Mallikarjun Kharge : ''...तर आपल्या देशातली ही शेवटची निवडणूक ठरेल'', काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी व्यक्त केली 'ही' भीती

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक भीती व्यक्त करत यावेळची लोकसभा निवडणूक आपल्या देशातली शेवटची निवडणूक ठरु शकते, असं म्हटलंय. त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Khargesakal
Updated on

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक भीती व्यक्त करत यावेळची लोकसभा निवडणूक आपल्या देशातली शेवटची निवडणूक ठरु शकते, असं म्हटलंय. त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

''पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले तर देशासाठी ही शेवटची निवडणूक ठरेल, त्यामुळे २०२४च्या लोकसभा निवडणुका लोकशाही वाचवण्यासाठीचा शेवटचा प्रयत्न असणार आहे.'' अशी भीती खर्गेंनी व्यक्त केली.

Mallikarjun Kharge
Who Is Saurabh Kumar : कोण आहे सौरभ कुमार? ज्याने वयाच्या 30व्या वर्षी टीम इंडियात घेतली जडेजाची जागा

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मल्लिकाकार्जून खर्गे हे एका रॅलीला संबोधित करत होते. त्यावेळी बोलताना खर्गे म्हणाले की, जर नरेंद्र मोदी एक अजून निवडणूक जिंकले तर देशात हुकूमशाही येईल. लोकशाही वाचवण्याची ही शेवटची संधी देशातील लोकांकडे आहे.

ओडिसातल्या भुवनेश्वर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर खर्गे बोलत होते. भाजप आणि आरएसएस यांच्यापासून लोकांनी दूर राहिलं पाहिजे. कारण ते एका विषासारखे आहेत. देशातील जनतेला आता परिस्थिती ओळखावी लागेल. परवाच आमच्यातल्या एका नेत्याला त्यांनी त्यांच्याकडे येण्यास भाग पाडलं. आहे.

Mallikarjun Kharge
Maldives Tourism Market : 'बॉयकॉट ट्रेंड'चा मालदीव पर्यटनाला किती फटका बसला? आकडेवारी आली समोर

''एका-एकाला नोटीस देणं, भीती घालणं, धमकी देणं.. असे प्रकार सुरु आहेत. त्यातूनच प्रवेश घेतले जात आहेत. भीतीपोटी कोणी मैत्री तोडत आहे तर कोणी पक्ष सोडत आहे.. काहीजण युती तोडत आहे. जर एवढे डरपोक लोक असतील तर देश कसा वाचेल?'' अशी भीती खर्गेंनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.