकटी पडलीय...'; स्वाती मालीवाल यांचं इंडिया आघाडीच्या नेत्यांना पत्र; चर्चेसाठी मागीतला वेळ
Rahul Gandhi Resign as an MP : राहुल गांधी यांनी वायनाड सोडून रायबरेली का निवडलं? या निर्णयामागे काँग्रेसची रणनीती काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.