ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांची प्रकृती गंभीर; मल्लिकाची भावूक पोस्ट

विनोद दुआ यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू
Vinod Dua, Mallika Dua
Vinod Dua, Mallika Dua
Updated on

कॉमेडियन मल्लिका दुआचे Mallika Dua वडील आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ Vinod Dua यांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून वडिलांसाठी मल्लिकाने नुकतीच एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. 'ते लढत आहेत, ही अपयशाची लढाई आहे का, हे माहित नाही. कोणत्याही परिस्थितीत, एखाद्यानं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की, चांगलं जगलेलं जीवन हे भय आणि निराशेत व्यर्थ आयुष्य जगण्यापेक्षा खूप मौल्यवान आहे,' असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. जून महिन्यात मल्लिकाची आई डॉ. पद्मावती दुआ यांचं कोरोनाने निधन झालं.

मल्लिका दुआची पोस्ट-

मल्लिकाने इन्स्टा स्टोरीमध्ये स्वत:चा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'ते लढत आहेत, ही अपयशाची लढाई आहे का, हे माहित नाही. कोणत्याही परिस्थितीत, एखाद्यानं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की, चांगलं जगलेलं जीवन हे भय आणि निराशेत व्यर्थ आयुष्य जगण्यापेक्षा खूप मौल्यवान आहे. ते जगले. भविष्यात काहीही होवो, आम्ही त्याचा स्वीकार करू. त्यांनी आम्हाला कधीच उदास व्हायला किंवा घाबरून राहायला शिकवलं नाही. ते मला नेहमी सांगायचे, 'डरना नहीं है पुत्तर.''

Vinod Dua, Mallika Dua
'बाबा, थांब ना रे तू'; वडिलांच्या निधनानंतर सायलीची भावूक पोस्ट

गेल्या आठवड्यात विनोद दुआ यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. त्यावेळी मल्लिकाने पोस्ट लिहित अशा अफवा न पसरवण्याची विनंती केली होती. 'माझ्या वडिलांच्या निधनाबाबत अशा अफवा पसरवू नका. ते आयसीयूमध्ये आहेत आणि मृत्यूशी झुंज देत आहेत. कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका', असं ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.