Ram Mandir Ayodhya: खर्गे अन् सोनिया गांधींना राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याचे निमंत्रण, इंडिया आघाडीमध्ये मतभेद?

22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख यजमान आहेत. कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींपासून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.
Mallikarjun Kharge and Sonia Gandhi
Mallikarjun Kharge and Sonia Gandhiesakal
Updated on

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकाची वेळ जवळ आली आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे पाहुण्यांना आमंत्रित केले जात आहे. या निमंत्रणपत्रिकांबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील युद्ध देखील तीव्र झाले आहे. ज्यांना निमंत्रित करण्यात आले नाही ते भाजपवर राजकारण करण्याची टीका करत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर हा पुन्हा एकदा राजकीय मुद्दा बनत चालला आहे.

दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना निमंत्रण मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेसचे सरचिटणीस प्रभारी जयराम रमेश म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि  सोनिया गांधी यांना 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आणि कळवले जाईल.

22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख यजमान आहेत. कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींपासून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. ट्रस्टने सुमारे 6 हजार लोकांना निमंत्रण पत्रे पाठवली आहेत.

Mallikarjun Kharge and Sonia Gandhi
Bosco Martis : 'आम्हाला न्याय कोण मिळवून देणार'? बॉलीवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर्सनं मांडली मोठी खंत

मात्र आता विरोधक केंद्र सरकारवर धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण करत असल्याचा आरोप करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येणार असल्याने हा मुद्दाही राजकीयदृष्ट्या तापत असल्याचे दिसून येत आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहायचे की नाही यावरून इंडिया आघाडीमध्ये मतभेद आहेत. (Ayodhya Ram Mandir News in Marathi)

एकीकडे आपण सहभागी झालो नाही तर आपल्यावर हिंदूविरोधी असल्याचा आरोप होईल, अशी भीती पक्षांना वाटत आहे, तर दुसरीकडे आपण सहभागी झाल्यास भाजपच्या हातात खेळल्याचा आरोप होईल, अशी भीती पक्षांना वाटते. सध्या भारतातील विरोधी पक्ष गंभीर राजकीय भोवऱ्यात अडकला आहे.

Mallikarjun Kharge and Sonia Gandhi
Manoj Jarange Mumbai Rally: जरांगेंच्या मुंबईतील उपोषणासाठी 'या' मैदानची निवड? शिष्टमंडळानं घेतला आढावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.