Mallikarjun Kharge : ‘एनआरए’ने एकही परीक्षा का घेतली नाही?काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल

‘‘चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय नियुक्ती संस्थेची (एनआरए) स्थापना करण्याची घोषणा तुम्ही केली होती. मग मागील चार वर्षांत या संस्थेने एकही परीक्षा का घेतली नाही?’’ असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केला आहे.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge sakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय नियुक्ती संस्थेची (एनआरए) स्थापना करण्याची घोषणा तुम्ही केली होती. मग मागील चार वर्षांत या संस्थेने एकही परीक्षा का घेतली नाही?’’ असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केला आहे. ‘‘रोजगाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष खोटी माहिती पसरवत आहेत. मागील काही वर्षात आठ कोटी रोजगाराची निर्मिती करून केंद्र सरकारने विरोधकांचे हे नरेटिव्ह खोटे ठरविले आहे,’’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मुंबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान केला होता. त्याचा संदर्भ देत खर्गे यांनी पंतप्रधांनासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

याबाबत बोलताना खर्गे म्हणाले, ‘‘नोकऱ्या देण्याच्या मुद्द्यावर तुम्ही मुंबईत खोट्या माहितीचे जाळे विणत होता. पण चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय नियुक्ती संस्थेची स्थापना करताना तुम्ही केलेल्या घोषणांची आठवण करून देऊ इच्छितो. ‘‘देशातील कोट्यवधी युवकांसाठी ‘एनआरए’ ही वरदान ठरेल. सामान्य पात्रता परीक्षेमुळे अनेक परीक्षा समाप्त होतील. यामुळे वेळ आणि संसाधनांची बचत होईल. शिवाय पारदर्शकता वाढेल, असे तुम्हीच ऑगस्ट २०२० मध्ये सांगितले होते,’’ अशी आठवणही खर्गे यांनी पंतप्रधानांना करून दिली आहे. शिक्षण पद्धती आणि युवकांचे भवितव्य उद्‍ध्वस्त करण्याचा विडा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उचलला असल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे.

खर्गे म्हणाले...

  • गेल्या चार वर्षांत एनआरएची एकही परीक्षा का झाली नाही?

  • एनआरएसाठी १५१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात केवळ ५८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, ते का?

  • सरकारी नोकर भरतीसाठी एनआरएची स्थापना करण्यात आली होती. मात्र अनुसूचित. जाती, अनुसूचित. जमाती, इतर मागासवर्गीय तसेच आर्थिक मागासांचा आरक्षणाचा अधिकार हिरावून घेण्यासाठी ''एनआरए'' ला जाणूनबुजून निष्क्रिय ठेवण्यात आले का?

  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये अनियमितता आणि पेपरफुटी झाली असताना. संबंधित परीक्षा ''एनआरए''च्या माध्यमातून का घेण्यात आली नाही?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com